आपल्या डेली रुटीनमध्ये 'झोप' ही देखील तितकीच महत्वाची असते. फिट राहण्यासाठी चांगली झोप घेणं आवश्यक असते. झोप शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देते. त्यामुळे शरीर पुढच्या (A Guide to Sleep Based on Your Ayurvedic Type) दिवसासाठी तयार होते. झोप शरीरासोबत मन, बुद्धी आणि इंद्रियांनाही ताजेतवाने करते. यामुळेच शरीर पुन्हा नव्याने तयार होते. आपली रात्रीची झोप ठीक झाली नाही तर पुढचा (How many hours of sleep does someone need according to their Vata - Pitta - Kapha Prakruti) संपूर्ण दिवस आळस अंगात राहतो. जर आपल्या झोपेची पद्धत किंवा वेळ चुकीची असेल तर त्याचा हळुहळु आपल्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम झालेला दिसून येतो.
झोप नीट झाली नाही तर आपल्याला अपचन, गॅस, अॅसिडीटी अशा समस्या उद्भवू शकतात इतकेच नव्हे तर हार्मोनल इम्बॅलेन्सदेखील होऊ शकतो. सध्याच्या काळात झोप न येणं ही एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडते आणि काहीवेळा त्यामुळे चिंता वाढते. कमी झोपेमुळे डोकेदुखी, थकवा, अंगदुखी, तणाव, चिंता, एकाग्रतेचा अभाव ते रक्तदाबाच्या समस्यांपर्यंतच्या अनेक समस्या वाढतात. अशा परिस्थिती आयुर्वेदानुसार, वात - पित्त - कफ अशा तीन प्रवृत्ती असतात. त्यामुळे आपल्या प्रवृत्ती नुसार आपण किती तासांची झोप घेणे योग्य आहे ते पाहूयात. इंस्टाग्रामवर healyourselfwith_manasikrishna या अकाउंटवरुन डॉक्टर मानसी यांनी आपली प्रकृती ओळखून नेमके किती तास झोपावे याबद्दल अधिक माहिती दिली आहे.
शरीराच्या प्रकृतीनुसार कोणी किती तास झोपावे ते पाहा...
१. वात प्रकृती :- वात प्रकृतीच्या व्यक्तींचा बारीक बांधा असतो, तसेच या व्यक्ती अधिक जास्त विचार करतात. वात प्रकृतीच्या व्यक्तींना खरतर अंथरुणात पडल्या - पडल्या झोप येते. परंतु जर एकदा का त्यांची झोपमोड झाली की त्यांना बराचवेळ झोप लागत नाही. वात प्रकृतीच्या व्यक्तींची झोपमोड झाल्यावर त्यांना पुन्हा झोप येणे खूपच अवघड असते. यासाठीच, वात प्रकृती असणाऱ्यांना शांत झोपेची सर्वात जास्त गरज असते त्यामुळे त्यांनी किमान ८ तासांची सलग झोप घेणे गरजेचे असते.
मलायका अरोराच्या परफेक्ट फिगरचे सीक्रेट, सकाळी 'हा' कपभर चहा पिते रोज...
२. पित्त प्रकृती :- पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा शारीरिक बांधा हा मध्यम असतो, तसेच त्यांना भूक देखील जास्त लागते. तसेच पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना गरजेपुरता बऱ्यापैकी झोप लागते. त्यामुळे त्यांना खूप जास्त झोपेची गरज नसते शरीराला आवश्यक असणारी झोप त्यांना मिळत असते. त्यामुळे त्यांना किमान ७ ते ८ तासांची झोप पुरेशी असते.
३. कफ प्रकृती :- कफ प्रकृतीच्या व्यक्ती या शरीराने स्थूल असतात. त्याच्या शरीरात एक प्रकारचा आळस असतो. या व्यक्ती फारशा अॅक्टिव्ह नसतात. यासाठी या व्यक्तींनी चांगल्या आरोग्यासाठी सतत अॅक्टिव्ह असणे गरजेचे असते. त्यामुळे या कफ प्रकृतीच्या व्यक्तींना ५ ते ६ तासांची झोप पुरेशी असते. कमी झोप घेऊन त्यांनी जास्त अॅक्टिव्ह असणे गरजेचे असते. यामुळे त्यांचे वजन कमी होण्यास देखील अधिक मदत होते.