Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रात्री झोपण्याआधी प्या ‘इतकं’ दूध, त्वचा होईल चमकदार, तब्येत सुपरफिट

रात्री झोपण्याआधी प्या ‘इतकं’ दूध, त्वचा होईल चमकदार, तब्येत सुपरफिट

Milk before bed benefits: Night milk for glowing skin: Healthy bedtime habits: रात्री झोपण्यापूर्वी किती प्रमाणात दूध प्यावं? दूध प्यायल्याने आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2025 11:39 IST2025-09-11T11:38:08+5:302025-09-11T11:39:10+5:30

Milk before bed benefits: Night milk for glowing skin: Healthy bedtime habits: रात्री झोपण्यापूर्वी किती प्रमाणात दूध प्यावं? दूध प्यायल्याने आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया.

How much milk to drink before sleeping for glowing skin Benefits of drinking milk at night for fitness | रात्री झोपण्याआधी प्या ‘इतकं’ दूध, त्वचा होईल चमकदार, तब्येत सुपरफिट

रात्री झोपण्याआधी प्या ‘इतकं’ दूध, त्वचा होईल चमकदार, तब्येत सुपरफिट

दूध हे आपल्या आहारातील सर्वात पौष्टिक आणि आवश्यक पेय आहे. पण रात्री झोपण्याआधी दूध पिणे हे केवळ शरीरासाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.(Milk before bed benefits) सध्याच्या धावपळीच्या जगात ताण, थकवा, निद्रानाशच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशावेळी एक ग्लास कोमट दूध केवळ शरीराला पोषण देत नाही तर मनालाही शांत करतात.(Night milk for glowing skin)
दुधात असणारे कॅल्शियम, प्रोटीन, ट्रिप्टोफॅन हे घटक शरीरासाठी आवश्यक असतात.( Healthy bedtime habits) कॅल्शियम हाडं मजबूत ठेवतात, तर ट्रिप्टोफॅन मुळे मेलाटोनिन हार्मोनची निर्मिती वाढते आणि झोप चांगली लागते.(turmeric milk benefits) त्यामुळे रात्री दूध प्यायल्याने झोपेच्या गुणवतेत सुधारणा होते आणि सकाळी शरीर फ्रेश वाटते. पण रात्री झोपण्यापूर्वी किती प्रमाणात दूध प्यावं? दूध प्यायल्याने आरोग्याला कसा फायदा होतो जाणून घेऊया. 

Ranbhaji : पावसाळा संपण्यापूर्वी खा वर्षभर ठणठणीत ठेवणारी केनीची भाजी, रानभाजीचा अस्सल स्वाद

हळदीचे दूध प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. ताण कमी होतो ज्यामुळे शांत आणि गाढ झोप लागते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन शरीराला रोगांशी लढण्याची शक्ती देतात. ते बॅक्टेरिया आणि विषाणूंपासून संरक्षण करते.सर्दी आणि खोकला झाल्यावर हळदीचे दूध प्यायाल्याने आराम मिळतो. जर शरीराला सूज, सांधेदुखी किंवा वारंवार थकवा येत असेल तर हळदीचे दूध प्यायल्याने आराम मिळतो. याचे दाहक - विरोधी गुणधर्म शरीराला बरे करतात. 

रात्री हळदीचे दूध प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पोटातील गॅस आणि आम्लपित्ताची समस्या कमी होते. आणि पचनसंस्था निरोगी राहते. हळदीचे दूध आतून शरीराला डिटॉक्स करते. याचा परिणाम चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत करतो. हळदीचे दूध चयापचय सुरळीत करुन शरीरातील अतिरिक्त चरबी जाळण्यास मदत करते आणि वजन नियंत्रणात ठेवते. रक्ताभिसरण सुधारुन हृदयाच्या स्नायूंना बळकटी देते. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि बीपीसारख्या समस्यांचा धोका कमी होतो. 

इडलीचं पीठ काही केल्या फुगत नाही? 'अण्णाची' ही एक ट्रिक वापरा, कापसाहून मऊसुत-टम्म फुगेल इडली

एक ग्लास दूध हलके गरम करुन त्यात अर्धा चमचा हळद घाला. यात हवं असल्यास आपण काळी मिरी किंवा मध देखील घालू शकतो. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे दूध प्यायल्यास फरक जाणवेल. 

Web Title: How much milk to drink before sleeping for glowing skin Benefits of drinking milk at night for fitness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.