Join us

उन्हाचा त्रास - डिहायड्रेशन यामुळे अचानक हार्ट अटॅक येण्याचा धोका, डॉक्टर सांगतात, ५ गोष्टी विसरू नका..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2023 15:12 IST

How to prevent a summer heart attack; expert offers tips सध्या हार्ट अॅटॅकची समस्या लोकांमध्ये वाढत चालली आहे, सकस आहार आणि व्यायाम महत्वाचं आहे..

काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा हा वाढत चालला आहे. भारताच्या विविध ठिकाणी उष्माघाताची लाट पसरली आहे. तापमान वाढल्यामुळे लोकं आजारी पडत आहे. डिहायड्रेशन ते ब्लड प्रेशर अशा गंभीर आजारामुळे लोकं हैराण झाले आहेत. अनेकांना असे वाटते, की गरमीमुळे हृदयाच्या निगडीत आजार वाढतात. ज्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

यासंदर्भात, नवी दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील, कार्ड स्टेटमेंटचे तपशील वरिष्ठ सल्लागार डॉ. वनिता अरोरा सांगतात, अति उष्णतेमुळे लोकांमध्ये डिहायड्रेशन आणि ब्लड प्रेशरचा धोका वाढत आहे. उष्णतेमुळे रक्तवाहिन्या पसरतात, ज्यामुळे रक्तपुरवठा कमी होतो. ज्या लोकांना लो ब्लड प्रेशरची समस्या आहे, त्यांनी या ऋतूत विशेष काळजी घायायला हवी. खरंतर या ऋतूशी व हृदयाचे थेट संबंध नाही. पण प्रत्येक ऋतूत आपण आपल्या आरोग्याची व हृदयाची काळजी घ्यायला हवी''(How to prevent a summer heart attack; expert offers tips).

उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी लोकांनी दररोज 2-3 लिटर पाणी प्यायला हवे. ज्यामुळे शरीरात उर्जा येईल, व उत्साही देखील वाटेल. आपण पाण्यात चिमुटभर मीठ टाकून पिऊ शकता. ज्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येऊ शकते. शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्स पावडर पाण्यात मिसळून प्या. या सर्व गोष्टींचे पालन करून आपण स्वतःला निरोगी ठेवू शकता.

नजर तेज हवी, डोळ्यांना चष्मा नको? आहारात हवेतच ५ पदार्थ, डोळे सांभाळा

या ५ उपायांनी घ्या हृदयाची काळजी

दररोज ४० मिनिटं ४ किमी चाला

पोषक तत्वांनी परिपूर्ण सकस आहाराचे सेवन करा

तणाव आणि चिंता दूर करा

ना एसी ना फॅन फक्त एक आयुर्वेदिक ड्रिंक, भर उन्हाळ्यातही शरीर राहील कुल - हायड्रेट

जंक आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा

वेळोवेळी आरोग्य तपासणी करा.

टॅग्स : हेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोगआरोग्य