Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

Common Causes of Stress: What Triggers Anxiety: Stress and Anxiety Factors: How Stress Affects Mental Health: Emotional Triggers for Anxiety: Stress-Inducing Habits: Mental Health and Stress Causes: Physical Symptoms of Anxiety: How to Manage Stress and Anxiety: तणाव आणि चिंता टाळण्यासाठी आपण काय करायला हवे जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2025 15:30 IST2025-02-26T15:29:37+5:302025-02-26T15:30:39+5:30

Common Causes of Stress: What Triggers Anxiety: Stress and Anxiety Factors: How Stress Affects Mental Health: Emotional Triggers for Anxiety: Stress-Inducing Habits: Mental Health and Stress Causes: Physical Symptoms of Anxiety: How to Manage Stress and Anxiety: तणाव आणि चिंता टाळण्यासाठी आपण काय करायला हवे जाणून घेऊया.

How to Manage Stress and Anxiety Common Causes affect Mental and physical Health | मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

मनात विचारांचं काहूर, सतत चिडचिड होते? तुम्हालाही स्ट्रेस छळतोय ना, वाचा ४ सोपे उपाय

आपले मन आणि शरीर निरोगी असणं फार गरजेचे आहे. शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्य जपायला हवे. (Common Causes of Stress) सततचा ताण, खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याची वेळ यांसारख्या गोष्टींमुळे ताण आणि चिंता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. (Stress and Anxiety Factors)


तुम्हालाही सतत ताण येतो का? डोक्यात एकाच गोष्टींचे विचार येतात? (How Stress Affects Mental Health) चिंता केल्याने त्रास होतो का? या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या मानिसक आरोग्याच्या समस्या अधिक वाढू शकतात. (Mental Health and Stress Causes) यामुळे आपल्याला नैराश्य देखील येऊ शकते. तणाव आणि चिंता टाळण्यासाठी आपण काय करायला हवे जाणून घेऊया.

फळं खाल्ल्यानंतर लगेच पिऊ नका पाणी! होतील उलट्या-वाढेल मळमळ, उन्हाळ्यात ‘ही’ घ्या काळजी..

1. ताण- चिंतेचा धोका 

तणाव येणं किंवा चिंता वाढणं याची अनेक कारणे येऊ शकतात. यामुळे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरचे संतुलन बिघडल्यामुळे आपला ताण वाढतो. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा देखील आपल्या मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे चिंता करणे वाढते. डॉक्टरांच्या मते अशावेळी आपण नकारात्मकतेकडे जाण्यापेक्षा संवाद साधणं महत्त्वाचं आहे. 

2. कॅफिनचे अतिप्रमाणात सेवन 

आपण जर चहा आणि कॉफीचे अतिप्रमाणात सेवन करत असू तर ते आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. जास्त प्रमाणात कॅफिन प्यायल्याने चिंतेच्या समस्येत भर पडते. तज्ज्ञांच्या मते कॅफिनच्या सेवनामुळे मज्जासंस्था उत्तेजित होतात. याशिवाय कॅफिनमुळे हृदयाची गती आणि रक्तदाब देखील वाढतो. ज्यामुळे चिंतेच्या लक्षणात वाढ होते. म्हणून कॅफिनचे कमी प्रमाणात सेवन करायला हवे. 

3. सतत नकारात्मक विचार 

तज्ज्ञ म्हणतात की, नकारात्मक विचार हे देखील तणाव वाढण्याचे प्रमुख कारण आहे. नकारात्मकतेमुळे आपण स्वत:वर शंका घेऊ लागतो. काही गोष्टींकडे आपण सकारात्मक भावनेने पाहायला हवे. तसेच पुरेशी झोप न मिळाल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. ज्यामुळे ताण आणि चिंता वाढू शकते. जीवनशैलीत काही बदल केल्यास या समस्या टाळता येतात. 

4. तणाव आणि चिंता टाळण्यासाठी

पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. यासाठी आपण जंकफूडचे सेवन कमी करायला हवे. आहारात पौष्टिक पदार्थ खा. 

नियमित व्यायाम, योगा न केल्याने ताण आणि चिंता वाढू शकते. यासाठी किमान ३० मिनिटे व्यायाम करायला हवा. 

ध्यान करणे, मोठ्याने श्वास घ्या. ज्यामुळे मन शांत होऊ शकते. चिंता कमी होऊ शकते. 

कॅफिन आणि अल्कोहोलचे सेवन कमी करा. याचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने चिंतेच्या लक्षणात वाढ होऊ शकते. 
 

Web Title: How to Manage Stress and Anxiety Common Causes affect Mental and physical Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.