अनेकांना जेवण झाल्याबरोबर पोट फुगल्यासारखं वाटणं, पोटात गॅस धरणे किंवा पोट डब्ब होण्याचा त्रास होतो. याला ब्लोटिंग असं म्हणतात. अनेकदा आपण याकडे गॅसची समस्या म्हणून दुर्लक्ष करतो, परंतु ही आपल्या पचनसंस्थेतील बिघाडाची पहिली पायरी असू शकते.(Bloating relief tips by doctors) AIIMS (एम्स) च्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, आपण काय खातो यापेक्षा आपण 'कसे' खातो आणि खाल्ल्यानंतर काय करतो, यावर आपले पचन अवलंबून असते.(Natural ways to reduce gas and bloating)
जेवणानंतर पोट फुगल्यावर आपलं कामात लक्ष लागत नाही, अस्वस्थ वाटू लागते. छातीत जळजळ आणि आळस यांसारख्या समस्याही उद्भवतात. चुकीच्या खाण्याच्या सवयी,फास्ट जेवणे किंवा जेवताना पाणी पिणे ही याची काही प्रमुख कारणे असू शकतात.(Ayurvedic tips for better digestion) जर आपल्यालाही रोज जेवणानंतर पोटाचा घेर वाढल्यासारखा वाटत असेल, तर घाबरून न जाता डॉक्टरांनी सांगितलेल्या काही साध्या पण प्रभावी सवयी लक्षात ठेवल्या तर पचन सुधारण्यासाठी आणि ब्लोटिंगपासून कायमची सुटका मिळेल. काय करायला हवं पाहूया.
शांत स्वभाव कमजोरी नाही ताकद, ‘या’ ४ गुणांमुळे इंट्रोवर्ट माणसं होतात यशस्वी-जगतात आनंदात
पोट फुगण्याची समस्या का होते?
कधीकधी घाईत- कामामुळे, आपण आपले अन्न लवकर खातो, आणि कधीकधी आपण असे काहीतरी खातो जे आपल्या शरीराला पचत नाही. यामुळे पोटदुखी, गॅस आणि अस्वस्थता जाणवते. प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही टिप्स शेअर केल्या आहेत ज्या आपल्याला या समस्येवर मात करण्यास मदत करू शकतात.
1. डॉक्टर म्हणतात पुदिन्याचा चहा पोटाच्या स्नायूंना आराम देण्यास मदत करतो. जर आपल्याला पोटफुगीपासून सुटका हवी असेल तर पुदीन्याच्या पानांचा चहा प्या. यात असणारे मेन्थॉल नावाचे सयुंग आपल्या पचनसंस्थेतील स्नायूंना आराम देण्याचे काम करते.
2. आपल्या स्वयंपाकघरात वापरला जाणारा महत्त्वाचा मसाला बडीशेप. ही चव आणि आरोग्याची खजिना आहे. पोट फुगण्याच्या समस्येवर बडीशेप रामबाण ठरते. बडीशेप आपल्या पोटातील अतिरिक्त वायू बाहेर काढण्यास मदत करते. हे आपले जोड रिफ्रेश करत नाही तर पोट फुगण्याच्या समस्या कमी करतात.
3. अनेकांना दुग्धजन्य पदार्थ सहज पचत नाही. दूध प्यायल्यानंतर किंवा दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यानंतर ३० मिनिटे ते २ तासांच्या आत पोट फुगल्याचा अनुभव येत असेल, तर दूध हे आपल्या समस्येचे मूळ कारण असू शकते. आपण काही दिवस दूध टाळण्याचा प्रयत्न करू शकतो.
4. सोडा किंवा कोल्ड्रिंक्स प्यायल्याने आपल्याला पोटावर त्याचा परिणाम होतो. हे आपल्या पोटात आणि आतड्यांमध्ये गॅस तयार करतात. ज्यामुळे ढेकर येणे, पोट फुगणे आणि अस्वस्थता जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवतात. आपले पोट हलके ठेवायचे असेल तर कार्बोनेटेड पेयांचे सेवन मर्यादित करा.
5. आपल्याला पोटाची काळजी घेत असाल तर फायबरचे प्रमाण शरीरात मर्यादेत ठेवा. फायबर आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे, परंतु ते हळूहळू वाढवावे. अचानक जास्त फायबर खाण्यास सुरुवात केली तर आपल्या आतड्यांतील बॅक्टेरियांना ते पचवण्यास त्रास होईल. यामुळे पोटात पेटके, वेदना आणि अतिसार देखील होऊ शकतो.
Web Summary : Feeling bloated after eating could signal digestive issues. AIIMS doctors suggest improving digestion by drinking peppermint tea, consuming fennel seeds, limiting dairy and soda, and gradually increasing fiber intake. These simple changes can relieve bloating and improve overall gut health.
Web Summary : खाने के बाद पेट फूलना पाचन समस्या का संकेत हो सकता है। एम्स के डॉक्टरों ने पुदीने की चाय पीने, सौंफ का सेवन करने, डेयरी और सोडा सीमित करने और धीरे-धीरे फाइबर का सेवन बढ़ाने का सुझाव दिया है। ये बदलाव पेट फूलने से राहत दिला सकते हैं।