Join us
Daily Top 2 Weekly Top 5

व्हिटॅमिन B12 नेहमीच कमी असतं? चहा कॉफी पिण्याची 'ही ' सवय बदला, B12 वाढेल भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2026 15:17 IST

Vitamin B12 Deficiency: तुमचंही व्हिटॅमिन बी १२ नेहमीच कमी असेल तर पुढे सांगितलेला उपाय करून पाहा...

ठळक मुद्दे व्हिटॅमिन बी १२ कमी होण्याची कित्येक वेगवेगळी कारणं आहेत. त्यापैकी एक कारण तुमच्या नेहमीच्या चहा - कॉफी पिण्याच्या सवयीमध्येही दडलेलं आहे.

हल्ली आपण बहुतांश लोक असे पाहात आहोत, ज्यांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असते. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे वेगवेगळे त्रास सुरू होतात. त्यामुळे मग अनेक जण डॉक्टरांच्या सल्ल्याने बी १२ च्या सप्लिमेंट्स किंवा मग इंजेक्शन सुरू करतात. व्हिटॅमिन बी १२ कमी होण्याची कित्येक वेगवेगळी कारणं आहेत. त्यापैकी एक कारण तुमच्या नेहमीच्या चहा - कॉफी पिण्याच्या सवयीमध्येही दडलेलं आहे. ती चूक जर तुम्ही दुरुस्त केली तर नक्कीच व्हिटॅमिन बी १२ वाढण्यास मदत होईल, असं डॉक्टर सांगत आहेत.(Vitamin B12 Deficiency)

व्हिटॅमिन बी १२ वाढण्यासाठी उपाय

 

डॉक्टर सांगतात की चहा- कॉफी घेण्याची सवय खूप लोकांना असते. चहा हा तर कित्येक लोकांच्या दिनक्रमातला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे मग दिवसातून अगदी ५- ६ वेळा चहा प्यायला जातो.

उन्हाळ्यात दही खाताना ३ गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर तब्येतीला फायदा होण्याऐवजी आजारीच पडाल

किंवा काही लोकांना अशीही सवय असते की नाश्ता झाल्यानंतर लगेचच चहा प्यायचा, ऑफिसमध्ये असतील तर दुपारच्या जेवणानंतर लगेचच चहा किंवा कॉफी घ्यायची. यामुळे थोड्या वेळासाठी शरीर आणि मन एकदम फ्रेश होत असलं तरी व्हिटॅमिन बी १२ मात्र कमी होतं. कारण या सवयीमुळे अन्नपदार्थांमधून मिळणारे पौष्टिक घटक शरीरात शोषून घेतले जात नाहीत.

 

शिवाय उपाशीपाेटी किंवा दिवसातून खूप वेळा चहा- कॉफी प्यायल्याने ॲसिडीटी होते. त्यानंतर मग कित्येक जण ॲसिडीटी कमी करण्याची औषधं घेतात. यामुळे शरीरातली ॲसिड लेव्हल कमी होते. अन्नपदार्थांमधून आलेलं व्हिटॅमिन बी १२ रक्तात शोषून घेतलं जाण्यासाठी पुरेसं ॲसिड असणं गरजेचं आहे.

पातळ, पांढरे केस नको तर आतापासूनच ५ पदार्थ खाणं सुरू करा, केसांच्या तक्रारी कायमच्या विसरा

त्यामुळे चहा कॉफीची चुकलेली वेळ आणि चुकलेलं प्रमाण यामुळेही अनेकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी प्रमाणात असतं. त्यासाठी इतरही जशी अनेक कारणं आहेत, त्यापैकीच हे देखील एक कारण आहे. यात सुधारणा करता आली तर व्हिटॅमिन बी १२ नक्कीच वाढू शकतं असं डॉक्टर सांगतात.ही माहिती डॉक्टरांनी drpranitasdietclinic या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. 

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Low Vitamin B12? Change tea/coffee habits to boost B12 levels.

Web Summary : Vitamin B12 deficiency is common. Doctors suggest that excessive tea and coffee consumption after meals hinders nutrient absorption, lowering B12 levels. Acidity medications further reduce acid levels needed for B12 absorption. Correcting these habits can help increase B12.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स