डोकं दुखणं... हा एक खूप कॉमन त्रास. अगदी लहान मुलींपासून ते वयस्कर आजोबांपर्यंत तो कोणालाही कधीही होतो. 'आज माझं डोकंच खूप दुखतंय' हे वाक्य आपण सतत कोणाकडून तरी ऐकत आलेलो आहोत किंवा मग आपण तरी ते कोणाला म्हटलेलं असतं. आता काही काही वेळा खरंच डोकं दुखतं, आणि बऱ्याचदा तो एक बहाणाही असतो.. बहाण्याचं सोडून द्या पण खरंच तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा उपाय करून पाहा. डोकेदुखीवर वारंवार गोळ्या घेण्यापेक्षा हा घरगुती उपाय करणं खरंच खूप चांगला आहे.(how hacks to get instant relief from headache?)
डोकेदुखी कमी करण्यासाठी उपाय
डोकेदुखीचा त्रास होत असल्यास कोणता घरगुती उपाय करायला हवा, याविषयीची माहिती 80andhealed या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
एवढीशी खारीक शरीराला देते ४ मोठे फायदे! घरातल्या सगळ्यांसह आईने तर खायलाच हवी कारण..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बर्फाचा तुकडा लागणार आहे. हा एक पारंपरिक घरगुती उपाय आहे. बर्फाचा एक तुकडा घ्या आणि तो तुमच्या हाताचं पहिलं बोट म्हणजेच तर्जनी आणि अंगठा यांनी दाबून ठेवा. अगदी एखादा मिनिट जरी तुम्ही या पद्धतीने बर्फाचा तुकडा पकडला तरी तुम्हाला डोकेदुखी लगेचच कमी झाल्यासारखी जाणवेल.
यामागचं शास्त्रीय कारण असं की तर्जनीमध्ये असे काही प्रेशर पॉईंट्स असतात जे थेट तुमच्या मेंदुशी जोडलेले असतात. बर्फाच्या थंडाव्यामुळे डोकेदुखीविषयी मेंदूकडून येणारे सिग्नल्स थांबतात आणि तुम्हाला लगेचच आराम मिळतो.
ऐन हंगामातही मोगऱ्याला फुलंच नाहीत? लगेच करा 'हा' उपाय- ८ दिवसांत फुलांनी डवरून जाईल
हा उपाय करायला सोपा असला तरी त्याचा अतिरेक करू नका. कारण डोकेदुखी असो किंवा इतर कोणताही त्रास असो तो जास्त दिवस अंगावर काढू नये. कोणतं लहानसं दुखणं काही दिवसांनी कोणत्या मोठ्या आजारात रुपांतरीत होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणं कधीही उत्तम.
Web Summary : Suffering from a headache? An Instagram user suggests holding an ice cube between your thumb and forefinger. Pressure points in these fingers are linked to the brain, and the coldness can block pain signals. Consult a doctor for persistent issues.
Web Summary : सिरदर्द से परेशान हैं? एक इंस्टाग्राम यूजर अंगूठे और तर्जनी के बीच बर्फ का टुकड़ा रखने का सुझाव देता है। इन उंगलियों में प्रेशर पॉइंट्स मस्तिष्क से जुड़े होते हैं, और ठंडक दर्द के संकेतों को रोक सकती है। लगातार समस्या के लिए डॉक्टर से सलाह लें।