Join us

सतत उचकी लागते, जीव कासावीस होतो? मिनिटभरात उचकी थांबवण्यासाठी ४ उपाय - मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2025 21:31 IST

home remedies to stop hiccups : how to stop hiccups instantly : best natural remedies for hiccups : tips to cure hiccups at home : easy ways to get rid of hiccups : उचकी लागल्यावर जीव हैराण होतो आणि काही केल्या ती थांबत नाही यासाठी खास घरगुती ५ उपाय...

अनेकदा आपल्याला अचानकपणे उचकी लागते, एकदा का उचकी लागली की ती थांबता थांबत नाही. उचकी लागल्यावर जीव हैराण होतो आणि काही केल्या ती थांबत नाही. उचकी येणे ही एक सामान्य गोष्ट असली तरी, ती लागल्यावर थांबवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो. उचकी लागणे ही अगदी क्षुल्लक वाटणारी (home remedies to stop hiccups) पण अत्यंत त्रासदायक (best natural remedies for hiccups) गोष्ट आहे. जेवत असताना, पाणी पटकन पिताना किंवा पोटात गॅस (how to stop hiccups instantly) झाल्यावर अचानक उचकी लागते आणि ती सतत सुरू राहिली की डेली रुटीनमध्येही अडथळा येतो. अचानक येणाऱ्या उचकीमुळे आपण हैराण होतो आणि ती कधी एकदा थांबेल असे वाटते. 

एकदा लागलेली उचकी थांबवण्यासाठी आपण अनेक घरगुती उपाय करून पाहतो. उचकी थांबवण्यासाठी पाणी पिणे, श्वास रोखून धरणे, काहीतरी गोड पदार्थ खाणे असे काही उपाय करुन पाहतो, परंतु कित्येकवेळा हे उपायही निष्फळ ठरतात. जर वारंवार उचकी लागण्याचा त्रास होत असेल, तर काळजी करू नका. काही सोपे घरगुती उपाय आहेत, जे आपल्याला उचकीच्या समस्येपासून लगेच आराम देऊ शकतात. हे उपाय करणे खूप सोपे आहे आणि त्यासाठी घरातच उपलब्ध असलेल्या पदार्थांचा वापर केला जाऊ शकतो. 

उचकी नेमकी का लागते ?

उचकी (Hiccups) लागण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. आपल्या छातीच्या आणि पोटाच्यामध्ये एक पडदा असतो, ज्याला डायाफ्राम (Diaphragm) असे म्हणतात. श्वास घेताना आणि सोडताना या पडद्याचे काम महत्त्वाचे असते. जेव्हा आपल्याला उचकी लागते, तेव्हा हा डायाफ्राम अचानक आकुंचन पावतो. यामुळे आपल्या फुफ्फुसांमध्ये हवा वेगाने खेचली जाते. त्याचवेळी, आपल्या घशामधील स्वरयंत्राचे (vocal cords) स्नायू अचानक बंद होतात. यामुळे 'हिक' (hic) असा विशिष्ट आवाज येतो.

तेल की तूप, फोडणीसाठी काय फायदेशीर ? ९९% लोकांना माहीतच नसते रोजची १ चूक - होते आरोग्याचे नुकसान... 

उचकी थांबवण्यासाठी घरातील हे पदार्थ आहेत खास... 

१. लिंबू आणि मीठ :- जर आपल्याला वारंवार खूप जास्त उचकी लागत असेल, तर एका लिंबाच्या फोडीवर थोडे मीठ टाकून हळूहळू चोखायला सुरुवात करा. यामुळे उचकी लगेच थांबते. लिंबाचा आंबटपणा आणि मिठाची चव डायाफ्रामला शांत करण्यास मदत करते. हा उपाय त्वरित परिणाम दाखवतो आणि अनेकदा लहान मुले तसेच मोठ्यांसाठी देखील हा उपाय फायदेशीर ठरतो.

आता शुगर वाढणार नाही, डायबिटीस राहील नियंत्रणात! जेवणाच्या ताटात हव्याच ६ भाज्या - राहाल एनर्जेटिक...  

२. थंड पाणी :- उचकी लागल्यावर थंड पाणी प्यायल्यानेही आराम मिळू शकतो. हळूहळू थंड पाणी प्यायल्याने घशाचे स्नायू शिथिल (relax) होतात आणि उचकी थांबते. पाणी न थांबता लहान-लहान घोट घेऊन पिण्याचा प्रयत्न करा.

३. चमचाभर साखर खा :- उचकी (Hiccups) थांबवण्यासाठी साखर खाणे हा एक पारंपरिक व सोपा उपाय आहे. एक चमचा साखर तोंडात टाकून हळूहळू चोखल्याने उचकी लगेच थांबते. साखरेची गोड चव मज्जासंस्थेवर (nervous system) परिणाम करून उचकी थांबवते. विशेषतः जेव्हा उचकी खूप जास्त आणि वेगाने येत असेल, तेव्हा हा उपाय करावा. मधुमेह असणाऱ्यांनी मात्र हा उपाय टाळावा.

४. दुध आणि हळद :- एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा हळद मिसळून प्यायल्याने उचकीच्या समस्येपासून आराम मिळतो. हळदीमध्ये अँटी इंफ्लामेटरी  गुणधर्म असतात, जे डायाफ्रामची सूज कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर, दूध पोटाला आराम देते आणि स्नायूंची वेदना शांत करते.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी