वय वाढू लागले की आपल्या शरीरात अनेक बदल होतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे हाडांची घनता कमी होणं. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर महिलांमध्ये हाडे ठिसूळ होण्याची क्रिया मोठ्या वेगाने सुरु होते.(Calcium Rich Foods for Strong Bones) उठता बसता गुडघे किंवा कंबरेतून कटकट असा आवाज येतो. अनेकदा साध्या पडण्यानेही फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.(Bone Density Tips for Women) अगदी कमी वयातच पाठदुखी, कंबरदुखी आणि सांधेदुखीचा त्रास जाणवू लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियमची कमी. हाडे हा आपल्या शरीराचा पाया असला तरी हा पाया कमकुवत झाला तर आपल्या संपूर्ण आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. (Osteoporosis Prevention Diet)
आपण कॅल्शियमच्या गोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा नैसर्गिक आहारातून कॅल्शियम घेतल्यास शरीराला अधिक फायदा होऊ शकतो. आपण रोजच्या जेवणात अशा काही पदार्थांचा समावेश करू शकतो, जे हाडांना लोखंडासारखे मजबूत करण्यास मदत करतात. आहारात नेमके काय खायला हवं पाहूया.
घरातील झुरळं- पाली जातील पळून, केमिकल स्प्रे सोडा, ५ नैसर्गिक उपाय - किचन राहील एकदम चकाचक
1. नाचणी हे कॅल्शियमचा सर्वात मोठा स्त्रोत मानली जाते. १०० ग्रॅम नाचणीमध्ये साधारणत: ३४४ मिलीग्रॅम कॅल्शियम असते. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर आठवड्यातून किमान २ ते ३ वेळा नाचणीची भाकरी, आंबील किंवा लाडू खावेत. यामुळे हाडांचा ठिसूळपणा कमी होतो.
2. दुधात भरपूर कॅल्शियम असते. रोज एक ग्लास कोमट दूध प्यायल्याने शरीराला आवश्यक कॅल्शियम मिळते. दुधासोबत दह्यामध्ये असणारे प्रोबायोटिक्समुळे आपलं पचन सुधारते. ज्यामुळे कॅल्शियम शोषण्यास मदत होते. दूध आवडत नसेल दुग्धजन्य पदार्थांचा आहारात समावेश करा.
3. पांढऱ्या तिळामध्ये दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम असते. रोज सकाळी १ चमचा भाजलेली तीळ चावून खाल्ल्याने हाडांच्या आरोग्यात सुधारणा होते. तिळामुले शरीराला ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सही मिळतात. जे सांध्यांसाठी चांगले असते.
4. पालक, मेथी आणि शेपू यांसारख्या पालेभाज्यांमध्ये कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन के हाडांमध्ये कॅल्शियम टिकवून ठेवण्याचे काम करते. यामुळे आहारात पालेभाज्यांचे प्रमाण वाढवणे फायदेशीर ठरते.
5. बदाम हे स्मरणशक्तीसाठीच नाही तर हाडांसाठी देखील उत्तम आहे. बदामामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण चांगले असते, जे आपल्या हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असते. रोज रात्री ५ ते ६ बदाम भिजवून सकाळी खाल्ल्याने जास्त फायदा होतो.
