Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दातांच्या समस्यांवर इवलीशी लसूण पाकळी ठरते प्रभावी उपाय! दात दिसतील मोत्यासारखे पांढरेशुभ्र...

दातांच्या समस्यांवर इवलीशी लसूण पाकळी ठरते प्रभावी उपाय! दात दिसतील मोत्यासारखे पांढरेशुभ्र...

Home remedies Garlic And Salt For Tooth Cavity : Oral Health Tips : Effective Home Remedies For Tooth Cavities : Using Garlic & Salt for Toothaches Efficacy of the Home Remedy : दातदुखी, दात किडणे यांसारख्या दातांच्या समस्यांवर लसूण पाकळी ठरेल फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2025 10:27 IST2025-05-09T10:13:35+5:302025-05-09T10:27:28+5:30

Home remedies Garlic And Salt For Tooth Cavity : Oral Health Tips : Effective Home Remedies For Tooth Cavities : Using Garlic & Salt for Toothaches Efficacy of the Home Remedy : दातदुखी, दात किडणे यांसारख्या दातांच्या समस्यांवर लसूण पाकळी ठरेल फायदेशीर...

Home remedies Garlic And Salt For Tooth Cavity Effective Home Remedies For Tooth Cavities | दातांच्या समस्यांवर इवलीशी लसूण पाकळी ठरते प्रभावी उपाय! दात दिसतील मोत्यासारखे पांढरेशुभ्र...

दातांच्या समस्यांवर इवलीशी लसूण पाकळी ठरते प्रभावी उपाय! दात दिसतील मोत्यासारखे पांढरेशुभ्र...

ओरल हेल्थ चांगली तर संपूर्ण आरोग्य उत्तम असं म्हटलं जातं. दातांची स्वच्छता ठेवण्यासाठी आपण दररोज ब्रश करतोच. असे असले तरीही दात कितीही काळजी घेऊन स्वच्छ ठेवले तरी देखील काहीवेळा दातांच्या (Oral Health Tips) अनेक समस्या सतावतात. दातांना कीड लागणे, दात खराब होणे, दातांमध्ये खड्डे पडणे, दातदुखी  अशा दातांच्या अनेक समस्या हैराण करतात. दातांच्या या लहान - मोठ्या समस्या कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करतो(Tooth Cavity Home remedies Garlic And Salt For Tooth Cavity).

या उपायांमध्ये आपण शक्यतो वेगवेगळ्या प्रकारच्या क्रीम्स, गोळ्या, औषध घेतो. काहीवेळा असे वेगवेगळे उपाय करून देखील दातांच्या समस्या काही केल्याशिवाय कमी होतच नाहीत. अशा परिस्थितीत, आपण काही घरगुती उपाय करण्याला प्राधान्य देतो. दातांसाठी घरगुती उपाय करताना आपण नेहमीच्या वापरातील स्वयंपाक घरातील लसूण आणि मिठाचा नैसर्गिक उपाय करून पाहू शकतो. दातांसाठी लसूण आणि मिठाचा नैसर्गिक उपाय करण्यासाठी नेमकं करायचं काय ते पाहूयात(Using Garlic & Salt for Toothaches Efficacy of the Home Remedy).

मधुमेहींनी जेवताना ताटातील 'या' पदार्थाचा पहिला घास खावा, शुगर न वाढता - डायबिटीस राहील नियंत्रणात...

दातदुखी सारख्या दातांच्या अनेक समस्यांपासून आराम मिळविण्यासाठी लसूण खूप फायदेशीर आहे. त्यामध्ये असलेल्या अ‍ॅलिसिनचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म दातदुखीच्या समस्येपासून आराम देतात. त्यामध्ये असलेले अ‍ॅलिसिन नावाचे संयुग बॅक्टेरिया नष्ट करण्यास उपयुक्त ठरतात. लसूण दात किडण्यास जबाबदार असलेल्या बॅक्टेरियांना नष्ट करू शकतो.  

लसूण पाकळ्यांमध्ये असलेले आयुर्वेदिक गुणधर्म जंतूं नष्ट करू शकतात. यासाठी तुम्ही लसूण बारीक करून जे दात खराब झालेत त्या दातांवर घासून लावू शकता. यामुळे लवकर आराम मिळतो. याचबरोबर, दातदुखी, हिरड्यांच्या सूज आणि कॅविटीसारख्या समस्यांवर आराम मिळवण्यास मदत करते. 

जपानी लोकांच्या या ८ सवयींमुळे राहतात कायम सडपातळ! काय आहे त्यांचा फिटनेस फंडा, पाहा...

दिवसभरात कधी वजन केलं तर वजनकाटा दाखवतो अचूक वजन? सतत कमी जास्त वजनाचा घोळ टाळा...

दातांच्या अनेक समस्या कमी करण्यासाठी आपण थेट लसूण पाकळी चावून खाऊ शकतो. यासोबतच, लसूण पाकळ्या कुस्करून त्यात चिमूटभर मीठ घालून या मिश्रणाने दात घासल्यास दातांना लागलेली कीड नष्ट होते.लसणाचे तेल किंवा पेस्ट किडलेल्या दातांवर लावा यामुळे दातांना कीड लागण्याची समस्या कमी होते. लसूण लसूणही दाताच्या दुखण्यासाठी आरामदायी आहे. कच्च्या लसणाच्या दोन-तीन पाकळ्या दाताने चावा. लसूण कापूनही दाताजवळ पकडू शकता. लसणामध्ये एलिसीन असतं जे आपल्या दातातील जंतू नष्ट करतात आणि दाताला आराम मिळतो.

Web Title: Home remedies Garlic And Salt For Tooth Cavity Effective Home Remedies For Tooth Cavities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.