Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > २ वेळा घासूनही दात पिवळेच दिसतात? चमचाभर मिठात मिसळा '१' तेल; चमकदार दातांचं सिक्रेट

२ वेळा घासूनही दात पिवळेच दिसतात? चमचाभर मिठात मिसळा '१' तेल; चमकदार दातांचं सिक्रेट

How to Get Rid of Yellow Teeth - 5 Natural Ways : तोंड उघडताच दुर्गंधी आणि पिवळट दातांमुळे त्रस्त झाले असाल तर, ५ घरगुती उपाय करून पाहा-दात चमकतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2024 04:21 PM2024-05-19T16:21:28+5:302024-05-19T21:46:27+5:30

How to Get Rid of Yellow Teeth - 5 Natural Ways : तोंड उघडताच दुर्गंधी आणि पिवळट दातांमुळे त्रस्त झाले असाल तर, ५ घरगुती उपाय करून पाहा-दात चमकतील..

How to Get Rid of Yellow Teeth - 5 Natural Ways | २ वेळा घासूनही दात पिवळेच दिसतात? चमचाभर मिठात मिसळा '१' तेल; चमकदार दातांचं सिक्रेट

२ वेळा घासूनही दात पिवळेच दिसतात? चमचाभर मिठात मिसळा '१' तेल; चमकदार दातांचं सिक्रेट

दात स्वच्छ करण्यासाठी आपण दररोज दात घासतो (Teeth Cleaning). बऱ्याचदा दात घासूनही पिवळेपणा निघत नाही. दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्टचा वापर करतो, किंवा पिवळेपणा घालवण्यासाठी डेण्टिस्टकडे जातो. ज्यामुळे खर्चही वाढतो(Yellow Teeth).

अनेकदा तोंडातून दुर्गंधीही येते. दात अस्वच्छ राहण्यामागे अनेक कारणे असू शकतात (Health Tips). दात वेळेवर साफ न करणे, धूम्रपान, मद्यपान आणि कॅफीनचे जास्त सेवन केल्यामुळेही दात पिवळट दिसतात. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण घरगुती उपाय देखील करू शकता(How to Get Rid of Yellow Teeth - 5 Natural Ways).

ओरल हेल्थ फाउंडेशनच्या मते, 'योग्य प्रकारे ब्रश न केल्याने दातांवर प्लाक आणि टार्टर तयार होऊ शकतात. ज्यामुळे दात पिवळे होऊ शकतात. जे हिरड्यांच्या पृष्ठभागावर जमा होतो. जेव्हा आपण अन्न खातो. विशेषतः साखर आणि स्टार्च असलेले पदार्थ, तोंडातील बॅक्टेरिया आम्ल तयार करण्यासाठी त्यांचा वापर करतात. हे अॅसिड दातांच्या पृष्ठभागावर चिकटून प्लाक तयार करतात. हे घालवण्यासाठी आपण घरगुती उपाय करू शकतात.'

ना डाळ - ना सोडा, कपभर तांदुळ घ्या, करा मऊ जाळीदार नारळाचा डोसा! पौष्टिक आणि पोटभर

मीठ आणि मोहरी तेल

दातांवरचा पिवळेपणा घालवण्यासाठी आपण मीठ आणि मोहरीच्या तेलाचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत एक चमचा मीठ घ्या. त्यात मोहरीचं तेल घालून मिक्स करा. तयार केलेली पेस्ट दातांवर लावा आणि बोटांच्या टोकांनी मसाज करा. दात स्वच्छ करण्यासोबतच हिरड्याही मजबूत होतील.

ऍपल सायडर व्हिनेगर

ऍपल सायडर व्हिनेगरचा वापर आपण माऊथवॉश म्हणून करू शकता. यामुळे दातांचा पिवळेपणा हळूहळू कमी होईल. पण याचा थेट वापर करू नका. त्यात पाणी मिसळून माऊथवॉश करा.

संत्र्याची साल

ताज्या संत्र्याच्या सालीनेही आपण दात स्वच्छ करू शकता. त्याच्या सालीच्या आतील भागात व्हिटॅमिन सी असते, त्यामुळे तो भाग हलक्या हातांनी दातांवर घासल्याने दातांचा पिवळसरपणा दूर होईल.

बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस

अर्धा चमचा बेकिंग सोडामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा, टूथब्रशवर लावा आणि हळूवारपणे दात घासून घ्या. या मिश्रणाने आपले दात चमकतील.

मोहरीचे तेल आणि हळद

१ रुपयाही खर्च न करता सुटलेलं पोट कमी करायचं? वाचा विराट कोहलीच्या न्यूट्रिशनिस्टने दिलेला सल्ला

मोहरीच्या तेलात थोडी हळद मिसळून पेस्ट तयार करा आणि टूथब्रशवर घेऊन दात घासा. मोहरीच्या तेलातील गुणधर्म आणि हळदीमुळे दातांचा पिवळेपणा नक्कीच दूर होईल.

Web Title: How to Get Rid of Yellow Teeth - 5 Natural Ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.