मधुमेह हा सध्याच्या काळातील सर्वात कॉमन आणि गंभीर आजार. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणत्याही वयात हा आजार होऊ शकतो.(diabetes diet plan) शरीरातील साखर वाढली की पुन्हा त्याला नियंत्रणात आणण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागते.(diabetes control tips) औषधं, इंजेक्शन, डाएट, व्यायाम हे सगळं करुनही आपल्याला मधुमेहाचा त्रास सहन करावा लागतो. (nutritionist advice for diabetes)
मधुमेहाचे सगळ्यात महत्त्वाचे कारण चुकीची जीवनशैली आणि आहार. या कारणांमुळे लहान वयातच मधुमेहाच्या समस्येला सामोरे जावे लागते.(sugar level control naturally) त्यासाठी आहाराकडे आपण लक्ष द्यायला हवे. कधीकधी हा आजार आनुवांशिक देखील असतो. त्यासाठी आपण जास्त काळजी घ्यायला हवी.(type 2 diabetes management) मधुमेहाचा आजार हा आपल्याला जास्त प्रमाणात तणाव, अपुरी झोप, चुकीचे खाणं आणि आरोग्याची काळजी न घेणे यामुळे होतो.(diabetes-friendly Indian diet plan) शरीरातील साखर वाढली की, मधुमेह होण्याचा धोका अधिक वाढतो. प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ लिमा महाजन यांनी इंस्टाग्रामवरुन एक व्हिडीओ शेअर केला. त्या म्हणतात की, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपण १०-१०-१० चा नियम फॉलो करायला हवा.
नूडल्स खाल्ल्याने येतात मातृत्वात अडचणी? वाढतो अनेक आजारांचा धोका- डॉक्टरांनी दिला इशारा
मधुमेहासाठी १०-१०-१० चा नियम काय आहे?
1. पोषणतज्ज्ञ म्हणतात की, एकाच जागी बसून राहिल्याने किंवा कोणतीही शारीरिक हालचाल न केल्यास स्नायू ग्लुकोजचा योग्य वापर करु शकत नाहीत. त्यासाठी दर ४५ मिनिटांनी आपण हालचाल करायला हवी. यामुळे पायांचे मोठे स्नायू सक्रिय होतात. जे रक्तातील शुगर नियंत्रित करतात, जी ऊर्जा म्हणून वापरली जाते. ज्यामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही.
2. जेवल्यानंतर रक्तातील साखर वेगाने वाढते. एका अभ्यासानुसार असं आढळून आले की, जेवणानंतर फक्त १० मिनिटे चालल्याने रक्तातील साखर सुमारे २२ मिलीग्राम/डेसीएलने कमी होऊ शकते. चालण्यामुळे स्नायूंना ग्लुकोज लवकर शोषण्यास मदत होते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सामान्य राहते.
3. आहारात आपण पांढरा ब्रेड, मैद्याऐवजी ब्राऊन राइस, ओट्स आणि बाजरी खा. अधिक भाज्या, फळे आणि डाळी खा ज्यामुळे फायबर रक्तातील साखरेची वाढ कमी करेल. गोड पदार्थ आणि जास्त साखर असलेले पेय टाळा. मधुमेह नियंत्रित करण्यासाठी डाएट पुरेसे नाही तर दिवसभरात हालचाल करणे, पुरेशी झोप घेणे आणि योग्य खाण्यापिण्यामुळे आपल्याला अधिक फरक जाणवेल.