Join us

गॅसेसचा त्रास होऊन पोट फुगलं? ५ सेकंदाचा उपाय- १ मिनिटात वाटेल फ्रेश, ॲसिडीटीही कमी होईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2025 17:33 IST

Best Solution To Control Acidity And Bloating Just In 5 Minutes: ॲसिडीटी झाली असेल किंवा मग गॅसेसचा त्रास होऊन पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर हा एक सोपा उपाय करून पाहा..(how to get rid of acidity?)

ठळक मुद्दे प्रवासात खूप ॲसिडीटी होते. अशावेळी जवळ औषधी गोळ्या किंवा अन्य कोणती साधनंही नसतात. अशावेळी हा उपाय करणं खूप सोपं जातं.

खाण्यापिण्यात काही कमी जास्त झालं की अनेक जणांना पोटाचा त्रास होतो. पचनक्रिया बिघडून जाते आणि मग वेगवेगळे त्रास सुरू होतात. काही जणांना गॅसेस होऊन पोगट फुगल्यासारखं, गच्च झाल्यासारखं होतं तर काही जणांना खूप ॲसिडीटी होऊन मळमळ, उलट्या, डोकेदुखी असा त्रास होतो. असा त्रास जर वारंवार होत असेल तर त्यासाठी नेहमीच गोळ्या घेणं काही योग्य नाही (best solution to control acidity just in 5 minutes). त्यामुळेच हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय केल्यामुळे ॲसिडीटी, पोट फुगणे, गॅसेस असे तुमचे बरेच त्रास कमी होऊन खूप लवकर फ्रेश वाटेल.(how to get rid of acidity and bloating?)

 

ॲसिडीटी, गॅसेस असे त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय

ॲसिडीटी, अपचन असा त्रास कमी करण्यासाठी कोणता घरगुती उपाय करता येऊ शकतो, याविषयीची माहिती डॉक्टरांनीdr.ravikgupta या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.

वटपौर्णिमा २०२५: वडाच्या पूजेला जाताय? 'या' महत्त्वाच्या वस्तू तुमच्या पूजेच्या थाळीत असायलाच हव्या..

हा उपाय अगदी सोपा असून त्यासाठी तुम्हाला फक्त थंड पाणी लागणार आहे. हा उपाय करण्यासाठी एका ग्लासमध्ये थंडगार पाणी घ्या. आता पाण्याचा एक मोठा घोट घ्या आणि ते पाणी काही सेकंदासाठी तुमच्या तोंडात ठेवा. अगदी अलगदपणे तोंडातल्या तोंडात पाणी हलवा. ते गिळू नका.

 

काही सेकंदानंतर पाणी थुंकून टाका किंवा पिऊन घ्या. डॉक्टर असं सांगतात की हा उपाय केल्यामुळे वेगस नर्व्ह्स Vagus nerve ॲक्टीव्ह होतात आणि त्यामुळे मग पोटात वाढलेले ॲसिड न्युट्रलाईज होण्यास मदत होते. हा उपाय ४ ते ५ वेळा करा.

Vat Pournima 2025: वटसावित्री पौर्णिमेचा उपवास करताना ४ चुका करणं कटाक्षाने टाळा, नाहीतर...

यानंतर मात्र ३ ते ४ तास काहीही खाऊ नका. ॲसिडीटी, अपचनाचा त्रास एकदम बरा होईल. अनेकजणांना प्रवासात खूप ॲसिडीटी होते. अशावेळी जवळ औषधी गोळ्या किंवा अन्य कोणती साधनंही नसतात. अशावेळी हा उपाय करणं खूप सोपं जातं.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी