हिवाळा ऋतू आरामदायक, सुखावह आणि हुडहुडणारी थंडी भरवणारा असतो. परंतु याच ऋतूमध्ये आपल्या शरीरात पाण्याची कमतरता डिहायड्रेशन होण्याचा धोका खूप जास्त वाढतो. थंडीच्या दिवसांत वातावरणातील गारठ्याने (winter water intake) आपल्याला तहान कमी लागते, त्यामुळे नकळत आपण पाणी पिण्याचे प्रमाणही कमी करतो. उन्हाळ्यात वारंवार तहान लागत असल्याने आपण पुरेसे पाणी पितो, परंतु हिवाळ्यात तहान कमी लागल्यामुळे आणि पाणी कमी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता होते(how much water to drink in winter).
हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्याने शरीराला आवश्यक असलेले हायड्रेशन कमी झालं की त्वचा कोरडी पडणे, थकवा, डिहायड्रेशन, डोकेदुखी, बद्धकोष्ठता अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. थंडीच्या दिवसात वातावरणात गारठा असल्याने, 'तहान लागली नाही तर पाणी नको’ हा समज पूर्णपणे चुकीचा ठरतो. हिवाळ्यात देखील शरीराला एका ठराविक (how many glasses of water should we drink in winter) प्रमाणात पाण्याची आवश्यकता असतेच. अशा परिस्थितीत, दिल्लीच्या क्लिनिकल डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट रक्षिता मेहरा यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीनुसार, हिवाळ्यात नेमके किती ग्लास पाणी प्यावे आणि थंडीच्या दिवसांतही पुरेसे पाणी पिणे का आवश्यक आहे? याबद्दल अधिक माहिती घेऊयात.
थंडीच्या दिवसांत नेमके किती ग्लास पाणी प्यावे ?
न्यूट्रिशनिस्ट रक्षिता मेहरा यांच्या मते, एका निरोगी प्रौढ व्यक्तीने दररोज ८ ते १० ग्लास पाणी म्हणजेच साधारणपणे २ ते २.५ लीटर पाणी प्यावे. परंतु हे प्रमाण वय, शारीरिक हालचाली, आहार आणि हवामान यावर देखील अवलंबून असते. थंडीत तहान कमी लागत असली तरी, शरीराला पाण्याची गरज उन्हाळ्यात जितकी असते तितकीच हिवाळ्यात देखील असते, आणि कधीकधी त्याहून अधिक असू शकते. त्यामुळे, तज्ज्ञ सामान्यतः असा सल्ला देतात की जर तुम्ही कमी शारीरिक हालचाली करत असाल, तर दिवसातून ८ ग्लास पाणी म्हणजेच अंदाजे २ लीटर पाणी प्यावे. जर तुम्ही एक्सरसाइज करत असाल, बाहेर काम करत असाल आणि अधिक अॅक्टिव्ह असाल, तर दिवसातून १० ते १२ ग्लास म्हणजेच २.५ ते ३ लीटर पाणी प्यावे.
सततच्या ॲसिडिटीने नको जीव केलाय? करपट ढेकर, जळजळही? ‘हे’ चमचाभर मिश्रण चघळा, पटकन वाटेल बरं...
फराह खानने सांगितला IVF चा भयंकर अनुभव, असह्य वेदना-मांडीत इंजेक्शनं..! IVF वेदनादायी असतं का...
थंडीच्या दिवसांतही पुरेसे पाणी पिणे का गरजेचे असते ?
१. शरीराला पुरेसे पाणी आवश्यक आहे :- थंडीच्या दिवसात आपल्याला खूप कमी प्रमाणात घाम येतो. ज्यामुळे आपल्याला वाटते की आपल्या शरीराला पाण्याची कमी गरज आहे, पण खरंतर शरीरातील अवयवांना काम करण्यासाठी तितक्याच पाण्याची गरज असते. त्यामुळे, जेव्हा आपण कमी पाणी पितो, तेव्हा डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.
२. त्वचेला आर्द्रता मिळणे आवश्यक असते :- हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचा कोरडी, फाटलेली आणि निस्तेज होऊ शकते. पुरेसे पाणी दररोज प्यायल्याने त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत मिळते आणि त्वचा हायड्रेटेड राहते, ज्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक येते व ती कायम तशीच टिकून रहाते.
३. पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी :- थंडीमध्ये शक्यतो आपण खूप हेव्ही आणि तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खातो, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. अशावेळी, पुरेसे पाणी पिण्याने पचन चांगले राहते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आपले संरक्षण केले जाते.
४. रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते :- हिवाळ्यात सर्दी-खोकला, फ्लू आणि इतर संसर्ग, इंफेक्शन होण्याचा धोका जास्त असतो. अशावेळी, पुरेसे पाणी पिणे शरीरातील टॉक्सिन्स पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता कमी होते.
५. शरीराचे तापमान नियंत्रित राहते :- पाणी शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. हिवाळ्याच्या काळात जेव्हा शरीराला उबदार ठेवण्याची गरज असते, तेव्हा पाणी एक नैसर्गिक 'थर्मोरेगुलेटर' म्हणून काम करते, ज्यामुळे शरीराचे तापमान आतून उबदार ठेवण्यास मदत होते.
६. सांधे आणि स्नायूंना लवचिक ठेवते :- थंडीच्या वातावरणात सांध्यांमध्ये आखडलेपणा, वेदना आणि सूज येण्याची समस्या वाढते. पुरेसे पाणी प्यायल्याने सांध्यांचे लुब्रिकेशन टिकून राहते आणि वेदना कमी होतात. अशाप्रकारे, पुरेसे पाणी पिण्याने सांधे आणि स्नायूंचा लवचीकपणा टिकून राहतो आणि सांध्यांमध्ये वेदनेचे प्रमाण कमी होते.
Web Summary : Winter's low thirst can cause dehydration. Doctors advise 8-10 glasses daily to combat dry skin, fatigue, and constipation. Water aids digestion, immunity, joint flexibility, and temperature regulation. Staying hydrated is crucial for overall health during winter.
Web Summary : सर्दियों में कम प्यास लगने से डिहाइड्रेशन हो सकता है। डॉक्टर रूखी त्वचा, थकान और कब्ज से निपटने के लिए रोजाना 8-10 गिलास पानी पीने की सलाह देते हैं। पानी पाचन, प्रतिरक्षा, जोड़ों के लचीलेपन और तापमान विनियमन में सहायता करता है। सर्दियों के दौरान समग्र स्वास्थ्य के लिए हाइड्रेटेड रहना महत्वपूर्ण है।