सकाळची सुरुवात चांगली झाली तर आपला संपूर्ण दिवस उत्साहपूर्ण जातो. याउलट, सकाळी उठल्यावर पोट व्यवस्थित साफ न होणे, वारंवार टॉयलेटमध्ये जाऊनही न होणे किंवा खूप वेळ बसून राहावे लागणे ही समस्या कित्येकांना त्रास देते. पचनप्रक्रिया नीट न झाल्यास दिवसभर अंगात जडपणा, थकवा, चिडचिड आणि भूक न लागणे अशा त्रासांना सामोरे जावे लागते. दीर्घकाळ असेच चालू राहिले तर गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अगदी हार्मोन्स असंतुलनापर्यंत वेगवेगळे परिणाम शरीरावर होऊ शकतात. या समस्या फक्त शारीरिकच त्रास देत नाही, तर कामात लक्ष न लागणे आणि दिवसभर जड वाटणे अशा अनेक इतर समस्याही सोबत घेऊन येते(best drink for constipation in morning).
पोटाच्या या सगळ्या तक्रारी दूर करण्यासाठी सकाळी उठल्या उठल्या पचन सुधारणा करणारी आणि पोट साफ करण्यास मदत करणारी खास चहा प्यायची सवय लावणे अत्यंत फायदेशीर ठरते. नैसर्गिक घटकांनी तयार केलेली हर्बल मॉर्निंग टी आतड्यांना अॅक्टिव्ह करते, टॉक्सिन्स बाहेर काढते आणि बद्धकोष्ठता दूर करून दिवसाची उत्तम सुरुवात करते. सकाळी शौचास व्यवस्थित न होणे किंवा टॉयलेटमध्ये खूप वेळ बसून राहावे लागते यांसारख्या समस्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि आराम (how to cleanse stomach in the morning) मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आयुर्वेदिक चहा पिणे फायदेशीर ठरू शकते. एमबीबीएस, एमडी डॉक्टर शालिनी सिंह सोलंकी यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, त्यांनी ५ अशा नैसर्गिक चहाबदल सांगितले आहे, ज्या प्यायल्याने पोट सहजपणे साफ होते. सकाळी उठल्या उठल्या आपली नेहमीची साधी चहा पिण्यापेक्षा, कोणती चहा प्यावी जेणेकरून पोट सहज साफ होईल, ती कशी तयार करायची, केव्हा आणि किती प्रमाणात प्यावी, तसेच तिचे शरीराला मिळणारे फायदे काय ते पाहूयात...
सकाळी पोट व्यवस्थित साफ होण्यासाठी कोणता चहा प्यावा ?
१. पुदिन्याची चहा :- डॉक्टर सांगतात की, पुदिना पोटाला थंडावा देतो आणि पचनसंस्थेला आराम देतो. पुदिन्यात असलेले मेन्थॉल गॅस, अपचन आणि पोट फुगण्याची समस्या कमी करते. सकाळी रिकाम्या पोटी गरम पुदिन्याची चहा प्यायल्याने आतड्यांची हालचाल सुधारते आणि पोट सहजपणे साफ होते. एक ग्लास पाण्यात ताजी पुदिन्याची पाने धुवून घाला. पाणी अर्धे होईपर्यंत उकळून घ्या, पुदिन्याची हर्बल टी पिण्यासाठी तयार आहे.
२. जेष्ठमधाचा चहा :- जेष्ठमध आतड्यांमध्ये साचलेली घाण बाहेर काढण्यास मदत करते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या वारंवार होते, त्यांनी हलका गरम जेष्ठमधाचा चहा प्यायल्याने खूप आराम मिळू शकतो. ही चहा पोटातील जळजळ आणि ॲसिडिटी देखील कमी करते. यासाठी जेष्ठमधाचे तुकडे पाण्यात उकळून घ्या. हे पाणी कोमट करून प्या.
३. आल्याची हर्बल चहा :- आल हे पचनासाठी सुपरफूड मानले जाते. यात असलेले जिंजरॉल आतड्यांचे आरोग्य सुधारते. सकाळी हलकी गरम आल्याची हर्बल चहा प्यायल्याने पोट उबदार राहते आणि आतमध्ये साचलेले मल सहजपणे बाहेर पडते.
४. बडीशेपची चहा :- बडीशेप गॅस, बद्धकोष्ठता आणि जडपणा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर ठरते. रात्री एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप भिजत घाला आणि सकाळी ते पाणी हलके गरम करून प्या. यामुळे पचनशक्ती वाढते आणि सकाळी वेळेवर पोट साफ होते.
५. जिऱ्याचे पाणी :- तुम्ही जिऱ्याचे पाणी देखील पिऊ शकता. जिरे पचनासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. हे पोटात साचलेले टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. रात्रभर भिजवलेले जिऱ्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोट हलके आणि साफ होण्यास मदत मिळते.
या गोष्टींचीही काळजी घ्या...
१. शरीर हायड्रेटेड राहण्यासाठी, दिवसभर पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
२. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा, जसे की सॅलॅड, फळे, ओट्स आणि संपूर्ण धान्य.
३. यासोबतच रोज किमान २० ते ३० मिनिटे व्यायाम करा, ज्यामुळे संपूर्ण शरीर अॅक्टिव्ह रहाण्यास मदत मिळते.
Web Summary : Suffering from constipation? Start your day with herbal teas like mint, licorice, ginger, fennel, or cumin water. These natural remedies aid digestion, detoxify, and promote regular bowel movements for a refreshed feeling all day.
Web Summary : कब्ज से परेशान हैं? पुदीना, मुलेठी, अदरक, सौंफ या जीरा पानी जैसी हर्बल चाय के साथ अपने दिन की शुरुआत करें। ये प्राकृतिक उपचार पाचन में सहायता करते हैं, विषहरण करते हैं, और पूरे दिन ताज़ा महसूस करने के लिए नियमित मल त्याग को बढ़ावा देते हैं।