Join us

सतत हातपाय गार पडतात - मुंग्या येतात - थकवा येतो? गंभीर आजाराचा धोका, आजच लक्ष द्या कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2025 11:17 IST

How to check if the process of blood circulation going well or not? see causes and symptoms : शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत नसेल तर होतात अनेक त्रास. गंभीर आजारांचा धोका.

शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होत आहे की नाही? कधी याचा विचार आपण फार करतच नाही. खरे तर ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. (How to check if the process of blood circulation going well or not?  see causes and symptoms )ही प्रक्रिया सुरळीत होते की नाही हे ओळखण्यासाठी काही लक्षणे आणि  गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक असते. ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषणद्रव्ये शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचतात. जर रक्ताभिसरणात अडथळा येत असेल, तर त्याचे परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतात. शरीराच्या सगळ्याच प्रक्रिया मंदावतील. 

सर्वसाधारणतः जर रक्ताभिसरण नीट नसेल, तर हातपाय वारंवार गार पडायला लागतात. अवयवांना सुज यायला लागते. हातापायाला मुंग्या येणे, त्वचेचा रंग निळसर किंवा फिकट दिसायला लागतो. थकवा जाणवायला लागतो. चालताना पायात कळ येते. पायाला फार वेदना जाणवायला लागतात. एखादी साधी जखम किंवा खरचटलेले असेल तर ते बरे व्हायला फार जास्त वेळ लागतो. डोके सतत दुखतं.  लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. सतत लक्ष विचलित होतं. ही अशी सामान्य लक्षणे रक्ताभिसरण नीट होत नसेल तर दिसतात. काही वेळा थंड हवामानात ही लक्षणे तीव्रपणे जाणवू शकतात. रक्ताभिसरण सुरळीत नसल्यास हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे इतर आजारांचा धोका वाढतो.

रक्ताभिसरण सुरळीत व्हावे यासाठी नियमित व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. चालणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा साधी योगासनेसुद्धा रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. पुरेशी झोप घेणे, ताणतणावाचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय करणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे आणि शरीराला हायड्रेटेड ठेवणे या सवयी फारच उपयुक्त ठरतात. 

तसेच आहारात लसूण, हळद, बिट, आले, हिरव्या पालेभाज्या आणि जीवनसत्त्व 'सी' युक्त फळांचा समावेश केल्यास रक्ताभिसरण सुधारते. दिवसातून सतत काहीना काही हालचाल करणे गरजेचे असते. एसीत बसून आजकाल अनेकांचे काम चालू असते. त्यामुळे मधेमधे शरीराला उष्णता मिळण्यासाठी चालावे.  संपूर्ण शरीराला सक्रिय ठेवले, तर रक्ताभिसरणही सुरळीत राहते.

शरीर आपल्याला वेळोवेळी संकेत देत असते. जर सतत थकवा, थंडी जाणवणे किंवा हातपाय सुन्न होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. वेळेत लक्ष दिल्यास गंभीर परिणाम टाळता येतात आणि शरीर निरोगी ठेवता येते. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीसोशल व्हायरल