lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Food > डोसा लोखंडी तव्याला चिकटतो, नेहमी तुटतो? चमचाभर मिठाचा सोपा उपाय-डोसा होईल परफेक्ट

डोसा लोखंडी तव्याला चिकटतो, नेहमी तुटतो? चमचाभर मिठाचा सोपा उपाय-डोसा होईल परफेक्ट

Dosa Sticking to Tawa-Pan-Follow These Tips : चमचाभर मीठ करेल तवा क्लिन- दाक्षिणात्य स्टाईल क्रिस्पी डोसा होईल मिनिटात रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2024 11:57 AM2024-04-29T11:57:03+5:302024-04-29T14:45:41+5:30

Dosa Sticking to Tawa-Pan-Follow These Tips : चमचाभर मीठ करेल तवा क्लिन- दाक्षिणात्य स्टाईल क्रिस्पी डोसा होईल मिनिटात रेडी

Dosa Sticking to Tawa-Pan-Follow These Tips | डोसा लोखंडी तव्याला चिकटतो, नेहमी तुटतो? चमचाभर मिठाचा सोपा उपाय-डोसा होईल परफेक्ट

डोसा लोखंडी तव्याला चिकटतो, नेहमी तुटतो? चमचाभर मिठाचा सोपा उपाय-डोसा होईल परफेक्ट

डोसा हा साउथ इंडियन पदार्थ देशभरात प्रसिद्ध आहे (Dosa Making). नाश्त्याला एक डोसा खाल्ल्याने पोट टम्म भरते. डोसा करण्याचे अनेक प्रकार आहेत. साधा डोसा, मसाला डोसा, मैसूर डोसा आपण खाल्लंच असेल (Cooking Tips). पण घरात ऑन्थेंटिक पद्धतीचा डोसा तयार करायला अनेकांना जमत नाही (Kitchen Tips). कधी डोसा तव्याला चिकटतो, तर कधी फाटतो.

परफेक्ट क्रिस्पी डोसा तयार करणं जरा अवघड वाटतं. जर डोश्याचं बॅटर व्यवस्थित तयार झालं असेल, पण डोसा वारंवार तव्याला चिटकत असेल तर, डोसा करण्याची योग्य पद्धत पाहा. डोसा तव्याला चिकटणार नाही. परफेक्ट जाळीदार डोसा काही मिनिटात तयार होईल(Dosa Sticking to Tawa-Pan-Follow These Tips).

डोसा तव्याला चिटकत असेल तर..

- डोसा तव्याला चिटकत असेल किंवा पलटी करताना तुटत असेल तर, एक ट्रिक आपल्याला उपयोगी पडेल.

- यासाठी डोसा करण्यासाठी लोखंडी तव्याचा वापर करा.

ना वाटण - ना झंझट, कपभर सोया चंक्सची करा चमचमीत भुर्जी; १० मिनिटात प्रोटीन रिच डिश रेडी

- तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. त्यावर अर्धा कप पाणी ओतून शिंपडा, आणि सुती कापडाने तवा पुसून काढा.

- तवा पुसून काढल्यानंतर त्यावर एक चमचा मीठ शिंपडून पसरवा. नंतर एक टिश्यू घ्या. त्याने तव्याला रगडून पुसून काढा, व मीठ एका बाऊलमध्ये काढून ठेवा.

- नंतर त्यावर एक छोटा चमचा तेल ओता. पुन्हा त्यावर अर्धा चमचा मीठ शिंपडा, आणि टिश्यूने पुन्हा तवा रगडून स्वच्छ करा. जेणेकरून तवा क्लिन होईल. रगडून झाल्यानंतर मीठ एका बाऊलमध्ये काढून घ्या, आणि सुती कापडाने तवा पुसून स्वच्छ करा.

२ बटाटे-कपभर रवा, चमचाभर तेलामध्ये करा बटाट्याचे अप्पे; १० मिनिटात क्रिस्पी नाश्ता रेडी

-  आता तव्यावर पाण्याचे काही थेंब शिंपडा, आणि सुती कापडाने तवा पुसून काढा. अशा प्रकारे आपला तवा डोसा तयार करण्यासाठी रेडी.

- चमचाभर बॅटर तव्यावर ओता, आणि हलक्या हाताने पसरवा. डोश्यावर चमचाभर तेल सोडा, व दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या. अशा प्रकारे तव्याला न चिकटता जाळीदार डोसा तयार होईल.

Web Title: Dosa Sticking to Tawa-Pan-Follow These Tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.