बऱ्याच जणांच्या बाबतीत वारंवार असं होतं की थोडं काही खाण्यात कमी जास्त झालं किंवा जेवणाच्या वेळा चुकल्या की त्यांना लगेच ॲसिडीटी होते. छातीमध्ये जळजळ होते. करपट ढेकर येतात. घशात सतत आंबट पाणी येतं. काही जणांची ॲसिडीटी एवढी भयंकर वाढते की त्यांना डोकेदुखीचा प्रचंड त्रास होतो. उलट्या होतात. असा वारंवार ॲसिडीटीचा त्रास होत असेल तर तो कमी करण्यासाठी सतत गोळ्या घेणं काही योग्य नाही (How to Get Relief From Acid Reflux?). म्हणूनच डाॅक्टरांनी सांगितलेले काही उपाय करून पाहा. यामुळे ॲसिडीटीचा त्रास कायमचा कमी होऊ शकतो, असं ते सांगत आहेत.(home remedies to get rid of acidity)
ॲसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी घरगुती उपाय
ॲसिडीटी कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करता येऊ शकतात याविषयी डॉ. पियुष मिश्रा यांनी दिलेली माहिती नवभारत टाईम्सने दिली आहे. यामध्ये डॉक्टरांनी काही घरगुती पेयं घेण्याचा सल्ला दिला आहे. ते पेयं नेमके कोणते ते पाहूया..
फक्त २० मिनिटांत उजळेल चेहरा- किचनमधले पदार्थ घेऊन घरीच करा फेशियल- पैशांचीही बचत
१. कच्ची पपई आणि कोरफडीचा ताजा गर हे दोन्ही पदार्थ एकत्र करून त्यांचा रस प्यायल्याने ॲसिडीटी कमी होऊ शकते, असं डॉक्टर सांगतात.
२. आल्याचा काढा प्यायल्यानेही ॲसिडीटी कमी होऊ शकते. आल्यामध्ये असे काही बायोॲक्टीव्ह घटक असतात जे पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत करतात. शिवाय शरीरावर येणारी सूज कमी करण्यासाठीही आलं उपयोगी ठरतं. त्यामुळे आल्याचा काढा किंवा आलं घालून केलेला कोरा चहा प्यायल्याने ॲसिडीटी कमी होते.
केस छोटे असो किंवा मोठे... 'या' हेअर ॲक्सेसरीज वापरा, हेअरस्टाईल मस्त होऊन सगळ्यांत उठून दिसाल
३. बदामाचं दूध किंवा फुल फॅट दूध प्यायल्यानेही ॲसिडीटीचा त्रास कमी होतो. ओट्सचं दूधही तुम्ही घेऊ शकता. त्यामुळेही पोटातलं ॲसिड कमी होऊन पचन चांगलं होतं.
४. याशिवाय केळी खाल्ल्यानेही ॲसिडीटीचा त्रास कमी होतो. पण हे सगळे उपाय तुमच्या जवळच्या डाॅक्टरांचा सल्ला घेऊनच करावे. कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी असल्याने प्रत्येकालाच हे उपाय लागू होतील असं नाही.
