Join us
Daily Top 2 Weekly Top 5

थंडीत हाडं कडाकडा वाजतात? मिठाच्या पोटलीचा घ्या 'असा' शेक - दुखणं गायब, खिशाला परवडेल असा रामबाण उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2026 17:55 IST

hot salt bag therapy benefits : how to use salt bag for back pain : winter remedy for joint pain : थंडीत कडाकडा वाजणाऱ्या हाडांच्या वेदना आणि सांधेसूखी किंवा स्नायूंचे दुखणे कमी करण्यासाठी मिठाच्या पोटलीचा असरदार उपाय...

हिवाळ्यात थंडीचा तडाखा वाढला की निसर्ग जितका सुखावह वाटतो, तितकाच तो आपल्या शरीरासाठी देखील त्रासदायक ठरू लागतो. विशेषतः थंडीच्या दिवसांत सकाळी उठल्यावर सांधे जखडणे, पाय जमिनीवर टेकवताना होणाऱ्या वेदना आणि हालचाल करताना सांध्यांमधून येणारा तो 'कडाकडा' आवाज अनेकांची चिंता वाढवतो. थंडीमुळे आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि स्नायूंमधील लवचिकता कमी होते, ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास बळावतो. थंडीच्या दिवसांत संपूर्ण शरीर जणू आखडल्या सारखेच वाटते. अनेकजणांना सकाळी उठल्यावर हात - पाय आखडल्यासारखे वाटतात, सांध्यांमधून 'कडाकडा' आवाज येतो किंवा जुन्या दुखापती पुन्हा डोकं वर काढतात. थंडीमुळे शरीरातील रक्तभिसरण मंदावते आणि स्नायू कडक होतात(winter remedy for joint pain).

थंडीमुळे रक्ताभिसरण मंदावते, स्नायूंमध्ये ताठरपणा येतो आणि त्यामुळे वेदना वाढतात. अशावेळी वेदनाशामक औषधांपेक्षा घरगुती, नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय अधिक फायदेशीर ठरतात. त्यापैकी एक फायदेशीर उपाय म्हणजे मिठाची पोटली करून गरम शेक देणे. हा पारंपरिक उपाय पिढ्यानपिढ्या वापरात असून, योग्य पद्धतीने केला तर हाड - स्नायू दुखणे कमी करण्यास, सूज उतरवण्यास आणि आराम मिळवण्यास मदत करतो. हिवाळ्याच्या दिवसांत सांधेदुखी आणि स्नायू आखडणे ही एक कॉमन समस्या आहे. अशावेळी घरगुती उपाय म्हणून 'मिठाची पोटली' खूपच फायदेशीर ठरते. थंडीच्या दिवसात कडाकडा वाजणाऱ्या हाडांच्या वेदना आणि (how to use salt bag for back pain) सांधेसूखी किंवा स्नायूंचे दुखणे कमी करण्यासाठी मिठाच्या पोटलीचा घरगुती उपाय पाहा... 

थंडीच्या दिवसांत हाडांतून येतो कडाकडा आवाज, वेदना वाढतात... 

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फार साहित्याची गरज लागणार नाही. एक वाटी जाड मीठ (शक्य असल्यास खडे मीठ वापरा) आणि एक सुती कापड. कढईत मीठ चांगले गरम करून घ्या. त्यानंतर ते सुती कापडाच्या मध्यभागी ठेवून त्याची घट्ट गाठ बांधून पोटली तयार करा. शेक देण्यापूर्वी पोटली जास्त गरम नाही ना, याची खात्री हातावर लावून नक्की करा. मिठाची पोटली म्हणजे साध्या स्वच्छ कापडात साधे मीठ किंवा खडे मीठ भरून ती गरम करून दुखणाऱ्या भागावर शेक देणे. मिठामध्ये उष्णता धरून ठेवण्याची क्षमता असते, त्यामुळे गरम शेक जास्त वेळ परिणामकारक राहतो.

केमिकलयुक्त ब्लिच आता विसरा, फक्त १० रुपयांत घरीच तयार करा आयुर्वेदिक ब्लिच - पहिल्याच वापरात दिसेल फरक...

मिठाच्या पोटलीने शेक देण्याचे फायदे... 

१. स्नायूंचा कडकपणा कमी होतो :- थंडीमुळे स्नायू आकुंचन पावतात. मिठातील उष्णता स्नायूंच्या आतपर्यंत पोहोचते, ज्यामुळे स्नायूंना लवचिकता मिळते आणि आखडलेपणा दूर होतो.

२. रक्ताभिसरण सुधारते :-  ज्या भागात वेदना होत आहेत, तिथे गरम मिठाने शेक दिल्यास त्या भागातील रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. यामुळे रक्ताचा प्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होण्यास मदत होते.

३. सांध्यातील 'कडाकडा' आवाज थांबतो :- थंडीमुळे सांधे कोरडे पडल्यास सांध्यातून कडाकडा आवाज येतो. नियमित शेक दिल्याने सांध्यांमधील ऊब टिकून राहते आणि हालचाल सुलभ होते.

४. सूज कमी करण्यासाठी :- जर सांध्यांवर किंवा पायावर सूज आली असेल, तर मीठ शरीरातील अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यास मदत करते, ज्यामुळे सूज उतरते.

५. नॅचरल पेनकिलर :- मिठामध्ये असणारे गुणधर्म आणि त्याची उष्णता मज्जासंस्थेला शांत करते. यामुळे तीव्र पाठ - कंबरदुखी आणि मानदुखीमध्ये त्वरित आराम मिळतो.

६. झोप सुधारते :- रात्री झोपण्यापूर्वी शेक दिल्यास शरीर रिलॅक्स होते आणि झोपही शांत लागते.

१ रुपयाही खर्च न करता काढा नाकावरचे ब्लॅकहेड्स मिनिटभरात! ५ मॅजिकल उपाय - त्वचा होईल आरशासारखी नितळ... 

'या' गोष्टींची घ्या काळजी... 

१. दिवसातून १ ते २ वेळा शेक द्या. 

२. प्रत्येक वेळेला १० ते १५ मिनिटे शेक पुरेसा असतो. 

३. एकाच ठिकाणी जास्त वेळ शेक देऊ नका. 

४. जखमेवर किंवा कापलेल्या त्वचेवर शेक देणे टाळा.

५. शेक दिल्यानंतर लगेच थंड हवेत जाऊ नका किंवा थंड पाण्याने अंघोळ करू नका.

English
हिंदी सारांश
Web Title : Salt poultice: A simple home remedy for winter joint pain relief.

Web Summary : Winter joint pain? A warm salt poultice can ease pain, reduce swelling, and improve blood circulation. This traditional remedy relaxes muscles and provides relief from stiffness. Use it 1-2 times daily for 10-15 minutes, avoiding open wounds.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सथंडीत त्वचेची काळजीहोम रेमेडीघरगुती उपाय