Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ना तुमचं वजन वाढणार, ना डायबिटीस होणार- डॉक्टर सांगतात जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा 

ना तुमचं वजन वाढणार, ना डायबिटीस होणार- डॉक्टर सांगतात जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा 

Health Tips To Control Weight And Sugar: वजन आणि शुगर नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर डाॅक्टरांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट रोज करायला विसरू नका.(how to control weight and sugar?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2026 12:48 IST2026-01-19T12:47:51+5:302026-01-19T12:48:44+5:30

Health Tips To Control Weight And Sugar: वजन आणि शुगर नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर डाॅक्टरांनी सांगितलेली एक महत्त्वाची गोष्ट रोज करायला विसरू नका.(how to control weight and sugar?)

how to control weight and sugar, simple tips by doctor to keep weight and sugar in control  | ना तुमचं वजन वाढणार, ना डायबिटीस होणार- डॉक्टर सांगतात जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा 

ना तुमचं वजन वाढणार, ना डायबिटीस होणार- डॉक्टर सांगतात जेवणानंतर फक्त १ गोष्ट करा 

Highlightsडॉक्टर सांगतात शरीरातली शुगर वाढू द्यायची नसेल तर नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर आठवणीने....

बदललेल्या जीवनशैलीचा मोठा परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळेच तर हल्ली वाढतं वजन आणि वाढलेली शुगर या दोन समस्या अनेकांना छळत आहेत. मधुमेहाची समस्याही खूप वाढली आहे. काही अपवाद सोडले तर आपल्याकडे घरोघरी मधुमेहाचे पेशंट झाले आहेत. मधुमेह एकदा मागे लागला की तो आयुष्यभर पाठ सोडत नाही. त्यामुळे तो झाल्यानंतर पश्चाताप करण्यापेक्षा होऊच नये म्हणून प्रयत्न केले तर ते जास्त चांगले (Health Tips To Control Weight And Sugar). म्हणूनच मधुमेह होऊ नये किंवा झालेला असला तरी रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासाठी आणि वजन नेहमीच आटोक्यात राहण्यासाठी काय करावं याविषयी डॉक्टरांनी एक अतिशय महत्त्वाचा आणि खूप सोपा असा उपाय सुचवला आहे.(simple tips by doctor to keep weight and sugar in control)

 

वजन आणि शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी उपाय

वजन आणि शुगर या दोन्ही गोष्टी नेहमीच आटोक्यात ठेवायच्या असतील तर त्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr_shikhasingh या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यांनी खूप उत्कृष्ट पद्धतीने वजन आणि शुगर वाढण्याचं कारण समजावून सांगितलं आहे.

वर्किंग वुमनसाठी ऋजुता दिवेकर सांगतात ३ खास गोष्टी, न थकता नेहमीच राहाल ॲक्टीव्ह

त्या म्हणतात की जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा शरीरात ग्लुकोज तयार होतं आणि ते रक्तामध्ये मिसळतं. हे ग्लुकोज नियंत्रित ठेवण्याचं काम इन्सुलिनमार्फत होत असतं. त्या ग्लुकोजमधून शरीरासाठी उर्जा तयार होते. जे जास्तीचं ग्लुकोज असतं ते लिव्हर आणि स्नायूंमध्ये स्टोअर केलं जातं आणि त्याहीपेक्षा जे जास्तीचं असतं ते शरीरात फॅट्सच्या स्वरुपात साचत जातं किंवा रक्तामध्येच राहातं. त्यामुळे मग वजनही वाढतं आणि रक्तातली साखरही वाढते असं होऊ नये म्हणून काय करावं ते पाहा..

 

डॉक्टर सांगतात की वर सांगितलेल्या पद्धतीने शरीरातली शुगर वाढू द्यायची नसेल तर नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर आठवणीने न विसरता शतपावली जरुर करा. नाश्ता असो किंवा जेवण असो एका जागी बसून राहण्याची चूक करू नका.

सकाळी पोट साफ व्हायला रोजच त्रास होतो? 'ही' फळं खा, अपचनाचा त्रास नेहमीसाठी थांबेल

कारण त्यामुळे ग्लुकोज एनर्जीमध्ये रुपांतरीत होण्याऐवजी शरीरात फॅट्सच्या स्वरुपात किंवा रक्तामध्ये साखरेच्या स्वरुपात वाढत जातं. आणि त्यामुळे वजनवाढीची तसेच मधुमेहाची समस्या वाढत जातं. म्हणून डॉक्टर सांगतात की जेवणानंतर १० ते १५ मिनिटे चालणे, हा सोपा नियम पाळला तर वजन आणि शुगर दोन्हीही कंट्रोलमध्ये राहण्यास नक्कीच मदत होईल. 


 

Web Title : वजन और मधुमेह नियंत्रण: डॉक्टर का भोजन के बाद का सरल उपाय

Web Summary : डॉक्टर वजन और रक्त शर्करा को प्रबंधित करने के लिए एक सरल समाधान सुझाते हैं: भोजन के बाद 10-15 मिनट तक चलें। यह ग्लूकोज को वसा के रूप में संग्रहीत करने के बजाय ऊर्जा में परिवर्तित करने में मदद करता है, जिससे वजन बढ़ने और मधुमेह को रोका जा सकता है। नाश्ते, दोपहर के भोजन और रात के खाने के बाद इस नियम का पालन करें।

Web Title : Control weight and diabetes: Doctor's simple after-meal tip

Web Summary : Doctors suggest a simple solution to manage weight and blood sugar: walk for 10-15 minutes after meals. This helps convert glucose into energy instead of storing it as fat, preventing weight gain and diabetes. Follow this rule after breakfast, lunch, and dinner.