Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आमवाताचं दुखणं असेल तर सकाळी उठताच जाणवतात 'ही ' लक्षणं- वेळीच सावध होऊन ५ उपाय करा

आमवाताचं दुखणं असेल तर सकाळी उठताच जाणवतात 'ही ' लक्षणं- वेळीच सावध होऊन ५ उपाय करा

Rheumatoid and Arthritis: आपल्याला आमवाताचा त्रास होत आहे, हे कसं ओळखायचं आणि त्यासाठी काय उपाय करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2026 14:40 IST2026-03-30T14:39:17+5:302026-03-30T14:40:08+5:30

Rheumatoid and Arthritis: आपल्याला आमवाताचा त्रास होत आहे, हे कसं ओळखायचं आणि त्यासाठी काय उपाय करायचे?

how to get rid of Rheumatoid and arthritis, symptoms of Rheumatoid and arthritis, ayurvedic remedies for Rheumatoid and arthritis | आमवाताचं दुखणं असेल तर सकाळी उठताच जाणवतात 'ही ' लक्षणं- वेळीच सावध होऊन ५ उपाय करा

आमवाताचं दुखणं असेल तर सकाळी उठताच जाणवतात 'ही ' लक्षणं- वेळीच सावध होऊन ५ उपाय करा

बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काही ना काही त्रास होत असतो. पण तो नेमका कशामुळे होत आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे योग्य ते उपाय करता येत नसल्याने आपण कित्येक दुखणी अंगावर काढतो. आमवात हा त्यापैकीच एक. जेव्हा शरीरातल्या न पचलेल्या अन्नाचा रस आणि वात या दोन्ही गोष्टी एकत्र येतात, तेव्हा तो आमवातचं दुखणं सुरू होतं.. हा त्रास हल्ली बऱ्याच लोकांना होतो आहे. याची लक्षणं कोणती (symptoms of Rheumatoid and arthritis) आणि आमवाताचा त्रास होऊ नये म्हणून काय उपाय करायचा ते पाहूया.(ayurvedic remedies for Rheumatoid and arthritis)

 

आमवाताची लक्षणं कोणती?

१. सकाळी झोपेतून उठल्यानंतर बोटांची पेरं दुखणं, त्यांची हालचाल सहज पद्धतीने न होणं.

२. सकाळी उठल्यानंतर काही वेळ सांध्यांची हालचाल करणं कठीण होणे.

रात्रीच्या जेवणासाठी करा कोकोनट राईस, उन्हाळ्यात पोटाला गारवा देणारा पदार्थ- करायलाही अगदी सोपा 

३. सगळं शरीरच आखडून गेल्यासारखं वाटणे आणि हाडं दुखणे.

४. थंड, ढगाळ वातावरणात अंगावर सूज येणे आणि सांधे जास्तच दुखणे.

आमवाताचा त्रास कमी करण्यासाठी उपाय

 

१. आमवाताचा त्रास कमी करण्यासाठी एरंडेल तेल म्हणजेच कॅस्टर ऑईल खूप उपयुक्त ठरतं.

वर्षांनुवर्षे जुने पिगमेंटेशन ३० दिवसांत होतील गायब, लावा पपईचा 'हा' फेसमास्क, त्वचा होईल नितळ- स्वच्छ

एरंडेल तेल तुम्ही पोटातूनही घेऊ शकता किंवा मग जे सांधे दुखत आहेत त्यांच्यावर बाहेरून लावून त्यांना मसाज करू शकता. हा उपाय काही दिवस नियमितपणे करून पाहा आणि त्याच्या जोडीलाच पुढे सांगितलेला एक उपायही करा..

 

२. आमवात कमी करण्यासाठी सुंठ देखील अतिशय उपयुक्त ठरते. सुंठीचा काढा करण्यासाठी २ कप पाणी घ्या. त्यामध्ये १ चमचा सुंठ पावडर घालून ते पाणी उकळवा.

थायरॉईडचा त्रास? ५ पदार्थ चुकूनही खाऊ नका, दुखणं वाढेल- आहारात करा थोडासा बदल

पाणी उकळून अर्धे झाल्यानंतर हा काढा प्या. या काढ्यामध्येच एरंडेल तेल घालून प्यायल्यास अधिक उत्तम. ही माहिती आयुर्वेदिक डॉक्टरांनी ayurveda.lifestyle.hub या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 
 


 

Web Title : आमवात के शुरुआती लक्षणों को पहचानें और इन 5 उपायों को अपनाएं

Web Summary : सुबह की जकड़न, जोड़ों का दर्द और बदन दर्द आमवात के लक्षण हैं। अरंडी के तेल की मालिश और अदरक के काढ़े से लक्षणों को प्रबंधित करें। आयुर्वेदिक उपचार से राहत मिल सकती है।

Web Title : Recognize Rheumatoid Arthritis Early Symptoms and Apply These 5 Remedies

Web Summary : Early morning stiffness, joint pain, and body aches are common signs of Rheumatoid Arthritis. Manage symptoms with castor oil massages, ginger decoction. Ayurvedic remedies can provide relief.