शरीरात लोह कमी प्रमाणात असेल तर आपोआपच शरीरातले रक्तही कमी होते. म्हणजेच हिमोग्लोबिन कमी होते. अशा व्यक्तींना ॲनिमिया असतो. सतत थकवा येणं, गळून गेल्यासारखं वाटणं, त्वचा निस्तेज होणं असे त्रास होतात. अंगात रक्तच कमी असल्याने या व्यक्तींना ताकदच पुरत नाही. अंगात बळ नसल्याने ते कायम आळसावलेले असतात. भारतात तर ॲनिमिया असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण खूप आहे. विशेषत: महिलांमध्ये, तरुण मुलींमध्ये ॲनिमियाचा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो. तो कमी करून हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं आणि काय टाळायचं ते पाहा..(how to get rid of iron deficiency?)
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काय उपाय करावे?
डॉ. जोसेफ सलहब यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या माहितीनुसार आयर्नच्या सप्लिमेंट्स घेण्यापेक्षा खाद्यपदार्थांमधून जे लोह शरीराला मिळतं, ते शरीरात जास्त लवकर शोषून घेतलं जातं.
थंडीत ज्येष्ठमधाची काडी चघळा आणि केसांनाही लावा, जावेद हबीब सांगतात काळ्याभोर केसांचा उपाय
त्यासाठी डाळी, हरबरे, राजमा, पालक, भोपळ्याच्या बिया असे पदार्थ अधिकाधिक प्रमाणात खायला हवेत. हे लोहयुक्त पदार्थ जर तुम्ही व्हिटॅमिन सी देणाऱ्या पदार्थांसोबत खाल्ले तर शरीरात लोह अधिक चांगल्या प्रमाणात शोषून घेतलं जातं. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढवायचं असेल तर किवी, बेरीज, अननस, संत्री किंवा मोसंबी असे व्हिटॅमिन सी देणारे पदार्थही जास्त प्रमाणात खायला हवे.
हिमोग्लोबिन वाढण्यासाठी बाजारात आयर्न रिच फोर्टीफाईड फूड मिळते. ते खाऊनही तुम्ही शरीरातलं लोह वाढवू शकता. शिवाय बीन्स, टोफू असे पदार्थ व्हिटॅमिन सी देणाऱ्या पदार्थांसोबत खाऊन पाहा.
घरीच तयार करा विकतपेक्षाही चवदार बटर, चमचाभर तूपात 'हा' पदार्थ घाला- १० मिनिटांत बटर तयार
जेवण किंवा नाश्ता झाल्यानंतर लगेचच चहा, कॉफी घेणं टाळा. कारण त्यामुळे अन्नपदार्थांमधून शरीरात जाणारं लोह शरीरात पुर्णपणे शोषून घेतलं जात नाही. सगळे घरगुती उपाय करूनही तुमचं हिमोग्लोबिन वाढतच नसेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. हा त्रास अंगावर काढू नका, असंही डॉक्टर सांगतात.
