Join us
Daily Top 2 Weekly Top 5

तुमचं हृदय ठणठणीत आहे हे कसं ओळखाल? ५ लक्षणं दिसत असतील तर समजा, दिल में गडबड..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2026 18:00 IST

How do you know if your heart is healthy? If you see 5 symptoms, it means you have to take care of your heart : हृदयाची काळजी घेणे फार गरजेचे. पाहा काय चुकते.

हृदय हा आपल्या फार महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हृदय करत असते. त्यामुळे हृदय व्यवस्थित काम करत आहे का, त्यावर जास्त ताण तर येत नाही ना हे वेळोवेळी तपासणे गरजेचे असते. अनेकदा सुरुवातीला काही लक्षणे दिसतात, पण ती दुर्लक्षित केली जातात. (How do you know if your heart is healthy? If you see 5 symptoms, it means you have to take care of your heart )मात्र या छोट्या संकेतांकडे लक्ष दिले तर हृदयाशी संबंधित त्रास लवकर ओळखता येऊ शकतो.

हृदय व्यवस्थित चालू आहे का हे जाणून घेण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजे शरीरात होणारे बदल लक्षात घेणे. साधारणपणे निरोगी व्यक्तीचे हृदय नियमित आणि समतोल गतीने धडधडत असते. जर अचानक हृदयाची धडधड खूप वाढली, अनियमित झाली किंवा छातीत जडपणा जाणवू लागला तर ते हृदयावर ताण येत असल्याचे संकेत असू शकतात. अशावेळी काही काळ विश्रांती घेऊनही त्रास कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

हृदयावर ताण येत असल्याचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे लवकर दम लागणे. थोडे चालल्यावर किंवा जिना चढल्यावर जर नेहमीपेक्षा जास्त दम लागत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर ते हृदयाशी संबंधित समस्या दर्शवू शकते. शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे अशी स्थिती निर्माण होऊ शकते.

छातीत दुखणे किंवा दडपण जाणवणे हे देखील हृदयावर ताण असल्याचे महत्त्वाचे लक्षण असू शकते. काही लोकांना छातीच्या मध्यभागी जडपणा, दाब किंवा जळजळ जाणवते. हा त्रास कधी कधी डाव्या हातात, खांद्यामध्ये, मान किंवा जबड्यापर्यंतही जाणवू शकतो. असे लक्षण दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

सतत थकवा येणे हेही हृदयावर ताण असल्याचे लक्षण असू शकते. पुरेशी झोप घेतल्यानंतरही अंगात ऊर्जा नसणे, थोडे काम केले तरी थकवा जाणवणे, शरीर जड वाटणे असे बदल दिसू लागतात. कारण हृदय नीट काम करत नसेल तर शरीराला आवश्यक तेवढा रक्तपुरवठा होत नाही.

काही वेळा चक्कर येणे, घाम येणे किंवा अचानक अशक्त वाटणे ही लक्षणेही दिसू शकतात. विशेषतः कोणतेही कष्टाचे काम न करता अचानक घाम येणे किंवा अस्वस्थ वाटणे हे हृदयाशी संबंधित ताणाचे संकेत असू शकतात. अशा वेळी शरीराला विश्रांती देणे आणि गरज वाटल्यास वैद्यकीय तपासणी करणे महत्त्वाचे असते.

हृदय व्यवस्थित चालू आहे का हे तपासण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणेही तितकेच आवश्यक आहे. रक्तदाब तपासणे, ईसीजी, लिपिड प्रोफाइल अशा चाचण्या केल्यास हृदयाचे आरोग्य कसे आहे याची माहिती मिळू शकते. त्याचबरोबर संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणाव कमी ठेवणे या सवयी हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.  

English
हिंदी सारांश
Web Title : Is Your Heart Healthy? 5 Signs You Need to Know

Web Summary : Pay attention to your body. Breathlessness, chest pain, fatigue, and dizziness can signal heart issues. Regular checkups, healthy habits are crucial for a healthy heart.
टॅग्स : हेल्थ टिप्सहृदयविकाराचा झटकाहृदयरोगआरोग्यहोम रेमेडी