युद्धाच्या बातम्या वाचून ताण येतो, भीती वाटते. सरकारही मॉक ड्रिल करत आपल्याला सतर्क रहायला शिकवते आहेच. मात्र त्यासोबतच विचार केला तर लक्षात येईल की आपल्या घरात साधा फस्ट एड बॉक्सही नाही.. तसं काहीआपण करुन ठेवतच नाही.. खरंतर ज्या घरात लहान मुलं आहेत त्या घरात लेकराबाळांना सतत लागतं, ते सारखे पडतात- झडतात, स्वयंपाक करताना आपल्यालाही कूुठेतरी भाजतं, कधीतरी काहीतरी खरचटतं, बोट कापलं जातं.. असं काही झालं की मग आपण ऐनवेळी धावपळ करतो (how to make first aid box at home?). बँडेज, कात्री, औषधं शोधत घरभर पळतो. त्यामुळे निदान घरात एक फस्ट एड बॉक्स तरी हवाच (What Should a First-Aid Kit Include?). पण म्हणजे नेमकं काय काय हवं त्या बॉक्समध्ये ते पाहा..(What are the things you need in a first aid kit?)
फस्ट एड बॉक्समध्ये कोणकाेणत्या गोष्टी असायला हव्या?
हा बॉक्स तयार करण्यासाठी तुमच्या घरातला कोणताही एखादा डबा घेतला तरी चालेल. सगळ्यात महत्त्वाचं काय की त्या डब्यात फक्त प्रथमोपचारासाठी गरजेच्या असणाऱ्या सगळ्या वस्तू असायला हव्या..
त्या बॉक्समध्ये लहान- मोठ्या आकाराच्या वेगवेगळ्या मेडिकल पट्ट्या असायला हव्या.
रवा आणि आंब्याचा सुपरस्पाँजी मँगो केक! मुलांना सुटीत द्या मस्त ट्रिट, घ्या अगदी सोपी रेसिपी..
याशिवाय कापसाचे काही बोळे तसेच मेडिकेटेड कापसाचे एक लहानसे पॅकेट असणेही गरजेचे आहे.
सॅनिटायझरची एक छोटीशी बाटलीही त्यामध्ये असू द्या. कारण कोणावरही कोणीही उपचार करत असेल तर सगळ्यात आधी हात सॅनिटाईज होणं गरजेचं आहे.
त्यासोबतच बॅण्डेजचे पाकिट, ॲण्टीसेप्टिक लिक्विड, ॲण्टीसेप्टिक क्रिम अशी औषधीही असायला हवी.
फस्ट एड बॉक्समध्ये एखादा छोटा नॅपकिन, एखादा छोटा खराब कपडा तसेच मास्क, रुमाल, थर्मामीटर, सर्दी-खोकला- ताप अशा औषधींच्या गोळ्या, पोटदुखीचे औषध, ॲण्टीबायोटिक्स अशा वस्तूही ठेवा.
मलायका अरोराचं सौंदर्य जपणाऱ्या ४ खास गोष्टी, ५१ वर्षे वय पण दिसते कमाल सुंदर
कात्री, प्लास्टिकच्या काही पिशव्या, मेडिकेटेड टेप, वर्तमान पत्र, मास्क अशा वस्तूही ठेवा. या सगळ्या गोष्टी जर तुमच्या फस्ट एड बॉक्समध्ये असतील तर ऐनवेळी धावपळ होणार नाही. गरजू व्यक्तीला अगदी चटकन योग्य ते प्रथमोपचार मिळू शकतील.