Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चौरचौघात पुन्हा पुन्हा ढेकर देणं वाटत नाही बरं, हा एक उपाय लगेच कराल करा दूर होईल त्रास

चौरचौघात पुन्हा पुन्हा ढेकर देणं वाटत नाही बरं, हा एक उपाय लगेच कराल करा दूर होईल त्रास

Burping Home Remedies: ढेकर रोखण्यासाठी एक सोपा उपाय केला जाऊ शकतो. चला तर पाहुया काय आहे हा उपाय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 13:34 IST2025-09-02T13:26:31+5:302025-09-02T13:34:11+5:30

Burping Home Remedies: ढेकर रोखण्यासाठी एक सोपा उपाय केला जाऊ शकतो. चला तर पाहुया काय आहे हा उपाय...

Home remedy to stop frequent burping immediately after meal | चौरचौघात पुन्हा पुन्हा ढेकर देणं वाटत नाही बरं, हा एक उपाय लगेच कराल करा दूर होईल त्रास

चौरचौघात पुन्हा पुन्हा ढेकर देणं वाटत नाही बरं, हा एक उपाय लगेच कराल करा दूर होईल त्रास

Burping Home Remedies : काही खाल्ल्यानंतर पोटात काही गडबड झाली तर ढेकर येणं सुरू होतं. पोटात जेव्हा जास्त प्रमाणात गॅस तयार होतो, तेव्हा गॅस तोंडावाटे बाहेर येतो, ज्याला ढेकर म्हटलं जातं. भरपूर लोकांना जेवण झाल्यावर ढेकर येतात आणि अनेकदा तर दुसऱ्या लोकांसमोर यामुळे आपली लाजही निघते किंवा असं म्हणूया की, असं केल्यानं आपली इमेज खराब होते. अशात न्यूट्रिशनिस्ट देवयानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्या सांगतात की, ढेकर रोखण्यासाठी एक सोपा उपाय केला जाऊ शकतो. चला तर पाहुया काय आहे हा उपाय...

ढेकर रोखण्याचा उपाय

न्यूट्रिशनिस्ट सांगतात की, जर आपल्याला सतत ढेकर येत असतील तेव्हा औषध खाण्याऐवजी लेमन शॉट्स बनवून प्या. लेमन शॉट्स बनवण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात 2 चमचे लिंबाचा रस टाका, चिमुटभर हिंग घाला, चिमुटभर काळी मिरी पूड घाला आणि थोडंसं मीठ टाका. जेवण केल्यावर 20 मिनिटांनी हे मिश्रण प्या. यानं ढेकर तर बंद होईल, सोबतच गॅस आणि ब्लोटिंगची समस्याही दूर होईल.

इतरही काही उपाय

- ढेकर बंद करण्यासाठी आलंही कामात येऊ शकतं. यात अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात. ज्यामुळे गॅस आणि पोट फुगण्याची समस्या दूर होते. यासाठी आल्याचा एक छोटा तुकडा पाण्यात टाकून उकडा आणि हे पाणी कोमट झाल्यावर प्या. ढेकर दूर होईल आणि पोटासंबंधी समस्याही दूर होतील.

- ओवा हा पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. ओव्यात असे अनेक गुण असतात जे पचन चांगलं होण्यास मदत करतात आणि पोटाला आराम देतात. ओवा खाल्ल्यानं ढेकर येणंही बंद होतं, कारण ओव्यातील तत्वांनी गॅस निघून जातो. काळ्या मिठात भाजलेला ओवा खाल तर अधिक फायदा मिळेल.

Web Title: Home remedy to stop frequent burping immediately after meal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.