Join us

पोट साफ न होण्याची चिंता सोडा! 'हे' जादुई पान रात्री चावून खा - आजीबाईच्या बटव्यातील खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2025 19:33 IST

Ajwain Leaves For Constipation : सकाळचं पोट नीट साफ होत नाही ? ओव्याच्या पानांचा रामबाण उपाय - बद्धकोष्ठता, गॅस, अपचन होईल कमी...

सकाळची सुरुवात चांगली झाली तर दिवसभर उत्साह टिकून राहतो. परंतु जेव्हा सकाळी उठल्या उठल्या पोट व्यवस्थित साफ होत नाही, जोर लावूनही मलत्याग नीट करता येत नाही किंवा पोटात गॅस आणि अजीर्ण जाणवते, तेव्हा आपला संपूर्ण दिवस अस्वस्थ आणि कंटाळवाणा जातो. आजच्या धावपळीच्या आणि सतत बदलत जाणाऱ्या लाईफस्टाईलमध्ये, अनेकांना सकाळी उठल्यावर पोट साफ न होणे, वारंवार मलावरोध होणे किंवा मलत्याग नीट न होणे ही त्रासदायक समस्या सतावते. ही अगदी छोटी आणि किरकोळ वाटणारी समस्या प्रत्यक्षात पचनसंस्थेशी आणि संपूर्ण आरोग्याशी थेट संबंधित असते. नियमित मलत्याग न झाल्याने शरीरात विषारी द्रव्यं साठतात, ज्यामुळे पोट फुगणे, आम्लपित्त, थकवा आणि त्वचेच्या समस्याही वाढतात( how to use ajwain leaves for constipation).

बद्धकोष्टतेची ही नेहमीची समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय करताना, ओव्याची पान असरदार ठरतात. ओव्याची पानं फक्त चवीसाठीच नव्हे, तर पचन सुधारण्यासाठी आणि पोटातील गॅस, अपचन, बद्धकोष्ठता कमी करण्यासाठीही उत्तम औषध म्हणून मानली जातात. आयुर्वेदिक डॉक्टर आनंदी माहेश्वरी यांनी एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, सकाळी पोट साफ न होण्याच्या समस्येवर (home remedies for constipation using ajwain leaves) ओव्याच्या पानांचा वापर कसा करावा आणि त्याचे काय फायदे होतात ते पाहूयात. 

ओव्याचे पान दूर करेल बद्धकोष्ठतेचा त्रास... 

१. ओव्याच्या पानांमध्ये थाइमॉल (Thymol) नावाचे रसायन असते. हे रसायन पचनसंस्थेमध्ये पचन रस स्रवण्यास मदत करते. ओवा फक्त अन्न व्यवस्थित पचण्यासच मदत करत नाही, तर त्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) देखील दूर होते.

२. ओव्याच्या पानांमध्ये फायबर असते. हे आतड्यांना साफ करण्यास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य सुधारते. जर तुम्ही रात्री कोमट पाण्यासोबत ओव्याची पाने चावून खाल्ली तर यामुळे शौचावाटे मल सहजपणे बाहेर पडते. 

फॅटी लिव्हरचा त्रास? रोजच्या आहारात करा ' एवढाच ' बदल - गंभीर दुखणे होईल कमी...

३. ओव्याची पाने चावून खाल्ल्याने पोट साफ होते आणि हलके वाटते. यामुळे पोट फुगण्याची समस्या दूर होते आणि पोटात गॅस तयार होत नाही. जर तुम्हाला वारंवार गॅस आणि अपचनाचा त्रास होत असेल आणि बद्धकोष्ठतेमुळे पोट फुगल्यासारखे वाटत असेल, तर ओव्याची पाने चावून खावीत. 

४. ओव्याची पाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे आणि चयापचय क्रिया सुधारण्याचे काम करतात. जेव्हा आपली चयापचय क्रिया अ‍ॅक्टिव्ह असते, यामुळे अन्न व्यवस्थित पचण्यासोबतच शरीरात एनर्जी टिकून राहते, तर बद्धकोष्ठतेचा त्रास देखील दूर होते.

व्हेरिकोज व्हेन्सचा त्रास, नसा दुखतात? सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट सांगतात,‘असा’ करा पोटली मसाज - मिळेल आराम...

ओव्याची पाने कशी खावीत ?

आयुर्वेद तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत ओव्याची पाने चावून खाऊ शकता, किंवा ४ ते ५ पाने पाण्यात उकळून ते पाणी पिऊ शकता. याव्यतिरिक्त, पराठे किंवा डाळीमध्येही ओव्याची पाने घातली जाऊ शकतात. याचबरोबर, जर तुम्ही झोपताना ओव्याची पाने गरम पाण्यासोबत चावून खाल्ली तर ते रात्रभर काम करते आणि सकाळी पोट सहजपणे स्वच्छ होण्यास अधिक मदत होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Say goodbye to constipation with ajwain leaves: Grandma's remedy!

Web Summary : Suffering from constipation? Ajwain leaves can help! They aid digestion, reduce gas, and relieve constipation. Chewing them with warm water at night promotes easy bowel movements. Ajwain leaves contain thymol and fiber, which improve gut health and detoxify the body, ensuring smooth digestion and regular bowel movements.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीघरगुती उपाय