Join us   

लालबुंद कलिंगड बिंधास्त खाताय? त्या कलिंगडाला इंजेक्शन तर टोचलेलं नाही? जीवावर बेतेल कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 1:07 PM

How To Identify An Injected Watermelon? : कलिंगड लालभडक दिसत असेल तर खाऊ नका..त्याला दिलंय केमिकलचे इंजेक्शन; आणि..

उन्हाळा सुरु होताच, कलिंगड, आंबे, लिंबू सरबत, संत्री यासह विविध फळे खाण्याचा मौसम सुरु होतो (Summer Special). उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं फळ म्हणजे कलिंगड (Watermelon). त्यात ९२ टक्के पाणी आणि ६ टक्के साखर असते. उन्हाळ्यात आरोग्याला बरेच फायदे कलिंगड खाल्ल्याने मिळतात. त्यात फायबरचेही प्रमाण जास्त असते. पण सध्या बाजारात नकली कलिंगडाची देखील विक्री होत आहे.

कलिंगड लवकर पिकावे म्हणून, विक्रेता त्याला केमिकल इंजेक्शन देतात. पण मग केमिकल इंजेक्शन देऊन पिकवलेले कलिंगड ओळखावे कसे? आर्टिफिशियल पद्धतीने पिकवलेले कलिंगड ओळखण्याची सोपी ट्रिक कोणती? लालबुंद-रसाळ कलिंगड खरेदी करावे का? पाहूयात(How To Identify An Injected Watermelon).

यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ प्रियांशी भटनागर सांगतात, 'कलिंगड लाल आणि रसाळ दिसण्यासाठी विक्रेता त्यावर केमिकल इंजेक्शनचा वापर करतात. कलिंगड लवकर पिकावे म्हणून त्याला ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिले जाते. जे आरोग्यासाठी घातक ठरते.'

डोसा लोखंडी तव्याला चिकटतो, नेहमी तुटतो? चमचाभर मिठाचा सोपा उपाय-डोसा होईल परफेक्ट

इंजेक्टेड कलिंगडामध्ये नायट्रेट, आर्टिफिशियल कलर, मिथेनॉल यलो, कॅल्शियम कार्बाइड आणि ऑक्सिटोसिन सारखी रसायने असू शकतात. ही रसायने पोटासाठी घातक ठरतात. शिवाय कलिंगड लवकर पिकावे म्हणून त्यावर नायट्रोजनचा वापर केला जातो. हे एक विषारी घटक असून, याने शरीराला दुष्परिणाम सहन करावा लागतो.

अन्नातून विषबाधा

कलिंगड रसाळ लालबुंद दिसण्यासाठी कृत्रिम रंगाचा वापर केला जातो. जसे की, लेड क्रोमेट, मेथनॉल यलो आणि सूडान रेड. यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. शिवाय पोटाचे विकारही वाढू शकतात.

लिव्हर-किडनी होऊ शकते डॅमेज

कलिंगड पिकवण्यासाठी बरेच जण त्यात कॅल्शियम कार्बाइडचा वापर करतात. हे कॅल्शियम कार्बाइड यकृत आणि किडनीसाठी धोकादायक ठरतात. यामुळे मूत्रपिंड देखील खराब होऊ शकते.

नाचा आणि घालवा स्ट्रेस, डोक्याची कटकट आणि वाढलेले वजन कमी करायचे तर, रिसर्च सांगते..

इंजेक्टेड कलिंगड कसे ओळखावे?

अनेक वेळा कलिंगडावर पांढरी किंवा पिवळी पावडर दिसते. ती धूळ समजून साफ करू नका. ती पावडर खरंतर कॅल्शियम कार्बाइड असू शकते. ज्यामुळे कलिंगड लवकर पिकते. या कॅल्शियम कार्बाइडचा वापर आंबा आणि केळी पिकवण्यासाठीही केला जातो. शिवाय लालबुंद कलिंगड खरेदी करू नका. अधिक लालभडक असलेला कलिंगडामध्ये केमिकल्सचा वापर जास्त झालेला असतो. त्यामुळे कलिंगड खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा. 

टॅग्स : समर स्पेशलहेल्थ टिप्सआरोग्य