Join us   

How To Get Sleep Faster : रात्री लवकर अन् शांत झोप येण्यासाठी ५ उपाय; पडल्या पडल्यात ढाराढूर झोपाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2022 9:05 AM

How To Get Sleep Faster : आठवड्यातून फक्त २, ३ दिवस चांगली झोप येते बाकीचे दिवस झोप लागत नसल्यानं फोनवर टाईमपास करावा लागतो. असे काहींचे म्हणणे असते.

घर, ऑफिस तर कधी पैश्यांच्या तर कधी रिलेशनशिपमध्ये बिनसलेल्या गोष्टींची टेंशन. या सगळ्याचा परिणाम झोपेवर होत असतो. अनेकांना रात्री बराचवेळ पडून राहिल्यानंतरही झोप लागत नाही. झोप व्यवस्थित झाली नाही तर पूर्ण दिवस खराब जातो. (How To Get Sleep Quickly) आठवड्यातून फक्त २, ३ दिवस चांगली झोप येते बाकीचे दिवस झोप लागत नसल्यानं फोनवर टाईमपास करावा लागतो. असे काहींचे म्हणणे असते. म्हणूनच या लेखात तुम्हाला चांगल्या झोपेसाठी काही सोपे ५ उपाय सांगणार आहोत. (5 Natural Ways to Help You Sleep)

१) झोपण्याच्या वेळा

हे वाचण्यास गमतीशीर वाटेल पण शनिवारी किंवा रविवारी उशीरापर्यंत झोपल्यानं तुमचे स्लिप क्लॉक डिस्टर्ब होऊ शकतं. म्हणून सुट्टी असो किंवा ऑफिसचा दिवस नेहमीच एकावेळी झोपण्याची सवय ठेवा. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारून तब्येतही चांगली राहील. 3 आठवडे, जेव्हा तुम्ही झोपण्याची आणि जागे होण्याची योग्य वेळ पाळता, तेव्हा हळूहळू तुमचा मेंदू झोपेच्या वेळी झोपेची लक्षणे आपोआप देऊ लागतो.

२) खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी

कॉफी, चहा, सॉफ्ट ड्रिंक्स आणि चॉकलेट यांसारखे कॅफिन असलेले अन्न आणि पेये दुपारपर्यंतच घ्या. रात्रीचे जेवण तुमचे सर्वात हलके जेवण असावे आणि झोपेच्या काही तास आधी जेवा. मसालेदार किंवा जड पदार्थ वगळा, जे तुम्हाला छातीत जळजळ किंवा अपचनाने जागे ठेवू शकतात.

सकाळी की रात्री? दूध पिण्याची योग्यवेळ कोणती; जास्तीत जास्त फायदे मिळण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...

३) धुम्रपान सोडा

एका अभ्यासात असे आढळून आले आहे की धुम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांना रात्रीच्या पूर्ण झोपेनंतरही आराम वाटत नाही. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी याचे श्रेय निकोटीनच्या उत्तेजक प्रभावाला दिले. धूम्रपानामुळे स्लीप एपनिया आणि इतर श्वासोच्छवासाचे विकार जसे की दमा वाढतो, ज्यामुळे शांत झोप घेणे कठीण होऊ शकते.

जोरात खोकला किंवा शिंक आली तर नकळत लघवी होऊन जाते? हा आजार कशानं होतो? उपाय काय?

४) डिजिटल उपकरणांपासून लांब राहा

झोपायला जाताना लाईट्स बंद करा. रूम शक्य तितकी गडद करा. जेणेकरून शांत झोप लागेल.  झोपण्यापूर्वी मोबाईल फोन वापरल्यानेही झोप येण्यात समस्या निर्माण होतात. त्यामुळे झोपण्याच्या किमान 30 मिनिटे आधी टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप इत्यादी वापरणे बंद करा. अनेकवेळा चिंता आणि तणावामुळे झोपेत अडचण येते, त्यामुळे ध्यान करा जेणेकरून मन शांत होईल आणि मग तुम्हाला चांगली झोप लागेल.

५) लवकर झोपण्याची लष्करी ट्रिक

मेलेट्री ट्रिकसाठी सर्व प्रथम आपल्या सर्व स्नायूंना आराम द्या. तसेच तोंडाच्या आत जीभ आणि ओठ शांत करा. खांदे सैल सोडा आणि हात बाजूला पसरवा. पूर्णपणे श्वास सोडा रिलॅक्स व्हा. आता तुमचे पाय, मांड्या रिलॅक्स सोडा. 10 सेकंदांसाठी तुमचे मन शांत करणाऱ्या दृश्याची कल्पना करा आणि इतर कशाचाही विचार करू नका.  10 सेकंदात हळूहळू विचार करणं पूर्ण बंद करा. यामुळे फक्त १० सेकंदात तुम्हाला झोप येईल.   

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य