बऱ्याचदा असं होतं की चेहरा खूप सुजलेला दिसतो. डोळ्यांखाली, गालावर सूज आल्यासारखी वाटते. त्यासोबतच काही लोकांची ढेरी, मांड्या, कंबरेच्या आसपासचा भाग, दंड, गळा, मान या ठिकाणीही खूप चरबी वाढलेली असते. शरीरावरची ही सूज असते त्यालाच आपण ब्लोटिंग असंही म्हणताे. जेव्हा आपलं शरीर अतिरिक्त पाणी शरीरात साठवून ठेवू लागतं, तेव्हा शरीरावरची चरबी वाढत जाते. ही चरबी कमी करण्यासाठी नेहा धुपियाने एक सोपा उपाय सांगितला आहे (home hacks to get rid of swollen face). ती तो उपाय नियमितपणे करते, म्हणूनच कदाचित ती आजही एवढी मेंटेन असावी. नेमका तो उपाय काय आणि कसा करायचा ते पाहूया..(how to reduce Facial Swelling or Puffy Face?)
चेहऱ्यावरची तसेच शरीरावरची सूज कमी करण्यासाठी उपाय
कपिला शर्मा शोमध्ये नेहाने असं सांगितलं होतं की ब्लोटिंग, चेहऱ्यावरची सूज कमी करून शरीराला छान आकार यावा यासाठी ते बडिशेपाचं पाणी पिते. तिने सांगितलेला हा उपाय तर उत्तम आहेच,
रकुलप्रित सिंगचं साधं- सोपं स्किनकेअर रुटीन! त्वचेसाठी केळी आणि दह्याचा 'असा' करते मस्त वापर
पण तज्ज्ञ असंही सांगत आहेत की बडिशेपासोबतच इतरही काही पदार्थ पाण्यात घालून प्या. त्यामुळे फक्त चेहऱ्यावरचीच नाही तर संपूर्ण शरीरावरचीच सूज कमी होण्यास मदत होईल.
हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी एका भांड्यामध्ये २ ग्लास पाणी घ्या. त्या पाण्यात मेथ्या, ओवा, जिरे आणि बडिशेप हे सगळंच प्रत्येकी एकेक चमचा टाका. पाण्यावर झाकण ठेवून द्या.
रखरखीत केस होतील सिल्की, चमकदार- आठवड्यातून फक्त एकदा 'हा' उपाय करा, केस राहतील काळेभोर
यानंतर दुसऱ्यादिवशी हे पाणी गॅसवर गरम करायला ठेवा आणि ७ ते ८ मिनिटे चांगलं उकळवून घ्या. पाणी आटून थोडं कमी झालं की मग ते गाळून घ्या आणि गरम असतानाच घोट घोट करून प्या. हा उपाय आठवड्यातून ३ ते ४ वेळा तरी करा. अंगावरची सूज कमी होण्यास खूप मदत होईल आणि काही दिवसांतच तुम्ही एकदम स्लिम दिसू लागाल.
