Fenugreek Seeds For Lowering Bad Cholesterol: शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं तर ते किती घातक ठरू शकतं हे तुम्ही इंटरनेटवरील वेगवेगळ्या पोस्ट किंवा व्हिडिओतून वाचलं आणि पाहिलं असेलच. अनेक हेल्थ एक्सपर्ट कोलेस्टेरॉलची लेव्हर कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय सांगतात. असाच एक सोपा आणि घरगुती उपाय म्हणजे मेथीच्या बिया. जे आरोग्यासाठी फार फायदेशीर मानले जातात. यांनी नसांमध्ये जमा झालेलं बॅड कोलेस्टेरॉल कमी होतं.
मेथीच्या बियांनी कसा मिळतो फायदा?
मेथीच्या पिवळ्या बियांबाबत ग्रेटर नोएडाच्या GIMS हॉस्पिटलमध्ये कार्यरत फेमस डायटिशिअन आयुषी यादव (Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, मेथीच्या बिया कशा खाव्यात आणि त्याचे शरीराला कोणकोणते फायदे होतात.
मेथीच्या बियांमधील पोषक तत्व
मेथीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व असतात. यात व्हिटामिन ए, व्हिटामिन बी, व्हिटामिन सी आणि इतरही काही व्हिटामिन असतात. तसेच यात भरपूर फायबर, कॅल्शिअम, फोलिक अॅसिड, कॉपर आणि पोटॅशिअम असतं.
मेथीच्या बियांमध्ये मध्ये असे कंपाउंड आढळतात जे लिव्हरच्या माध्यमातून कोलेस्टेरॉलचं एक्ट्रा प्रॉडक्शन रोखण्यास मदत करतात. याने आतड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं अॅब्जॉर्ब्शन कमी होतं.
मेथीच्या बियांमध्ये आढळणारं स्टेरॉयडल सॅपोनिन हे तत्व आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. या बियांमुळे नसांमध्ये गुड कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं.
अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, मेथीच्या बिया लिव्हरमध्ये असलेल्या एलडीएल रिसेप्टर्सना बूस्ट करण्यास मदत करतात. सोबतच याने लिपिड प्रोफाइलमध्येही सुधारणा होते.
कशा खायच्या मेथीच्या बिया?
आयुषी यादव यांच्यानुसार, फेनुग्रीक सीड्स म्हणजेच मेथीच्या बियांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी या सकाळी उपाशीपोटी खाव्यात. तुम्ही रात्रीच्या वेळी एक चमचा मेथीच्या बिया एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी झोपेतून उठल्यावर हे पाणी प्या आणि दाणे चावून खा. याने हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डायबिटीज, हार्ट फेलियर आणि ट्रिपल वेसल डिजीजचा धोका टाळला जाऊ शकतो.