Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > तुमचे हृदय किती निरोगी व फिट आहे?घरच्याघरीच करा ३ टेस्ट - वेळीच घ्या हृदयाची काळजी...

तुमचे हृदय किती निरोगी व फिट आहे?घरच्याघरीच करा ३ टेस्ट - वेळीच घ्या हृदयाची काळजी...

How To Check Your Heart Health At Home Easy Way To Know Hear Is Healthy Or Not : How To Check Heart Health At Home 3 Simple Tips For Better Heart Health : हृदय निरोगी आहे की नाही हे तपासण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याबरोबरच करा सोप्या घरगुती टेस्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2025 14:28 IST2025-06-03T14:21:34+5:302025-06-03T14:28:47+5:30

How To Check Your Heart Health At Home Easy Way To Know Hear Is Healthy Or Not : How To Check Heart Health At Home 3 Simple Tips For Better Heart Health : हृदय निरोगी आहे की नाही हे तपासण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याबरोबरच करा सोप्या घरगुती टेस्ट...

How To Check Your Heart Health At Home Easy Way To Know Hear Is Healthy Or Not How To Check Heart Health At Home 3 Simple Tips For Better Heart Health | तुमचे हृदय किती निरोगी व फिट आहे?घरच्याघरीच करा ३ टेस्ट - वेळीच घ्या हृदयाची काळजी...

तुमचे हृदय किती निरोगी व फिट आहे?घरच्याघरीच करा ३ टेस्ट - वेळीच घ्या हृदयाची काळजी...

सध्याच्या धकाधकीच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये, आरोग्यासोबतच आपल्या हृदयाची विशेष काळजी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे. बदलत्या काळानुसार, हृदयरोग आता केवळ वयानुसार होणाऱ्या आजारांपुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत, अलिकडच्या काळात तरुणांमध्ये, अगदी ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये देखील हृदयरोगाची (How To Check Your Heart Health At Home Easy Way To Know Hear Is Healthy Or Not) समस्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडताना बघतो की, जिममध्ये व्यायाम करताना, खेळताना किंवा पार्टीत नाचताना हृदयविकाराने मृत्यू पावलेल्यांचे प्रमाण आता बरेच वाढत आहे. याचा अर्थ हृदयविकार कोणालाही होऊ शकतो, म्हणून सर्व वयोगटातील व्यक्तींनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे(How To Check Heart Health At Home 3 Simple Tips For Better Heart Health).

अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रिसर्चमधून असे दिसून आले आहे की,  २० ते ४४ वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, याचे मुख्य कारण म्हणजे अस्वस्थ जीवनशैली, ताणतणाव, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेह. तंबाखू-धूम्रपानाची सवय देखील हृदयावर परिणाम करत आहे. आपल्यापैकी अनेकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत, याची काहीच कल्पना देखील नसते, आणि वेळेवर निदान न झाल्यास गंभीर त्रास उद्भवू शकतो. यासाठीच, आपले हृदय निरोगी आहे की नाही हे तपासण्यासाठी वैद्यकीय सल्ल्याबरोबरच  आपण घरच्याघरीच काही सोप्या घरगुती टेस्ट करुन पाहू शकतो. या पद्धती वैद्यकीय निदानाला पर्याय नसल्या तरी प्राथमिक अंदाज घेण्यासाठी आणि वेळीच योग्य ती खबरदारी घेण्यासाठी उपयुक्त ठरतात. 

हृदयरोगांचा धोका... 

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, आज जगभरात हृदयरोग हे मृत्यूचे प्रमुख कारण आहेत. गेल्या काही वर्षांत, विशेषतः तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. हृदयाला रक्त आणि ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या धमन्या ब्लॉक होतात तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. यामुळे हृदयाच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळत नाही आणि हृदय काम करणे थांबवते.

हृदय निरोगी आहे की नाही हे घरच्याघरीच तपासण्यासाठी काय करावे ? 

हृदयाचे आरोग्य तपासण्यासाठी आरोग्यतज्ज्ञांनी काही सोप्या पद्धती सुचवल्या आहेत, ज्यांच्या सहाय्याने तुम्ही घरीच तुमच्या हृदयाच्या स्थितीचा अंदाज घेऊ शकता. या पद्धती वैद्यकीय चाचण्यांसारख्या अचूक नसल्या, तरी प्राथमिक स्तरावर हृदयाचे आरोग्य समजून घेण्यासाठी आणि जागरूक राहण्यासाठी या निश्चितच उपयुक्त ठरू शकतात.

१. नाडीचा वेग :- तुमच्या डाव्या मनगटाच्या आतील भागावर बोट ठेवा. १० सेकंदात ठोक्यांची संख्या मोजा आणि त्या आकड्याला ६ ने गुणा. सामान्य हृदय गती प्रति मिनिट ६० ते १०० ठोके अशी असते. जर हा दर ११० पेक्षा जास्त असेल तर तुम्ही स्वतःकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. 

२. हातांची पकड :- ऑस्ट्रियामधील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर अप्लाइड सिस्टम्स ॲनालिसिस या संस्थेतील शास्त्रज्ञांनी एक अभ्यास केला, ज्यामध्ये हाताची पकड (ग्रिप स्ट्रेंथ) किती मजबूत आहे आणि त्यावरून शरीरातील आजारांचा संभाव्य धोका किती आहे, याचा संबंध शोधण्यात आला. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हाताची पकड ही वय, लिंग आणि उंची यांसारख्या नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते. मात्र, जर तुमची पकड तुलनेने कमकुवत वाटत असेल, तर तुम्ही विशेषतः सतर्क राहणे गरजेचे आहे. तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, जर तुमची पकड तुमच्या वयोगटातील आणि लिंगानुसार इतर लोकांच्या तुलनेत कमकुवत असेल, तर ते हृदयविकारासारख्या गंभीर समस्यांचे संकेत असू शकतात. ही स्थिती हृदयाच्या सामान्य कार्यक्षमतेत अडथळा येत असल्याचे लक्षण देखील ठरू शकते. यासाठी, घरच्याघरीच एका बाटलीचे झाकण अगदी घट्ट बंद करा आणि ते सहजपणे उघडण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही ते अगदी सहजपणे उघडू शकलात तर आपले हृदय निरोगी आहे असे समजावे. 

सतत पित्ताचा त्रास सतावतो? आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात, स्वतःला लावा एक सवय - पित्त होईल कमी...

३. जिना चढण्याची टेस्ट :- जर तुम्ही १ मिनिटात सुमारे ६० पायऱ्या चढलात तर ते हृदयाच्या चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला काही पायऱ्या चढल्यानंतर थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर याबद्दल नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

शिल्पा शेट्टी ते सारा अली खान : अभिनेत्री पितात 'हे' मॉर्निंग ड्रिंक, त्यांच्या परफेक्ट फिगरचे सिक्रेट!

अशाप्रकारे आपण घरच्याघरीच या ३ सोप्या टेस्ट घेऊन आपले हृदय निरोगी आहे की नाही, याचा अंदाज लावू शकतो.

Web Title: How To Check Your Heart Health At Home Easy Way To Know Hear Is Healthy Or Not How To Check Heart Health At Home 3 Simple Tips For Better Heart Health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.