पावसाळा सुरु झाला की वातावरणात बदल होतो. यामुळे अनेक आजार आपले डोकं वर काढतात. (Cold and cough issue) हवामानात बदल होत असल्यामुळे सर्दी-खोकल्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे.(cold and flu home treatment) सुरुवातीला सामान्य वाटणारं साधं सर्दी-खोकल्याच्या लक्षणाकडे आपण दुर्लक्ष करतो. (monsoon immunity drink) परंतु, वेळीच लक्ष न दिल्यास आपल्याला श्वास घेण्यासही अडचणी येतात. (natural cure for blocked nose)
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे हा त्रास अधिक जाणवतो. घरातील लहान मुलांपासून -मोठ्यांपर्यंत अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागते. (how to unblock nose naturally) बदलत्या हवामानामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते. ज्यामुळे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता दाट असते. (cold and flu home treatment) या दिवसात वातावरणात गारवा आणि दमटपणा यामुळे श्वसनाचे विकारही पटकन होतात. सर्दीमुळे सतत नाक गळणं, खोकून खोकून घश्याची पार वाट लागते. (difficulty in breathing due to cold) त्यात कफ झाल्यामुळे आपल्या श्वास देखील घेता येत नाही. अशावेळी आपण औषधोपचार करतो परंतु अनेकदा औषधे खाऊन देखील आपल्याला बरे वाटत नाही. (Monsoon disease) अशावेळी काही घरगुती उपाय केल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होईल. तसेच आपली रोगप्रतिकारशक्ती वाढेल.
ऐन तारुण्यात गुडघे दुखतात, कंबरदुखीचा त्रासही वाढला? आयुर्वेदिक तेलाने करा मालिश- त्रास होईल कमी
प्रसिद्ध डॉक्टर सलीम झैदी यांनी सर्दी-खोकल्यावर रामबाण औषध सांगितले आहे. ते सांगतात की, यामुळे आपल्याला लगेच आराम मिळेल. कफ, सर्दी आणि वारंवार डोकेदुखी होत असेल तर काही घरगुती उपाय करुन पाहा. ज्यामुळे घशाला देखील आराम मिळेल. काढा तयार करण्यासाठी काय करायचे पाहूया.
काढा कसा तयार कराल?
एक कप पाणी, एक चमचा ओवा, चिमूटभर काळी मिरी पावडर, एक चमचा किसलेले आले आणि चमचाभर मध आपल्याला लागेल. सगळ्यात आधी पॅनमध्ये ओवा, काळी मिरी आणि आले घाला. पाणी घालून चांगले उकळवून घ्या. नंतर गाळून थंड करा. यामध्ये मध मिसळून प्या. असं दिवसातून दोन ते तीन वेळा केल्यास सर्दी-खोकला नाहीसा होण्यास मदत होईल.
ओव्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आहेत. जे सर्दी आणि कफ कमी करण्यास मदत करतात. ओव्याचे पाणी प्यायल्याने कफ पातळ होतो. घसा खवखवणे आणि घशाला आलेली सूज कमी करण्यास मदत करते. ओवा, मध आणि गरम पाणी एकत्र करुन प्यायल्याने सर्दी-खोकल्यासाठी चांगला घरगुती उपाय आहे.
सर्दी - खोकला अतिप्रमाणात झाला असेल तर आपण वाफ घेऊ शकतो. यामुळे नाकात आणि घशात अडकलेले बॅक्टेरिया बाहेर निघण्यास मदत होतील. छातीत जमा झालेला कफ वितळेल आणि श्वास नीट घेण्यास मदत होईल.