Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थंडीत कफ आणि खोकल्याचा त्रास, करा हा साधासोपा घरगुती उपाय, उबळ होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 17:12 IST

Ayurvedic Remedy For Mucus : फुप्फुसात कफ जमा झाल्याने इन्फेक्शन किंवा सीओपीडी आजारही होऊ शकतो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, छातीत जमा झालेला कफ तुम्ही घरातील एक गोष्ट वापरून बाहेर काढू शकता. 

Ayurvedic Remedy For Mucus : हिवाळ्यात सर्दी-खोकला होणं फारच कॉमन समस्या आहेत. पण जर फुप्फुसांमध्ये कफ जमा झाला तर त्रास जास्त होतो. खोकून खोकून व्यक्तीची हालत खराब होते. छातीत वेदनाही होतात. फुप्फुसात कफ जमा झाल्याने इन्फेक्शन किंवा सीओपीडी आजारही होऊ शकतो. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, छातीत जमा झालेला कफ तुम्ही घरातील एक गोष्ट वापरून बाहेर काढू शकता. 

या आयुर्वेदिक उपायाने फुप्फुसांमध्ये जमा झालेला कफ एका झटक्यात बाहेर निघेल. हा उपाय लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठीही फायदेशीर आहे. नॅचरोपॅथी स्पेशलिस्ट डॉ. निताशा गुप्ता यांच्यानुसार, बदलत्या वातावरणात हा उपाय नक्की करा. याने सर्दी, खोकला ताप लगेच दूर होण्यास मदत मिळेल.

डॉक्टरांनुसार सर्दी, खोकला, ताप या समस्या दूर करण्यासाठी मोठ्या वेलचीचा वापर करू शकता. याचा वापर करून लहान मुले असो वा मोठे त्यांच्या छातीत जमा झालेला कफ दूर होण्यास मदत मिळते. 

सर्दी खोकल्याचं औषध

- आधी १० ते १२ मोठ्या वेलची घ्या.

- आता या पॅनमध्ये टाकून चांगल्या भाजा.

- आता वेलची काही वेळ थंड होऊ द्या.

- नंतर या वेलचीची पावडर तयार करा.

- हे पावडर चांगलं गाळून घ्या.

गाळून झाल्यावर मोठ्या वेलचीच साल फेकण्याची चूक करू नका. यानेही तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल. या सालीचा तुम्ही हर्बल चहा तयार करू शकता. याच्या सेवनाने इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

पावडरने तयार करा कफाचं औषध

- गाळलेलं पावडर १ ते २ महिने तुम्ही स्टोर करून ठेवू शकता.

- ६ महिने ते १ वर्षाच्या मुलांना ३ ते ४ चिमुट पाडवर थोड्या मधामध्ये टाकून सकाळी, दुपारी आणि रात्री खायला द्या.

- १ वर्ष ते ५ वर्षाच्या मुलांना एक चतुर्थांश चमचा पावडर सकाळी आणि सायंकाळी मधासोबत द्या.

- ५ वर्ष ते वयस्कांना १ चमचा पावडर सकाळी आणि सायंकाळी मधासोबत मिक्स करून द्यावे.

इतरही काही नॅचरल उपाय

आलं

आल्याला नॅच्युरल डिकॉन्गेस्टेंटच्या रूपात जाणलं जातं. तेच छातीत जमा झालेला कफ बाहेर काढण्यासाठी आल्याचं सेवन फायदेशीर ठरतं. कारण आल्यामध्ये अ‍ॅंटी-व्हायरल आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुण असतात. ज्यामुळे घशात आणि छातीत जमा झालेला कफ सहजपणे बाहेर काढण्यास मदत मिळते. जर छातीत जमा कफ काढायचा असेल तर आल्याचं भाजीतून आणि चहातून सेवन करा.

कांदा

सर्दी-खोकला आणि छातीत जमा असलेला कफ दूर करायचा असेल तर कांद्याचा वापर करू शकता. कांदा ताप आणि गळ्यात खवखव असेल तेव्हाही फायदेशीर ठरतो. जर तुम्हाला छातीत कफ असण्याची समस्या असेल तर कांदा बारीक करून 6 तास पाण्यात भिजवून ठेवा. या पाण्याचं रोज 3 चमचे सेवन करा. याने तुमचा कफ दूर होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Home remedy for cough and cold relief in winter.

Web Summary : Large cardamom helps remove mucus. Roast, grind, and consume with honey. Herbal tea from the peel also helps. Ginger and onion are also beneficial.
टॅग्स : थंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्स