lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रसायनयुक्त गुळ कसा ओळखायचा? ३ टिप्स, गुळात भेसळ नाही हे सहज ओळखा..

रसायनयुक्त गुळ कसा ओळखायचा? ३ टिप्स, गुळात भेसळ नाही हे सहज ओळखा..

How to detect adulteration in jaggery : हिवाळ्यात गुळ खाण्याचं प्रमाण वाढतं पण त्या गुळातच भेसळ असेल तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2024 03:06 PM2024-01-02T15:06:11+5:302024-01-02T15:06:58+5:30

How to detect adulteration in jaggery : हिवाळ्यात गुळ खाण्याचं प्रमाण वाढतं पण त्या गुळातच भेसळ असेल तर?

How to detect adulteration in jaggery? | रसायनयुक्त गुळ कसा ओळखायचा? ३ टिप्स, गुळात भेसळ नाही हे सहज ओळखा..

रसायनयुक्त गुळ कसा ओळखायचा? ३ टिप्स, गुळात भेसळ नाही हे सहज ओळखा..

हिवाळ्यात अनेक लोकं आवर्जुन गुळ (Jaggery) खातात. बरेच फिटनेस फ्रिक लोकं साखरेऐवजी गुळाचे सेवन करतात. गुळ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. त्यातील पोषक तत्वांमुळे शरीर आतून उबदार राहते. शिवाय रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे हिवाळ्यात गुळाची मागणी वाढते. पण असली गुळ आणि नकली गुळ कोणता, यातला फरक ओळखायला आपल्याला जमतं का?

सध्या बाजारात नकली गुळही सर्रास विकले जाते. नकली गुळाच्या सेवनाने आरोग्याला अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात (Health Benefits). शिवाय गंभीर आजारांचा धोकाही वाढतो. त्यामुळे गुळ खरेदी करताना गुळाची चाचणी करूनच खरेदी करा. भेसळयुक्त गुळ कसे ओळखायचे? असली गुळ कोणते हे ओळखण्यासाठी कोणत्या टिप्स मदत करतील? पाहूयात(How to detect adulteration in jaggery).

रंगातून कळून येईल फरक

खरा गूळ त्याच्या रंगावरून ओळखता येतो. खऱ्या गुळाचा रंग हलका पिवळा किंवा किंचित तपकिरी असतो. ते स्वच्छ आणि चमकदार दिसते. त्यात काळे, पांढरे किंवा इतर रंगाचे डाग दिसत नाही. त्याच वेळी, नकली किंवा भेसळयुक्त गुळात लहान पांढरे कण किंवा डाग दिसतात. त्याचा रंग खऱ्या गुळापेक्षा गडद तपकिरी किंवा काळा असू शकतो. त्यामुळे गुळ खरेदी करताना त्याचा रंग पाहूनच खरेदी करा. 

झोपण्यापूर्वी दुध पिताय? नुसते दूध बाधू शकते, १ चिमूटभर गोष्ट घाला; वाढेल प्रतिकारशक्ती

खरेदी करताना गुळाची चव चाखा

आपण गुळाच्या चवीने देखील गुळात भेसळ आहे की नाही, हे तपासू शकता. खऱ्या गुळाची चव अतिशय सुगंधीत आणि स्वादिष्ट गोड लागते. गुळ खाताना त्यातून उसाचा गोड सुगंध येतो. त्याची चव फार गोड किंवा जास्त कडूही नसते. भेसळयुक्त गूळ खूप गोड किंवा चवीला खूप कडू लागते. भेसळयुक्त गुळामधून उसाचा सुगंध येत नाही. त्यामुळे चवीच्या आधारावर खरा आणि नकली गुळ यातला फरक समजून घ्या.

पाण्यात करा खऱ्या गुळाची चाचणी

गूळ जितका चिकट आणि कडक असेल तितका शुद्ध असतो. खरे गुळ ओळखण्यासाठी गुळ पाण्यात घालून ठेवा. जर गूळ पाण्यात पूर्णपणे विरघळला तर, समजून जा गुळ खरा आहे, किंवा नाही विरघळले तर, त्यात भेसळ आहे.

एक चमचापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन होतो? जागतिक आरोग्य संघटना म्हणते..

गुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे

- गुळामध्ये अनेक पौष्टीक घटक असतात. त्यात सोलेनियम, लोह, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे गुणधर्म आढळतात. हे सर्व घटक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

- थंड वातावरणात लोक उष्ण गुणधर्माचे पदार्थ खातात. गुळात देखील उष्ण गुणधर्म असतात. ज्यामुळे बॉडीला थंडीचा जास्त त्रास होत नाही.

- गुळामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे हाडांना बळकटी मिळते. शिवाय सर्दी खोकलाही बरा होण्यास मदत होते. 

Web Title: How to detect adulteration in jaggery?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.