धावपळीच्या जीवनशैलीमुळे कामाचा ताण, स्क्रीन टाइम आणि सतत कॅफीनचे सेवन यामुळे सगळ्यात जास्त झोपेवर परिणाम होतो.(Foot massage for stress relief) कितीही थकलेलो असले तरी आपल्याला काही शांत झोप लागत नाही. त्यामुळे आपल्याला निद्रानाशेच्या समस्यांचा सामना करावा लागतो.(Ayurvedic foot massage) बऱ्याच लोकांना शांत झोप लागतं नाही.(Padabhyanga benefits) झोप लागण्यासाठी आपण अनेकदा औषधे देखील घेतो परंतु, जास्त प्रमाणात औषधे खाल्ल्याने आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागतो. (Foot massage for sleep)
आयुर्वेदामध्ये शांत झोप लागण्यासाठी काही उपाय दिले आहेत. ज्याच्या मदतीने आपण अनिद्रेचा त्रास कमी करु शकतो. ज्या लोकांना शारीरिक आणि मानसिक थकवा येतो, अतिप्रमाणात तणावाचा सामना करावा लागतो.(Foot massage for menstrual cramps) त्यांनी तळपायांना मालिश करायला हवी. तळपायाचा मसाज केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदात असे अनेक मार्ग आहेत जे आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात.(How to do Ayurvedic foot massage at home) ताण कमी करण्यासाठी, पायांच्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा तजेदार करण्यासाठी आपण पादाभ्यंग करायला हवे. यामुळे आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांपासून आपली मुक्तता होऊ शकते. पादाभ्यंगाची थेरीपी कशी असते? तळपायांना कोणत्या तेलाने मालिश करायला हवी? याचा शरीरासाठी फायदा कसा होतो? जाणून घेऊया.
केस गळून झाडूसारखे पातळ झाले? आजीचा खास उपाय, केसवाढीसाठी जादुई पोटली- महिन्याभरात केस झरझर वाढतील
पादाभ्यंग हा दोन संस्कृत शब्दांपासून तयार झाला आहे. पद आणि अभ्यंग. अभ्यंग म्हणजे कोमट तेलाने मालिश करणे आणि पद म्हणजे पाय. पाय हे आपल्या शरीराचे महत्त्वाचा अवयव आहे. तर पायांचे तळवे हे शरीरातील सर्व नसांचे शेवटचे बिंदू. पादाभ्यंगाच्या मदतीने पायांमध्ये असलेल्या मार्मांमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडण्यास मदत होते, ज्यामुळे थकलेल्या शरीराला पुन्हा चालना मिळते. नियमितपणे पायांची मालिश केल्यास कसा फायदा होतो पाहूया.
आयुर्वेदानुसार तळपायांची मालिश करण्यासाठी आपण ऋतूमानानुसार तेलांचा वापर करायला हवा. तसेच आपल्याला वात किंवा पित्तदोष असेल तर तेलाने तळपायांची मालिश केल्यास फायदा होईल. उन्हाळ्यात आपण खोबऱ्याचे तेल किंवा शुद्ध तुपाने तळपायांची मालिश करायला हवी. वात दोष असेल तर खोबऱ्याचे तेल किंवा तीळाच्या तेलाने तळपायांची मालिश करा. हिवाळ्यात आपल्याला तळपायांची मालिश करायची असेल तर आपण तीळाचे तेलाने मालिश केल्यास फायदा होईल. आपल्याला सतत पित्ताचा त्रास होत असेल तर चमचाभर तूप तळपायांना लावून मालिश करायला हवी. तळपायांची मालिश करताना तेल हे शुद्ध आणि केमिकल फ्री असायला हवे.
तळपायांना मालिश कशी कराल?
तेल गरम करुन त्याला कोमट करा आणि ते तळपायांना लावा. हाताच्या मदतीने बोटांना आणि तळव्यांना गोलाकार हालचालीत मसाज करा. तसेच पायांच्या बोटांना मुळापासून टोकापर्यंत मसाज करायला हवा. तळपयांना मसाज हा रात्री झोपण्यापूर्वी केल्यास आपल्याला शांत झोप लागेल. जेवण झाल्यानंतर दीड तासांनी पायांचा मसाज करायला हवा.
तळपायांना मालिश करण्याचे फायदे?
1. तळपायांना मालिश केल्याने शरीरातील वात दोष कमी होण्यास मदत होते. जडपणा, सुन्नपणा, मुंग्या येणे आणि कोरडेपणा जाणवत असेल तर तळपायांना मालिश करुन पाहा.
2. मज्जातंतूंच्या मुळांचे पोषण सुधारायचे असेल तर तळपायांची तुपाने किंवा तेलाने मालिश करा.
3. पायांमध्ये जळजळ, डोळ्यांच्या आरोग्यासाठी आणि मासिक पाळी, PCOS-PCOD सारख्या त्रासांवर पादाभ्यंग फायदेशीर आहे.
4. निद्रानाशाची समस्या, अपुरी झोप, झोपेत सतत जाग येत असेल तर हा उपाय करुन पाहा. यामुळे ताण आणि चिंता कमी होते. पोटात गोळा किंवा गॅस होणे, स्नायू आणि सांधे मजबूत करायचे असतील तर तळपायांची मालिश करा.