Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पाय टेकवला तरी टाच ठणकते? फक्त बाम लावून काही होणार नाही, करा हे घरगुती उपाय

पाय टेकवला तरी टाच ठणकते? फक्त बाम लावून काही होणार नाही, करा हे घरगुती उपाय

home remedies for heel pain, see how to get heel pain relief at home, health care tips : टाचदुखी बरी करण्यासाठी टिप्स, घरीच करा हे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2026 14:01 IST2026-02-18T14:00:23+5:302026-02-18T14:01:45+5:30

home remedies for heel pain, see how to get heel pain relief at home, health care tips : टाचदुखी बरी करण्यासाठी टिप्स, घरीच करा हे उपाय.

home remedies for heel pain, see how to get heel pain relief at home, health care tips | पाय टेकवला तरी टाच ठणकते? फक्त बाम लावून काही होणार नाही, करा हे घरगुती उपाय

पाय टेकवला तरी टाच ठणकते? फक्त बाम लावून काही होणार नाही, करा हे घरगुती उपाय

टाचा दुखणे ही आजकाल खूप सामान्य तक्रार झाली आहे. घरकाम, ऑफिसमध्ये दीर्घकाळ उभे राहणे, चुकीची चप्पल वापरणे किंवा व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे टाचेत वेदना जाणवू शकतात. (home remedies for heel pain, see how to get heel pain relief at home, health care tips )विशेषतः सकाळी उठल्यावर पहिले पाऊल टाकताना तीव्र वेदना होणे, चालताना टोचल्यासारखे वाटणे किंवा जास्त वेळ उभे राहिल्यावर दुखणे वाढणे ही याची ठरलेली लक्षणे आहेत.

टाचा दुखण्यामागील सर्वात सामान्य कारण म्हणजे Plantar Fasciitis. पायाच्या तळव्यामधील एक जाड स्नायूबंध (लिगामेंट) टाच ते बोटे जोडतो. त्याला सूज आल्यास टाचेत वेदना होतात. दुसरे कारण म्हणजे Calcaneal Spur. यात टाचेच्या हाडाजवळ छोटासा हाडाचा उंचवटा तयार होतो आणि चालताना त्रास होतो. याशिवाय जास्त वजन, मधुमेह, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता, दीर्घकाळ उभे राहण्याची सवय किंवा पूर्णपणे सपाट चपल वापरणे यामुळेही हा त्रास वाढू शकतो.

फक्त गरम पाण्यात पाय बुडवणे किंवा साधी मालीश एवढ्यावर उपाय मर्यादित ठेवू नयेत. काही वेगळे आणि प्रभावी उपाय असे करावे. बर्फाचा शेक घ्या. सूज असल्यास गरम पाण्याऐवजी थंड शेक अधिक फायदेशीर ठरतो. बर्फ कपड्यात गुंडाळून १०–१५ मिनिटे टाचेवर हलक्या हाताने फिरवावा. त्यामुळे सूज आणि वेदना कमी होतात. स्ट्रेचिंगचे व्यायम करा. स्नायूंना ताण देणारे हलके व्यायाम खूप उपयोगी असतात. भिंतीला हात लावून एक पाय मागे सरकवून पोटरीला ताण द्या. तसेच टॉवेल पायाच्या बोटांभोवती गुंडाळून स्वतःकडे हलके ओढा. रोज काही मिनिटे केल्यास फरक जाणवतो.

एरंडेल तेल किंवा तीळ तेल वापरुन मालीश करा. किंचित गरम करून टाचेवर लावून कापड बांधल्यास स्नायूंना आराम मिळतो. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि वेदना कमी होतात. एप्सम सॉल्टचा वापर करा. कोमट पाण्यात एप्सम सॉल्ट टाकून त्यात पाय १५–२० मिनिटे बुडवून ठेवा. स्नायू सैल होतात आणि कडकपणा कमी होतो.

मेथी किंवा हळदीचा लेप लावायचा. मेथी भिजवून वाटून लेप लावणे किंवा हळदीचे दूध पिणे हे सूज कमी करण्यास मदत करते. योग्य चपला वापरणे फार गरजेचे आहे. सॉफ्ट सोल आणि टाचेला आधार देणारे शूज वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सपाट, कडक चपल टाळाव्यात. गरज असल्यास ऑर्थोटिक इनसोल वापरावा. वजन नियंत्रण गरजेचे. अतिरिक्त वजनामुळे टाचांवर ताण वाढतो. त्यामुळे संतुलित आहार आणि हलका व्यायाम गरजेचा आहे.

Web Title : एड़ी दर्द से राहत: बाम से परे घरेलू उपचार, पाएं आराम।

Web Summary : एड़ी का दर्द प्लांटर फासिसाइटिस, वजन या गलत जूते के कारण होता है। बर्फ, स्ट्रेचिंग, गर्म तेल से मालिश, एप्सम नमक और हल्दी का प्रयोग करें। आरामदायक जूते पहनें और वजन नियंत्रित करें।

Web Title : Heel pain relief: Home remedies beyond balm for lasting comfort.

Web Summary : Heel pain is common due to plantar fasciitis, weight, or footwear. Try ice packs, stretching, massage with warm oil, Epsom salt soaks, and turmeric. Wear supportive shoes and manage your weight for relief.