सध्याची बदललेली लाईफस्टाईल आणि चुकीच्या आहारामुळे 'फॅटी लिव्हर'ची समस्या अगदी कॉमन आणि फार वेगाने वाढत आहे. लिव्हर हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा फिल्टर आहे आणि जेव्हा त्यावर चरबी जमा होते, तेव्हा लिव्हरची कार्यक्षमता मंदावते. यामुळे पचनाच्या समस्या, थकवा आणि शरीरात विषारी घटक जमा होण्यास सुरुवात होते. फॅटी लिव्हरची ही समस्या दूर कारण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, पण तसाच या समस्येवर आयुर्वेदात देखील एक खास उपाय सांगितला आहे. फॅटी लिव्हरच्या समस्येवर कोणतेही महागडे उपाय करण्यापेक्षा नैसर्गिकरित्या ही समस्या दूर करुन आराम मिळवता येतो(how to detox liver naturally).
फॅटी लिव्हरच्या समस्येवर घरगुती उपाय करून आराम मिळवण्यासाठी, स्वयंपाक घरातील लिंबू आणि काही मसाले फायदेशीर ठरु शकतात. लिंबातील व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स लिव्हरमधील टॉक्सिन्स बाहेर काढून त्याला पुन्हा सक्रिय करतात. फक्त २१ दिवस नियमितपणे हे आयुर्वेदिक लिंबू ड्रिंक घेतल्यास लिव्हर शुद्ध होऊन शरीराची ऊर्जा पुन्हा परत येऊ शकते. नॅचरोपॅथी फिजिशियन डॉक्टर नवनीत कौर भाटिया यांनी एका संकेतस्थळाला मुलाखत देताना या खास ड्रिंकची रेसिपी आणि ते पिण्याचे (ayurvedic remedy for fatty liver) फायदे सांगितले आहे. हे ड्रिंक फक्त २१ दिवसांत तुमच्या यकृताला डिटॉक्स करून त्याला पुन्हा निरोगी करण्यास मदत करते.
फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी डिटॉक्स ड्रिंक...
फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी घरच्याघरीच डिटॉक्स ड्रिंक तयार करण्याची खास पद्धत आणि त्याचे फायदे नॅचरोपॅथी फिजिशियन डॉक्टर नवनीत कौर भाटिया यांनी सांगितले आहेत. हे खास घरगुती ड्रिंक तयार करण्यासाठी आपल्याला एक लिंबू, चिमूटभर सुंठ पावडर, चिमूटभर काळीमिरी पूड आणि सैंधव मीठ आणि चमचाभर खडीसाखेरची बारीक पूड इतक्या साहित्याची गरज लागणार आहे.
ऑफिसात एकाच जागी बसून मान, पाठ, कंबर आखडली? नॅपकिनचा १ भन्नाट उपाय - दुखणं गायब, मिळेल आराम...
फॅटी लिव्हरवरील खास आयुर्वेदिक घरगुती उपाय काय आहे ?
एक लिंबू घ्या. लिंबू पूर्णपणे कापू नका. त्याऐवजी, लिंबू चार भागांमध्ये अशा प्रकारे कापा की ते खालून (तळाशी) जोडलेले राहतील (एका फुलासारखे दिसतील). लिंबाच्या चारही भागांमध्ये प्रत्येकी एक-एक चिमूट सुंठ पावडर, काळीमिरी पूड, सैंधव मीठ आणि खडीसाखरेची पूड घाला. हे लिंबू रात्री एका काचेच्या वाटीत झाकून ठेवा. यामुळे सर्व घटक रात्रभर एकत्र मिसळले जातील. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी या लिंबाचा रस तोंडात पिळा आणि त्याचा रस प्या.
लग्नानंतर स्तनांचा आकार वाढतो -बदलतो? समज-गैरसमज बाजूला ठेवा, वाचा खरं ते काय...
फॅटी लिव्हरच्या समस्येवर हा उपाय आहे असरदार...
१. लिंबू :- लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणांत असते. लिंबाचा रस लिव्हर डिटॉक्स करते आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
२. सुंठ पावडर :- सुंठ पावडर पचन सुधारते आणि सूज कमी करते. पचनशक्तीचे कार्य सुरळीत करते, ज्यामुळे शरीरातील फॅट्सचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते.
३. काळीमिरी पूड :- काळीमिरी पूड पोषक तत्वांचे शोषण सुधारते.
४. सैंधव मीठ :- इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखते. हे शरीरातील पाणी आणि मीठाचे संतुलन राखण्यास मदत करते.
५. खडीसाखरेची पूड :- खडीसाखरेत थंडावा देणारे गुणधर्म असतात, जे पोटाला थंडावा देतात.
