Join us
Daily Top 2 Weekly Top 5

हिवाळ्यात खाज खूप येते? 'या' चुका ठरतात कारणीभूत, समस्या वाढते..

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:20 IST

थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना खाज येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात त्वचेच्या सुरक्षेची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये अनेकांना खाज येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. हिवाळ्यात त्वचेच्या सुरक्षेची काळजी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे, कारण या काळात त्वचा जास्त कोरडी होऊ शकते ज्यामुळे खाज येणं स्वाभाविक आहे. यामागे कोणकोणती कारणं आहेत आणि हे कसं टाळता येईल ते जाणून घेऊया...

हिवाळ्यात खाज येणं का वाढतं?

हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते, थंड वाऱ्याचा प्रभाव आणि अशावेळी जास्त गरम पाणी वापरल्याने खाज सुटते. ही स्थिती स्वतःसाठी हानिकारक ठरत नाही, परंतु असं असूनही ते एखाद्यासाठी त्रासाचं कारण बनू शकतं. याशिवाय अनेक दिवस तेच तेच कपडे घातल्यानेही खाज येऊ शकते.

हिवाळ्यात खाजेपासून अशी करा सुटका

मॉइश्चरायझर लावा

हिवाळ्यात तुमची त्वचा मॉइश्चराइज ठेवण्यासाठी नियमितपणे मॉइश्चरायझर वापरा. यामुळे त्वचा कोरडी होणार नाही आणि खाज येणं कमी होईल. जर तुम्हाला घरगुती उपाय करायचा असेल तर शरीरावर मोहरीचं तेल देखील लावलं जातं.

जास्त गरम पाणी वापरू नका

आंघोळीसाठी आणि पिण्यासाठी खूप जास्त गरम पाणी वापरल्याने शरीरात आणि त्वचेत कोरडेपणा येऊ शकतो, ज्यामुळे खाज येण्याचा धोका वाढतो, म्हणून नॉर्मल किंवा कोमट पाणी वापरा.

थंड वारा टाळा

थंड वाऱ्यात बाहेर जाताना त्वचेचं संरक्षण करण्यासाठी मफलर आणि टोपीचा वापर करा. असं केल्याने, तुम्ही आजारी पडणार नाही तसेच खाज देखील टाळू शकाल.

सकस आहार घ्या

सकस आहार घेणं ही निरोगी राहण्याची पहिली अट आहे, खाज येण्याबाबतही असंच म्हणता येईल. त्यामुळे आहारतज्ज्ञांच्या सल्ल्याने ताजी फळं आणि भाज्यांचं सेवन करा.

हायड्रेटेड राहा

थंडीच्या दिवसात कमी तहान लागते. त्यामुळे आपण पाणी कमी पितो, पण असं करणं चुकीचं आहे. जर तुम्हाला खाज आणि कोरडेपणा टाळायचा असेल तर पुरेसे पाणी प्या.

स्वच्छ कपडे घाला

हिवाळ्यात बरेच लोक तेच कपडे खूप काळ घालतात, ज्यामुळे कपड्यांमध्ये बॅक्टेरिया जमा होऊ लागतात. त्यामुळे कपडे नीट धुवा, वाळवा आणि मगच घाला.  

टॅग्स : थंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्स