उन्हाळ्यात आपल्याला प्रचंड घाम येतो. काहीवेळा तर आपले अंग घामाने संपूर्णपणे भिजून जाते. या ऋतूत वारंवार त्वचेवर येणाऱ्या घामामुळे आपल्याला काहीवेळा त्वचेशी (Home Remedies For Vaginal Bumps Naturally) संबंधित अनेक समस्यांचा (Effective Home Remedies Treatments for Vaginal Boils) त्रास सतावतो. इतर ऋतूंपेक्षा उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. एरवी त्वचेवर येणारा घाम आपण अगदी सहज पुसू शकतो. परंतु आपल्या प्रायव्हेट बॉडी पार्ट्सना (Home remedies for vaginal boils) देखील उन्हाळ्यात तितकाच घाम येतो, आणि 'त्या' नाजूक भागातील त्वचेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता, काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे(How To Avoid Pimples Around Female Private Parts During Summer).
आपल्या शरीराचे काही अवयव हे कायम कपड्यांच्या आत बंद असतात. यामुळे उन्हाळ्यात या भागात घाम आल्याने किंवा फिटिंगचे कपडे घातल्याने तसेच योग्य ती स्वच्छता न ठेवल्याने प्रायव्हेट भागांतील त्वचेच्या अनेक समस्या उद्भवतात. प्रायव्हेट भागांतील त्वचेवर पुरळ येणे, त्वचा लालसर होणे, रॅशेज येणे अशा अनेक समस्या हैराण करतात. असे होऊ नये यासाठी उन्हाळ्यात शरीराच्या इतर अवयवांसोबतच, 'त्या' नाजूक भागाची देखील काळजी घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात प्रायव्हेट भागांतील त्वचेला घाम येऊ नये किंवा त्वचा कशी स्वच्छ ठेवावी याबद्दल काही गोष्टींची काळजी कशी घ्यायची ते पाहा...
उन्हाळ्यात 'त्या' नाजूक भागाची अशी घ्या काळजी...
मेडिकल न्यूज टुडेच्या मते, प्रायव्हेट भागातील त्वचा अत्यंत संवेदनशील असते. घाम येणे, घट्ट इनरवेअर घालणे, शेव्हिंग केल्यानंतर होणारी जळजळ किंवा केसांच्या कूपांमध्ये बॅक्टेरिया जमा होणे यामुळे त्या भागात पुरळ, रॅशेज किंवा त्वचा लालसर होण्याची समस्या सतावू शकते. या समस्यांना तोंड देण्यासाठी, स्वच्छता आणि योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
प्रायव्हेट पार्ट्स स्वच्छ करण्यापूर्वी आपले हात आधी स्वच्छ धुवून घ्यावेत. योनीचा (बाह्य भाग) कोमट पाण्याने स्वच्छ करा. नंतर स्वच्छ कोरड्या टॉवेलने पुसून वाळवा. नेहमी स्वच्छ धुतलेले इनरवेअर घाला किंवा एकदा वापरलेले पॅड तसेच इनरवेअर पुन्हा वापरू नका.
उन्हाळ्यात जीन्स नको वाटते ? ४ टिप्स - करा परफेक्ट निवड - घामाचा त्रास नाही...
घट्ट किंवा सिंथेटिक इनरवेअरमुळे त्वचेवर घाम येतो आणि घर्षणामुळे समस्या अधिक वाढते. अशा परिस्थितीत मऊ आणि सैल सुती अंतर्वस्त्रे घालणे उत्तम ठरेल.
स्वच्छ कापूस किंवा धुतलेले कापड कोमट पाण्यात भिजवा आणि ते मुरुमांवर १० ते १५ मिनिटे हलकेच ठेवा. यामुळे वेदना कमी होतील आणि मुरुम फुटू शकेल आणि स्वतःहून बरे होईल.
ऑफिसला साडी नेसता, पाहा ब्लाऊजच्या गळ्यांचे ७ डिझाइन्स, असे शिवा दिसाल प्रोफेशनल स्टायलिश!
नेहमी गाडी लागते, उलट्या-मळमळतं? २ सोपे उपाय, प्रवासात गाडी लागणं बंद-आनंदानं जा फिरायला!
एका टबमध्ये कोमट पाणी आणि थोडे मीठ मिसळा आणि त्यात १० मिनिटे बसा. या पद्धतीमुळे वेदना आणि सूज दोन्हीपासून आराम मिळेल.
टी ट्री ऑईलमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे मुरुमांचा आकार कमी होऊ शकतो. यासाठी टी ट्री ऑईल नारळाच्या तेलात मिसळा आणि कापसाच्या मदतीने लावा.
त्या भागातील पुरळ कमी करण्यासाठी आपण, एलोवेरा जेल पुरळ आलेल्या भागात लावा. यामुळे जळजळ आणि खाज कमी होण्यास मदत मिळेल.
काय करू नये ?
१. पुरळ खाजवू नका.
२. हार्श साबण किंवा सुगंधी उत्पादने वापरू नका.
३. जास्त घासून धुवू नका.