Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नेहमीच थकल्यासारखं वाटतं, हिमोग्लोबीन कमी? 'हा' पदार्थ खा- अशक्तपणा झटकून मिळेल एनर्जी

नेहमीच थकल्यासारखं वाटतं, हिमोग्लोबीन कमी? 'हा' पदार्थ खा- अशक्तपणा झटकून मिळेल एनर्जी

How To Get Rid Of Anemia: हिमोग्लोबीन वाढविण्याचा हा एक सगळ्यात सोपा उपाय आहे. नियमितपणे केल्यास काही दिवसांतच फरक दिसून येईल..(best food to increase iron level or hemoglobin in body)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2025 19:33 IST2025-03-03T16:53:38+5:302025-03-04T19:33:19+5:30

How To Get Rid Of Anemia: हिमोग्लोबीन वाढविण्याचा हा एक सगळ्यात सोपा उपाय आहे. नियमितपणे केल्यास काही दिवसांतच फरक दिसून येईल..(best food to increase iron level or hemoglobin in body)

how to get rid of anemia, best food to increase iron level or hemoglobin in body, how to improve iron level in body | नेहमीच थकल्यासारखं वाटतं, हिमोग्लोबीन कमी? 'हा' पदार्थ खा- अशक्तपणा झटकून मिळेल एनर्जी

नेहमीच थकल्यासारखं वाटतं, हिमोग्लोबीन कमी? 'हा' पदार्थ खा- अशक्तपणा झटकून मिळेल एनर्जी

Highlightsहिमोग्लोबिन वाढविण्यासाठी नेमका काय उपाय केला पाहिजे?

ॲनिमियाचा त्रास असेल किंवा शरीरातील लोह कमी झाले असेल तर अशा व्यक्तींना नेहमीच गळून गेल्यासारखे होते. कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही. अंगातील ताकद कमी झाल्याने नेहमीच खूप अशक्तपणा जाणवतो. भारतात तर ॲनिमियाचे रुग्ण भरपूर प्रमाणात आहेत. शिवाय त्यातही महिलांचे प्रमाण खूप जास्त आहे. शरीरातले हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काही पदार्थ नक्कीच आपल्याला खूप मदत करू शकतात (how to improve iron level in body?). ते पदार्थ नेमके कोणते आणि ते कोणत्या पद्धतीने खायला हवे (best food to increase iron level or hemoglobin in body), याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.(how to get rid of anemia?)

 

हिमोग्लोबीन वाढविण्यासाठी मदत करणारे पदार्थ

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी नेमका काय उपाय केला पाहिजे, याविषयीची माहिती सांगणारा व्हिडीओ आहारतज्ज्ञांनी fries.to.fit या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

पुरी टम्म फुगण्यासाठी १ सोपी ट्रिक- तळताना करा 'ही' खास गोष्ट...

यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की काळ्या मनुका हा हिमोग्लोबिन वाढविण्याचा आणि ॲनिमियाचा त्रास कमी करण्याचा सगळ्यात सोपा उपाय आहे. 

हा उपाय करण्यासाठी रात्री झोपण्यापुर्वी ८ ते १० मनुका पाण्यात भिजत घाला आणि सकाळी उपाशीपोटी ते पाणी प्या. हा उपाय काही दिवस नियमितपणे केल्यास अगदी महिनाभरातच तुमच्या शरीरातली लोहाची पातळी खूप चांगल्या प्रमाणात वाढलेली दिसेल. यासोबतच काळ्या मनुका खाण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. ते नेमके कोणते ते पाहुया..

 

काळ्या मनुका खाण्याचे फायदे

१. पाण्यात भिजवलेल्या काळ्या मनुका नियमितपणे खाल्ल्यामुळे पचनशक्ती अधिक चांगली होण्यास मदत होते.

२. काळ्या मनुकांमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी त्याची मदत होते.

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना घामाघूम होता? लगेच 'हा' पंखा घ्या- किंमत वाढण्याआधीच करा स्वस्तात खरेदी 

३. काळ्या मनुकांमध्ये असणारे Lutein आणि Zeaxanthin हे घटक डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असतात. 

४. काळ्या मनुका हा व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के चा उत्तम स्त्रोत मानला जातो. 

५. ज्यांना नेहमीच ॲसिडीटीचा त्रास होतो त्यांनी काळ्या मनुका नियमितपणे खायला हव्या. कारण त्या पित्तशामक असतात.


 

Web Title: how to get rid of anemia, best food to increase iron level or hemoglobin in body, how to improve iron level in body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.