बदललेल्या जीवनशैलीमुळे हल्ली कमी वयातच वेगवेगळे आजार मागे लागत आहेत. यापैकी एक आजार म्हणजे शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढणे. शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढलं की रक्तपेशी ब्लॉक होतात आणि त्याचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. जर तुमचा आहार व्यवस्थित असेल आणि योग्य ती शारीरिक हालचाल म्हणजेच व्यायाम तुम्ही नियमितपणे करत असाल तर कोलेस्टेरॉलचं प्रमाण नक्कीच कमी होऊ शकतं (how to control bad cholesterol?). त्यासाठी कोणते पदार्थ खायला हवेत आणि कोणते टाळायला हवेत याविषयीची डॉक्टरांनी दिलेली ही खास माहिती..(food that helps to reduce cholesterol level)
शरीरातलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करणारे पदार्थ
शरीरातलं कोलेस्टेरॉल वाढू नये यासाठी ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असणारे अन्नपदार्थ पूर्णपणे टाळले पाहिजेत. म्हणजेच जंक फूड, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, खूप जास्त बटर लावलेले पदार्थ खाणं टाळायला हवं.
६- ७ दिवस गजरे राहतील फ्रेश, सुगंधी- बघा नवरात्रीमध्ये घरोघरी उपयोगी येणारी खास ट्रिक
त्यासोबतच तुमच्या आहारात ऑलिव्ह ऑइल, सुकामेवा आणि फायबर जास्त प्रमाणात असणारे पदार्थ हवेत. यामध्ये तुम्ही फळं, भाज्या वेगवेगळी धान्ये असे फायबरयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ शकता.
आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांनी न्यूज १८ ला दिलेल्या माहितीनुसार कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवायचं असेल तर दररोज कमीतकमी २५ ते ३० ग्रॅम फायबर तुमच्या शरीरात गेलं पाहिजे. त्यासोबतच ओमेगा ३ देणारे पदार्थही अधिकाधिक प्रमाणात खायला हवेत. चिया सीड्स, जवस, अक्रोड या पदार्थांमधूनही ओमेगा ३ चांगल्या प्रमाणात मिळते.
फक्त ५ ब्लाऊज शिवा आणि त्यावर नेसा ५० प्रकारच्या वेगवेगळ्या साड्या, बघा भन्नाट ट्रिक
गोड पदार्थ आणि खारट पदार्थ खाण्यावरही नियंत्रण ठेवायला हवे. त्यासोबतच भरपूर पाणी प्यायला हवे. जेणेकरून शरीरातील टॉक्सिन्स जास्तीत जास्त प्रमाणात शरीराबाहेर पडतील आणि शरीरातला रक्तप्रवाह अधिक चांगला होईल. यासोबतच रोज नियमितपणे थोडा वेळ का होईना पण व्यायाम करणे अतिशय गरजेचे आहे.