दिवाळी म्हटलं की उत्साह, आनंद, दिव्यांची रोषणाई आणि फटाक्यांचा जल्लोष! पण या आनंदाच्या वातावरणात कधी कधी निष्काळजीपणामुळे क्षणात घडू शकतो तो अपघात. (Diwali firecracker burn treatment) दिवाळीत फटाके फोडताना अनेकदा आपल्या लहान-सहान चुकांमुळे मुलांच्या हाताला भाजण्याची शक्यता अधिक असते. लहान मुले खूप खेळकर असतात, उत्सुकतेपोटी फटाके फोडायला जातात. (first aid for fire burns) ज्यामुळे त्यांना भाजतं किंवा चटका लागतो. ही गोष्ट सामान्य वाटत असली तरी कधी कधी जखम गंभीर होते. (what to do if hand burns during Diwali)भाजल्यामुळे त्वचेला जखम, वेदना होतात. भाजल्यावर आग, जळजळ होते. मुलांच्या हाताला भाजल्यानंतर फोड किंवा चट्टे येऊ नयेत म्हणून काय करावं? कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? जाणून घ्या.
जळल्यास सर्वात आधी काय करावं?
1. जर मुलांचा हात भाजला असेल ताबडतोब थंड पाण्याखाली हात ठेवा. हे १० ते १५ मिनिटे करा. यामुळे जळजळ कमी होईल, सूज येणार नाही. तसेच फोड येण्याचा धोका देखील कमी होईल. बर्फ किंवा थंड पाणी थेट जळलेल्या जागेवर न लावण्याची काळजी घ्या. ज्यामुळे त्वचेला आणखी नुकसान होऊ शकते.
2. जळलेल्या जागेवर अंगठ्या, बांगड्या किंवा घट्ट कपडे असतील तर ते ताबडतोब काढून टाका. जळल्यानंतर सूज येऊ शकते, ज्यामुळे वेदना होतात.
3. जळलेल्या जागेला स्पर्श करणे किंवा घासणे टाळा. यामुळे संसर्ग होऊ शकतो आणि त्वचेचा वरचा थर निघून जाऊ शकतो. ज्यामुळे जखम खोलवर होऊ शकते.
काय करु नये?
1. टूथपेस्ट किंवा हळद लावू नका. यामुळे परिस्थिती आणखी खराब होऊ शकते. ज्यामुळे संसर्ग होऊ शकते, ज्यामुळे त्वचेला आणखी त्रास होऊ शकतो.
2. भाजलेल्या जागी बर्फ लावल्याने जखम वाढते. ज्यामुळे त्वचेचे आणखी नुकसान होऊ शकते. जर त्वचेला फोड आल्यास फोडण्याचा प्रयत्न करु नका. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. जखम जास्त मोठी असलेल तर त्वरीत डॉक्टरांना भेटा.