अनेक जणांना सध्या दातांच्या समस्या जाणवत आहेत. यात अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळेच आहेत. कोणाच्या दातांचा पिवळेपणा जाता जात नाही (how to get rid of yellow teeth?) तर कोणाच्या दाढी किडल्या आहे. थंड- गरम पदार्थ खाल्ल्यानंतर दात ठणकण्याचे प्रमाण तर खूप जास्त आहे. असा दातांच्या संदर्भातला कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करा (how to get rid of teeth sensitivity and cavity?). नियमितपणे हा उपाय केल्यास अवघ्या काही दिवसांतच दातांच्या तक्रारी दूर होतील.(home remedies for sensitive teeth and cavity)
दातांसंबंधी सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी घरगुती उपाय
दातांचं दुखणं कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती deepa_sheoran या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
अंगाला कितीही पक्का रंग लागला तरी १५ मिनिटांत निघून जाईल- ३ सोप्या ट्रिक, बिंधास्त खेळा
हा उपाय करण्यासाठी १ लीटर पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये २५ ग्रॅम तुरटी आणि २५ ते ३० लवंग घाला आणि त्यावर झाकण ठेवून साधारण १० ते १२ तास ते पाणी तसेच राहू द्या. यानंतर तुरटी पाण्यामध्ये पुर्णपणे विरघळून जाईल तर लवंगांचा सगळा अर्क पाण्यात उतरेल.
आता हे पाणी एका बाटलीमध्ये भरून ठेवा आणि दररोज रात्री ब्रश केल्यानंतर या पाण्याने गुळणा करा. गुळणा केल्यानंतर काहीही खाणे- पिणे पुर्णपणे टाळावे.
लवंग आणि तुरटीच्या पाण्याने गुळणा करण्याचे फायदे
१. दातांना किड लागणार नाही.
२. दातांवर जमलेला पिवळटपणा तसेच चिकटपणा कमी होण्यास मदत होईल.
३. कोणत्याही प्रकारचे माऊथ इन्फेक्शन झाले असल्यास हा उपाय उत्तम आहे.
४. थंड- गरम पदार्थ खाल्ल्यानंतर दात ठणकणे बंद होईल.
५. काही लोकांच्या तोंडातून नेहमीच दुर्गंधी येते. त्यांचा हा त्रास सुद्धा या उपायामुळे कमी होईल.
६. हिरड्यांमधून रक्त येणे थांबेल.
७. हा उपाय केल्यामुळे कफ आणि खोकल्याचा त्रास सुद्धा कमी होईल.