Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चेहरा फुग्यासारखा टम्म-डोकंही दुखतं, साठलेल्या सर्दीवर ३ घरगुती उपाय-श्वास घ्या मोकळा

चेहरा फुग्यासारखा टम्म-डोकंही दुखतं, साठलेल्या सर्दीवर ३ घरगुती उपाय-श्वास घ्या मोकळा

Home remedies for cold - it will clear your nose from inside : सर्दी बरी होईल काही दिवसांतच. करा घरगुती उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2026 16:05 IST2026-02-16T16:02:11+5:302026-02-16T16:05:01+5:30

Home remedies for cold - it will clear your nose from inside : सर्दी बरी होईल काही दिवसांतच. करा घरगुती उपाय.

Home remedies for cold - it will clear your nose from inside | चेहरा फुग्यासारखा टम्म-डोकंही दुखतं, साठलेल्या सर्दीवर ३ घरगुती उपाय-श्वास घ्या मोकळा

चेहरा फुग्यासारखा टम्म-डोकंही दुखतं, साठलेल्या सर्दीवर ३ घरगुती उपाय-श्वास घ्या मोकळा

सर्दी झाली की सगळं शरीर जड झाल्यासारखं वाटतं. नाक पूर्णपणे बंद होतं, डोकं ठणकत राहतं आणि नाकात साठलेली चिकट सर्दी काही केल्या बाहेर पडत नाही. हवामानातील बदल, थंड पदार्थ, कमी झोप किंवा रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे ही त्यामागची प्रमुख कारणं असतात. (Home remedies for cold - it will clear your nose from inside )मात्र काही सोपे आणि परिणामकारक घरगुती उपाय केल्यास ही समस्या लवकर आटोक्यात येऊ शकते.

सर्वात आधी उपयोगी पडते ते म्हणजे वाफ घेणे. गरम पाण्यात थोडंसं मीठ किंवा हळद घालून वाफ घेतल्यास नाकातील सूज कमी होते आणि साठलेली सर्दी पातळ होऊन बाहेर पडते. दिवसातून दोन वेळा वाफ घेतल्यास नाक मोकळं होण्यास मोठी मदत होते. दुसरा प्रभावी उपाय म्हणजे आलं, तुळस आणि काळी मिरीचा काढा. आलं उष्ण प्रकृतीचं असल्याने घशातील खवखव कमी होते आणि सर्दी पातळ होण्यास मदत होते. तुळशीची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. हा काढा गरमागरम घेतल्यास डोकेदुखीही कमी होते.

नाक बंद झाल्यावर डोकं जड वाटत असेल तर कोमट तीळाच्या तेलाने नाकाभोवती मालीश करणे फायदेशीर ठरते. यामुळे नाकातील कोरडेपणा कमी होतो आणि श्वास घेणे सोपे होते. तसेच कपाळावर कोमट पाण्याची पट्टी ठेवली तरी डोकेदुखी कमी होऊ शकते. हळदीचे दूध हा सुद्धा एक रामबाण उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधात चिमूटभर हळद घालून प्यायल्यास शरीराला उष्णता मिळते आणि संसर्गाशी लढण्याची ताकद वाढते.

आता प्रश्न येतो तो काय खावे? सर्दी असताना हलका आणि गरम आहार घ्यावा. गरम सूप, वरण-भात, मूगडाळ खिचडी, भाज्यांचे सूप हे पदार्थ शरीराला पचायला सोपे आणि उपयोगी ठरतात. लसूण, आलं, काळी मिरी, हळद यांचा आहारात समावेश केल्यास सर्दी लवकर कमी होते. भरपूर कोमट पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. याउलट थंड पेये, आइस्क्रीम, दही, तळलेले आणि जड पदार्थ टाळावेत. थंड पाणी पिणे टाळावे. शरीराला विश्रांती देणे आणि पुरेशी झोप घेणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. हे सर्व उपाय केल्यास सर्दीमुळे बंद झालेले नाक, डोकेदुखी आणि नाकात साठलेली सर्दी हळूहळू कमी होते. मात्र ताप जास्त असेल, सर्दी आठवडाभरापेक्षा जास्त टिकत असेल किंवा श्वास घ्यायला त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. योग्य काळजी आणि साधे घरगुती उपाय यामुळे सर्दी पटकन बरी करता येते. 

Web Title : सर्दी से राहत: कंजेशन और सिरदर्द के लिए प्राकृतिक घरेलू उपचार

Web Summary : भाप, अदरक-तुलसी काढ़े और गर्म तिल के तेल की मालिश से सर्दी के लक्षणों का मुकाबला करें। ठंडे भोजन से बचें; सूप और खिचड़ी जैसे हल्के, गर्म भोजन का विकल्प चुनें। आराम करें और हाइड्रेटेड रहें। लक्षण बने रहने पर डॉक्टर से सलाह लें।

Web Title : Relieve Cold: Natural Home Remedies for Congestion and Headache

Web Summary : Combat cold symptoms with steam, ginger-tulsi concoction, and warm sesame oil massage. Avoid cold foods; opt for light, warm meals like soup and khichdi. Rest and stay hydrated. Consult a doctor if symptoms persist.