Join us
Daily Top 2 Weekly Top 5

अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर चपात्या करताना पिठात मिसळा ‘हे’ चमचाभर दाणे, रोज सकाळी पोट होईल साफ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2025 12:31 IST

How to Get Rid of Constipation : Home Remedy for Stomach Cleaning Tips : natural remedies for constipation : constipation relief at home : पोट बिघडणे, शौचास नीट न होणे अशा समस्या असतील तर कणकेत मिसळा चमचाभर १ खास पदार्थ...

आपल्यापैकी अनेकांना रोज सकाळी पोट व्यवस्थित साफ न होण्याची समस्या खूप त्रास देते. इतकेच नाही तर यांचबरोबर बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅस, अ‍ॅसिडिटी अशा पोटाच्या अनेक समस्यां सतावतात, यामुळे दिवसभर थकवा, चिडचिड आणि अस्वस्थता जाणवते. या समस्यांसवर इलाज म्हणून आपण अनेक उपाय करतो परंतु यामुळे तात्पुरता आराम मिळतो, पण मूळ समस्या कमी होत नाही. अशावेळी आपल्या रोजच्या आहारात छोटासा बदल करून पोटाशी संबंधित त्रास मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. परंतु, या सर्व समस्यांवर आपल्या स्वयंपाकघरात एक अतिशय सोपा, असरदार आणि नैसर्गिक उपाय उपलब्ध आहे तो म्हणजे ओवा(How to Get Rid of Constipation).

ओवा हा फक्त एक मसाल्याचा पदार्थ नसून, पचन सुधारण्यासाठी तसेच पोटाच्या तक्रारी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचा औषधी उपाय मानला गेला आहे. चपातीच्या पिठात चमचाभर ओव्याचे दाणे मिसळून चपात्या तयार करणे. हा साधा बदल आपल्या नेहमीच्या आहारात केल्यास, पोटातील घाण साफ होऊन, पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते आणि पोटाशी संबंधित समस्यांचे प्रमाण देखील कमी होते. ओव्याचा हा साधा प्रयोग तुमच्या पोटाचे आरोग्य कसे सुधारू शकतो आणि गॅस-बद्धकोष्ठता तसेच पोट व्यवस्थित (Home Remedy for Stomach Cleaning Tips) साफ करण्यासाठी हा उपाय कसा करावा ते पाहा... 

पोटाच्या अनेक तक्रारी दूर करण्यासाठी कणकेत मिसळा चमचाभर ओव्याचे दाणे... 

जर आपल्याला पोटाची सफाई करायची असेल आणि शरीरातील सर्व घाण सहजपणे बाहेर पडावी असे वाटत असेल, तर यासाठी एक अत्यंत सोपा आणि घरगुती उपाय आहे तो म्हणजे चपातीसाठी कणीक मळताना त्यात ओवा मिसळणे. ओवा हा एक असा पदार्थ आहे की जो, प्रत्येक स्वयंपाकघरात अगदी कायम सहज उपलब्ध असतो. ओवा पिठात मिसळून खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होण्यासोबतच पोटातील घाणही सहजपणे बाहेर पडते.

ओघळलेले स्तन सुडौल होण्यासाठी घरीच करा ३ सोपे व्यायाम ! परफेक्ट फिगर दिसेल सुंदर...

कणकेत ओवा मिसळण्याची योग्य पद्धत... 

जेव्हा आपण गव्हाचे पीठ मळतो, तेव्हा त्यात १ ते २ चमचे ओवा मिसळा. याचबरोबर, ओवा हलकासा कुटून मग पिठात घाला. यात थोडेसे मीठ देखील मिसळू शकता. या पिठापासून तयार केलेल्या चापत्यांचा रोजच्या आहारात समावेश करु शकता. विशेषतः सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात या चपात्या खाव्यात. यामुळे फक्त पोटच साफ राहणार नाही, तर शरीरात हलकेपणा देखील जाणवेल.

शिळ्या भातानं चमकेल त्वचा, ५ प्रकारे लावा भाताचा पॅक-काचेसारखी कोरियन त्वचा मिळण्याचा सोपा उपाय....

अशी चपाती नेमकी कधी खावी ? 

१. सकाळच्या वेळी नाश्त्यात ओवा घातलेली चपाती खाणे सर्वात असरदार ठरते. २. जर तुम्ही रात्री खूप जास्त हेव्ही जेवण करत असाल, तर दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणात ओवा घालून तयार केलेल्या चपातीचा नक्कीच आहारात समावेश करावा.  ३. रोजच्या आहारात ओवा घातलेल्या चपातीचा समावेश केल्यास पचनसंस्था हळूहळू मजबूत होते आणि पोट नियमितपणे साफ होते. 

तुम्हांला सुद्धा पांघरुणाबाहेर एक पाय काढून झोपण्याची सवय आहे? मग पाहा नेमकं याने होत काय... 

ओवा घालून तयार केलेली चपाती खाण्याचे फायदे... 

चपातीच्या पिठात ओवा घालून तयार केलेली चपाती खाणे हा एक साधा, पण पोटाच्या आरोग्यासाठी अत्यंत असरदा उपाय आहे. ओव्यामध्ये असलेले घटक पचनसंस्थेवर थेट सकारात्मक परिणाम करतात, ज्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि अनेक समस्या कमी होतात. ओव्यामध्ये असलेले फायबर आणि आवश्यक तेल आतड्यांची हालचाल वाढवण्यास मदत करतात. यामुळे अन्न पुढे ढकलले जाते, ज्यामुळे सकाळी पोट साफ होण्यास येणारे अडथळे दूर होतात. ओव्यामध्ये नैसर्गिकरित्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल  गुणधर्म असतात. हे पचनसंस्थेतील हानिकारक बॅक्टेरिया आणि विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतात. पचन सुधारल्यामुळे आणि गॅसची निर्मिती कमी झाल्यामुळे, अ‍ॅसिडिटी आणि छातीत होणारी जळजळ यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते.

English
हिंदी सारांश
Web Title : Cumin seeds in roti dough: Remedy for indigestion and constipation.

Web Summary : Adding cumin seeds to roti dough aids digestion, relieves constipation, gas, and acidity. This simple remedy promotes gut health and facilitates regular bowel movements, reducing discomfort and fatigue.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय