सकाळाच्या नाश्त्यात ब्रेड बटरला अनेकजण प्राधान्य देतात. प्रत्येक पदार्थात बटर हमखास खाल्ले जाते.(Avoid butter in daily diet) आपल्यापैकी अनेकांना बटर खायला आवडते. पनीर बटर, पाव भाजी, मसाला डोसा यांसारख्या अनेक चमचमीत पदार्थांवर बटर खाल्ले जाते.(Healthy oil alternatives to butter) पण सतत बटर खाल्ल्याने आपले वजन वाढू शकते.(Harvard study on butter health risks)
वाढत्या वजनामुळे आपल्याला अनेकजण फिट राहण्याचा सल्ला गेतात. परंतु, फिट राहाण्यासाठी फक्त व्यायामच नाही तर आरोग्याची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.(Replace butter with plant-based oil) आपण आहारात कोणते पदार्थ खातो हे देखील पाहायला हवे. सतत बाहरेचे जंक फूड खाल्ल्याने आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. ज्यामुळे वजन तर वाढतेच पण ते आटोक्यात आणणे कठीण होते.(Daily use cooking oil health tips) जंक फूडमध्ये भेसळ केलेल्या बटरचा वापर हमखास केला जातो. त्यासाठी तज्त्रांनी सांगितले की काही तेल आहेत जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
हार्वर्ड स्टडीनुसार जास्त प्रमाणात बटर खाल्ल्याने आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात. तसेच मृत्यूचे प्रमाण देखील वाढू शकते. परंतु, बटरऐवजी आपण प्लांट बेस्ड ऑइलचा वापर केल्याने अनेक आजारांपासून आपले रक्षण करता येते. वर्षभरात केलेल्या स्टडीनुसार संशोधकांनी एक सर्व्हे घेतला त्यात बटर आणि प्लांट बेस्ड ऑइल याची ४ गटांमध्ये विभागणी करण्यात आली. ज्यांनी सगळ्यात जास्त प्रमाणात बटर किंवा वनस्पती तेल खातात त्यांच्या मृत्यूचा दर सर्वात कमी प्रमाणात नोंदवण्यात आला.
तज्ज्ञ म्हणतात की, सर्वात जास्त बटर खाणाऱ्या लोकांना मृत्यूचा धोका १५ टक्के जास्त असतो. त्यांसाठी आहारात प्लांट बेस्ड ऑइल असायला हवे. त्यासाठी आहारात सोयाबीन, कॅनोला आणि ऑलिव्ह तेल असायला हवे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, आवश्यक फॅटी ॲसिडसारखे घटक आहेत. जे कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सला नियंत्रणात ठेवतात. त्यासाठी आहारात वनस्पती तेल खायला हवे असा सल्ला डॉक्टरांनी दिला.