Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शुगर वाढण्याची भीती विसरा! रोज फक्त १ कप 'ब्लॅक कॉफी', मधुमेहावर रामबाण उपाय - रहाल कायम फिट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2025 18:56 IST

how to consume black coffee to control diabetes : black coffee for diabetes control : best time to drink black coffee for diabetics : डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्लॅक कॉफी पिणे कसे फायदेशीर ठरते, ते पाहा...

डायबिटीस असणाऱ्यांसाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे हे फार कठीण काम असते. खाण्यापिण्यातील थोडासा निष्काळजीपणाही आरोग्यावर गंभीर आणि वाईट परिणाम करू शकतो. डायबिटीस हा लाईफस्टाईलशी निगडित असा आजार आहे, जो योग्य आहार आणि काही खास सवयींचे पालन करुन सहज नियंत्रणात ठेवता येतो. डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार आणि आपल्या लाईफस्टाईलला विशेष महत्त्व असते(best time to drink black coffee for diabetics).

डायबिटीस असेल तर काय खावे आणि काय टाळावे याबाबत अनेक शंका असतात, त्यातच कॉफी पिणे डायबिटीसच्या रुग्णांसाठी योग्य आहे की नाही, हा प्रश्न अनेकांना पडतो. साखर आणि क्रीम न घातलेली ब्लॅक कॉफी मात्र योग्य प्रमाणात घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते. ब्लॅक कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात, जे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी ब्लॅक कॉफी कधी, किती आणि कशी प्यावी, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे ठरते. दिल्लीच्या डाएटिशियन सना गिल यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत (how to consume black coffee to control diabetes) डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्लॅक कॉफी पिणे कसे फायदेशीर ठरते याबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. 

ब्लॅक कॉफी आणि मधुमेह यांचा संबंध... 

१. ब्लॅक कॉफीमध्ये मुबलक प्रमाणात पॉलीफेनॉल (Polyphenol) आणि इतर अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारतात. जेव्हा शरीर इन्सुलिनचा प्रभावीपणे वापर करते, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नैसर्गिकरित्या नियंत्रणात राहते.

२. जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याची भीती असते. ब्लॅक कॉफी रक्तातील साखरेचा हा वाढता वेग कमी करण्यास मदत करते. महत्त्वाचे म्हणजे, यात कॅलरीजचे प्रमाण अत्यंत नगण्य असल्याने मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे एक सुरक्षित आणि उत्तम पेय मानले जाते.

३. काही महत्त्वपूर्ण जागतिक संशोधनांनुसार, जे लोक दररोज मर्यादित प्रमाणात (सुमारे २-३ कप) ब्लॅक कॉफी पितात, त्यांच्यामध्ये टाइप २ मधुमेह होण्याचा धोका साधारणपणे २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो.

पालकांच्या 'या' ५ चुकांमुळेच मुलं हट्टी होतात! ओरडणं - मारणं सोडा, वेळीच सुधारा नाहीतर...

डायबिटीस असेल तर ब्लॅक कॉफी पिण्याचे फायदे... 

१. ब्लॅक कॉफी मेटाबॉलिज्मचा वेग वाढवते. यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि चरबी जाळण्याची प्रक्रिया जलद होते. वजन नियंत्रणात राहिल्यामुळे रक्तातील साखरेचे व्यवस्थापन करणे मधुमेहींसाठी सोपे जाते.

२. ब्लॅक कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील 'फ्री रेडिकल्स' कमी करतात आणि पेशींना होणारे नुकसान टाळतात. यामुळे शरीरातील अंतर्गत सूज कमी होऊन पेशी सुरक्षित राहतात.

३. मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा हृदयविकाराचा धोका असतो. ब्लॅक कॉफी रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाशी संबंधित हृदय रोगांचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

फक्त जिम, डाएटच नाही तर वेटलॉस करण्यासाठी 'इतके' तास झोपणंही आवश्यकच! वजन कमी करण्याचा सोपा उपाय..

डायबिटीस असेल तर ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत... 

मधुमेहाच्या रुग्णांनी दिवसभरात केवळ १ ते २ कप ब्लॅक कॉफी पिण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. मर्यादित प्रमाणात घेतलेली कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जर ब्लॅक कॉफी जास्त प्रमाणांत घेतली तर त्यातील कॅफीनमुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. वाढलेला रक्तदाब मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतो, कारण यामुळे किडनी आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवण्याचा धोका वाढतो.

 कॉफीचा खरा फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा ती साखर, दूध किंवा क्रीमशिवाय घेतली जाते. यामुळे रक्तातील साखरेवर योग्य प्रकारे नियंत्रण मिळवणे सहज शक्य होते. जर तुम्हाला ब्लॅक कॉफी खूप कडवट वाटत असेल, तर त्यात साखर घालण्याऐवजी चिमूटभर दालचिनी पावडर मिसळा. दालचिनी केवळ चवच वाढवत नाही, तर ती रक्तातील साखर नियंत्रित करण्यासही मदत करते. याशिवाय, तुम्ही चवीसाठी लिंबाचा रस देखील वापरू शकता. ब्लॅक कॉफी आम्लयुक्त (Acidic) असते. त्यामुळे ती पूर्णपणे रिकाम्या पोटी पिण्यापेक्षा त्यासोबत एखादा हलका स्नॅक किंवा जेवणानंतर काही वेळाने घेतल्यास पोटाला त्रास होत नाही.

सकाळी नाश्त्यानंतर किंवा वर्कआउट करण्यापूर्वी ब्लॅक कॉफी पिणे खूप फायदेशीर ठरते. यामुळे शरीराची उर्जा वाढते आणि व्यायामादरम्यान अधिक फॅट बर्न होण्यास मदत होते. रात्रीच्या वेळी कॅफीन घेतल्यास निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. शांत झोप न मिळाल्यास साखरेची पातळी वाढू शकते, त्यामुळे झोपण्यापूर्वी किमान ५ ते ६ तास आधी चुकूनही ब्लॅक कॉफी पिऊ नये.

English
हिंदी सारांश
Web Title : Black Coffee: A Natural Remedy for Diabetes, Stay Fit Forever!

Web Summary : Black coffee, rich in antioxidants, helps manage blood sugar levels by improving insulin function and boosting metabolism. Studies suggest it may reduce the risk of type 2 diabetes. Experts recommend 1-2 cups daily, without sugar or milk, ideally after breakfast or before a workout, avoiding it before bed.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह