हिवाळा सुरु झाला की घरातील वयस्कर मंडळींच्या कपाळावर आठ्या दिसू लागतात. याचे मुख्य कारण म्हणजे थंडीमुळे जकडलेले सांधे आणि गुडघे.(Home remedy for knee pain) अनेकदा गुडघेदुखी इतकी वाढते की साधे चालणे किंवा बसणंही शक्य होत नाही. अशावेळी आपण बाजारातून आजी-आजोबांसाठी महागडे क्रीम, तेल, पेनकिलर्स किंवा लेप आणतो. पण याचा परिणाम मात्र तात्पुरता. ( Knee pain relief) अशावेळी आपल्या लक्षात येतात काही आयुर्वेदिक घरगुती उपचार. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आढळतात ज्या अनेक आजारांवर रामबाण ठरतात.(Clove oil for knee pain) स्वयंपाकघरात आढळणाऱ्या छोट्याशा लवंगमध्ये गुडघेदुखी मुळापासून शमवण्याची ताकद आहे. आज आपण असाच एक १०० वर्षे जुना लवंगाच्या तेलाचा आयुर्वेदिक उपाय जाणून घेणार आहोत. ज्यामुळे आजी- आजोबाचे गुडघेदुखी कमी होईल.
गुडघे दुखीपासून आराम मिळवण्यासाठी आपल्याला तेल बनवावे लागेल. त्यासाठी १ कप मोहरीचे तेल, १ चमचा ओवा, १ चमचा लवंग, ६ ते ७ लसूण पाकळ्या, २ चमचे मेथीचे दाणे, कच्च्या हळदीचे तुकडे, १ चमचा कापूर पावडर लागेल.
तेल बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी पॅन गरम करुन त्यात मोहरीचे तेल घाला. नंतर त्यात हळूहळू सर्व साहित्य घाला. हे तेल मंद आचेवर २० ते २५ मिनिटे ठेवा. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरा. हे आयुर्वेदिक तेल २-३ महिने साठवू शकता.
हिवाळ्यात थंडीमुळे नैसर्गिकरित्या वात वाढतो पण अशावेळी या तेलाने गुडघे किंवा सांध्यांची मालिश केल्यास आराम मिळतो. तेलातील घटक शरीरातील जळजळ देखील कमी करतात. रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी हे तेल कोमट गरम गुडघ्यांवर लावा. हलक्या हाताने १० ते १५ मिनिटे मसाज करा. मसाज करताना गोलाकार हालचालीने करा. नियमित लावल्याने गुडघ्यांची सूज कमी होण्यास मदत होईल. तसेच रक्ताभिसरण देखील सुधारेल. हा साधा सोपा घरगुती उपाय केल्याने नक्की फायदा होईल.
Web Summary : Suffering from knee pain? This Ayurvedic clove oil recipe can provide relief. Prepare with mustard oil, cloves, garlic, and camphor. Massage gently for reduced inflammation and improved circulation. Noticeable difference in 7 days!
Web Summary : घुटनों के दर्द से परेशान हैं? यह आयुर्वेदिक लौंग के तेल की रेसिपी राहत दे सकती है। सरसों के तेल, लौंग, लहसुन और कपूर से तैयार करें। सूजन को कम करने और परिसंचरण में सुधार के लिए धीरे मालिश करें। 7 दिनों में ध्यान देने योग्य अंतर!