Join us
Daily Top 2 Weekly Top 5

घर -ऑफिस- काम -चिडचिड-हार्मोनल घोळ झाल्यानं स्ट्रेस वाढलाय, ६ सवयी बदला-जगणंच बदलेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2026 20:05 IST

how to balance hormones naturally in women : morning routine for women’s hormones balance naturally : healthy habits for hormone balance : ऑफिस, घर अशी तारेवरची कसरत सांभाळून हार्मोन्स बॅलेन्स करण्यासाठी खास ६ सवयी...

आजच्या धावपळीच्या आणि सतत बदलत्या बिझी लाईफस्टाईलमध्ये, महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. कधी अचानक वाढणारं वजन, कधी पिरीएड्समधील अनियमितता, तर कधी निरुत्साह... या सगळ्यामागे अनेकदा 'हार्मोनल इम्बॅलन्स' हे मुख्य कारण असतं. आपण दिवसभर काय खातो यापेक्षाही महत्त्वाची असते ती म्हणजे आपल्या दिवसाची सुरुवात... महिलांच्या आरोग्यात हार्मोन्सचा समतोल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, डेली रुटीन मधील काही साध्या सवयींमध्ये बदल केल्यास हार्मोन्स नैसर्गिकरित्या संतुलित ठेवता येतात(how to balance hormones naturally in women).

महिलांशी संबंधित अनेक शारीरिक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी योग्य आहार आणि चांगली लाईफस्टाईल अत्यंत महत्त्वाची आहे. महिला अनेकदा सकाळच्या डेली रुटीनकडे दुर्लक्ष करतात. जर महिलांनी दररोजच्या सकाळच्या डेली रुटीनमध्ये ६ गोष्टी समाविष्ट केल्या, तर हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत होईल. न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांच्या मते, जर महिलांनी आपल्या सकाळच्या डेली रुटीनमध्ये ६ साधे पण महत्त्वाचे बदल केले, तर हार्मोन्सचं संतुलन राखणं अतिशय सोपं होऊ शकतं. महिलांनी हार्मोनल बॅलन्स (healthy habits for hormone balance) राखण्यासाठी कोणत्या ६ सवयी (best habits for women to improve hormone health) स्वतःला लावून घ्यायला हव्यात ते पाहूयात. 

महिलांनी हार्मोनल बॅलन्स राखण्यासाठी कोणत्या ६ सवयी स्वतःला लावाव्यात... 

१. सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश गरजेचा :- सकाळी सर्वातआधी उठण्यासोबतच शरीराला व्हिटॅमिन 'डी' द्या. दररोज दहा मिनिटे सूर्यप्रकाशात राहा. सूर्यप्रकाश शरीरावर पडल्याने मिळणारे व्हिटॅमिन 'डी शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल. यामुळे कॉर्टिसोलची पातळी अचानक वाढण्यापासून रोखण्यास मदत होईल. 

मनानं स्ट्रॉंग व्हायचं असेल तर ७ गोष्टी करा, कुठल्याही परिस्थितीचा सामना कराल हसत हसत...

२. कोमट पाणी प्या :- सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास कोमट पाणी प्या. हे पाणी आपल्या समस्या लक्षात घेऊन निवडले जाऊ शकते. जसे की, जर थायरॉईड असेल तर धन्याचे पाणी, चांगल्या पचनासाठी जिरे किंवा बडीशेपचे पाणी प्या. कोमट पाणी बॉडीला डिटॉक्स करण्यासोबतच बॉडी रिसेट करण्यास मदत करेल.

३. जीभ साफ करा किंवा ऑईल पुलिंग करा :- सकाळी उठल्यानंतर आपली जीभ तांब्याच्या टंग क्लिनरने साफ करा किंवा ऑईल पुलिंग करा. हे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत करतात.

४. १० मिनिटांचा हेल्दी वॉक :- दररोज फक्त १० मिनिटे वॉकिंग करा. हे वॉकिंग तुम्ही सूर्यप्रकाश घेता घेता देखील करू शकता. ज्यामुळे वेळेची बचत होईल आणि तुमचा मॉर्निंग रुटीन हेल्दी ठेवण्यास मदत होईल. १० मिनिटांचे वॉक तुम्हाला पीसीओएस (PCOS) शी संबंधित समस्या आणि पीएमएस (PMS) च्या त्रासांना कमी करण्यास मदत करेल.

५. ५ मिनिटांचे ब्रीदिंग एक्सरसाइज :- यासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५ मिनिटे ब्रीदिंग एक्सरसाइज करा. डीप ब्रीदिंग एक्सरसाइज, भ्रामरी प्राणायाम, अनुलोम-विलोम किंवा शीतली प्राणायाम यांचा डेली रुटीनमध्ये समावेश करा. ब्रीदिंग एक्सरसाइज तुमचा आहार आणि इतर व्यायाम अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास मदत करेल.

मुलांच्या पोटात जंत झाले आहेत हे सांगणारी ९ लक्षणं! मुलं पोटदुखीने पडतील आजारी-वाढ खुंटेल...

६. रिकाम्या पोटी चहा-कॉफी पिणे बंद करा :- सकाळी सर्वात आधी उठल्यावर रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे पूर्णपणे टाळा. हे तुमच्या शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढवते. दररोज हे मॉर्निंग रुटीन फॉलो करून पहा. काही महिन्यांनंतर तुम्हाला स्वतःमध्ये फरक दिसून येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Balance hormones naturally: 6 morning habits for women's well-being.

Web Summary : Women can balance hormones naturally by adopting six simple morning habits. These include getting sunlight, drinking warm water, tongue cleaning, walking, breathing exercises, and avoiding empty-stomach tea or coffee. These habits will help regulate cortisol levels and improve overall health.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिलास्त्रियांचे आरोग्य