Join us   

How to prevent cancer research : जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढवतात रोजच्या जेवणातील 'हे' 2 पदार्थ; समोर आला आश्चर्यकारक रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 5:28 PM

How to prevent cancer : हा अभ्यास ईरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायंसेस, इंपीरियल कॉलेड लंडन आणि कॅनडाच्या निपिसिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. 

सध्याची जीवनशैली आणि खाण्यापिण्यातील अनियमिततेमुळे गंभीर आजार कमी वयोगटातील लोकांमध्ये उद्भवत आहेत. कॉफी आणि अंडी हे २ पदार्थ असे आहेत जे लोक ब्रेकफास्टसाठी खाणं पसंत करतात.  आरोग्याच्या दृष्टीनं याचं सेवन घातक ठरू शकतं. एका नवीन  अभ्यासानुसार कॉफी, अंडी यांचे अतिसेवन जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढवू शकते. हा अभ्यास ईरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायंसेस, इंपीरियल कॉलेड लंडन आणि कॅनडाच्या निपिसिंग युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. 

हा अभ्यास काय सांगतो?

ओव्हरियन कॅन्सर लक्षात घेता   (Ovarian cancer) हा अभ्यास  जर्नल ऑफ ओवेरियन रिसर्चमध्ये छापण्यात आला आहे.  या अभ्यासात नमुद केलेल्या माहितीनुसार सर्वाकल आणि युटेराईन नंतर महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सरचा धोका जास्त असतो. जोपर्यंत या कॅन्सरच्या पेशी संपूर्ण पोटात पसरत नाही तोपर्यंत याबाबत माहिती मिळत नाही. या आजाराची लक्षणं ओळखून वेळीच उपाय केल्यानं बचाव करता येऊ शकतो.

या अभ्यासात सांगितले आहे की ओव्हेरियन कॅन्सर वाढण्यामागे अनेक कारणं असू शकतात. काही महिलांना अनुवांशिकरित्या हा आजार असतो. एखाद्या गंभीर आजाराच्या उपचारादरम्यान  ओवेरियन  कॅन्सरचा धोका वाढतो. याव्यतिरिक्त डायबिटीस, एंडोमेट्रियोसिस आणि पोलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमसारख्या आजारांमुळे कॅन्सरचा धोका वाढतो.  

संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिला आपल्या जीवनशैलीमुळे या  आजाराचा धोका वाढवून घेतात. जसं की शारीरिक हालचालींच्या अभावामुळे येणारा लठ्ठपणा, स्मोकींग. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ओव्हरियन कॅन्सरसाठी जबाबरदार असतात. संशोधकांनी  कॉफी, अंडी, अल्कोहोल आणि फॅट्सयुक्त पदार्थांचा समावेश या यादीत केला  आहे. ज्या खाद्यपदार्थांमुळे ओव्हेरियन कॅन्सरचा धोका वाढतो,

कॉफीमध्ये आढळणारे कॅफेन डिएनए म्यूटेशन वाढवते यामुळे ट्यूमर सप्रेसर बाधित होते.  परिणामी कॅन्सरच्या पेशी वाढू लागतात. अभ्यासानुसार दिवसभरात ५ पेक्षा जास्त वेळा कॉफी प्यायल्यानं ओव्हेरियन कॅन्सरचा धोका वाढतो.  खासकरून मेनोपॉजनंतर हे उद्भवण्याची शक्यता जास्त असते.  एका अभ्यासानुसार अंडी खात नसलेल्या महिलांच्या तुलनेत अंडी खात असलेल्या महिलांमध्ये ओव्हेरियन कॅन्सरचा धोका जास्त असतो. शरीरात अंड्याचे जास्त प्रमाण कॉलेस्ट्रॉल वाढवत त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. अंड्यात सॅच्यूरेडेट फॅट्स कमी असतात. म्हणून प्रमाणाबाहेर अंडी खाऊ नये.

टॅग्स : कर्करोगहेल्थ टिप्सआरोग्यलाइफस्टाइलअन्न